Tuesday 30 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-20

सत्य अनुभव
भाग-२०

आधीच तारे, त्यात गेले वारे

श्री साठेंच्या ओळखीने श्री कुलकर्णी राहणार पनवेल, हे ज्योतिषतज्ञ नुसता कुंडलीवर हात ठेवून अचूक भविष्य सांगणारे पंडित माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले. आल्या आल्या त्यांनी माझ्या पायावर लोटांगण घातले, महाराज मला माझ्या विवंचनेतून सोडवा तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे तुम्ही फक्त आदेश द्या.

श्री कुलकर्णी, यांना एका यजमानाचे काम करताना झटका बसला व त्यांना हार्ट अटॅक आला. त्या दिवसापासून त्यांची विद्या त्यांना साथ देत नव्हती. कोणतेही काम त्यांच्याकडून अचूक होत नव्हते. ते खूपच अस्वस्थ झाले होते.
त्यांनी मला त्यांच्या घरी येऊन परीक्षण करण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी त्यांच्या राहत्या घरी गेलो. वास्तू परीक्षणात मला त्या वास्तूत एक नकारात्मक ऊर्जा आढळली. त्यावर कुलकर्णी यांना मी उपाय सांगितला त्यांनी तो करण्याचा मान्य केला.
Image by Ana Gic from Pixabay 

मला शाल व श्रीफळ देऊन पूजा केली व तेथून आम्ही त्यांच्या दुसऱ्या वास्तू म्हणजे जिथे त्यांना बंगला बांधायचा होता त्या ठिकाणी पोहोचलो. ती जागा श्री कुलकर्णी व त्यांचे जावई यांच्या नावावर होती. परंतु तिथे बंगला बांधण्यासाठी त्यांना अतोनात अडचणी त्रास होत होता.

मी व माझा शिष्य असे दोघे त्या प्लॉटवर झाडी झुडपं बाजूला करून पोहोचलो.  तिथे नाथांच्या आदेशाने सिद्ध शक्तीला आमंत्रित केले, व त्या जागेवरील तात्काळ अन्य शक्तीचे उच्चाटन केले. काम पूर्ण झाल्याचे आदेश मिळताच आम्ही त्या जागेवरून निघालो.  मी कुलकर्णी यांना म्हटले, तुमची वास्तु सध्या अबाधित आहे. तेव्हा तुमचे काम लवकरच पूर्ण होईल काळजी नसावी.

चमत्कार असा की एका आठवड्यातच त्यांना बंगला बांधण्याची परवानगी मिळाली. काही महिन्यांनी ते राहायला सुद्धा गेले.  परंतु कुलकर्णींनी मला फोन करणे उचित समजले नाही. ही बातमी मला श्री साठे कडून मिळाली. मी  एक तांत्रिक वनस्पती श्री. कुलकर्णींना दिली होती. तिचा प्रभाव इतका झाला की, कुलकर्णी साधनेला बसले असता या वनस्पतीतून हिरवा प्रकाश बाहेर येत असे. 

त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली व त्यांनी मला दिलेल्या शब्दाचा विसर त्यांना पडू लागला. हळूहळू त्यांचे फोन येणे बंद झाले. गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा कुलकर्णी यांनी पुरेपूर आस्वाद घेतला. त्यांना त्यांच्या घरच्यांनी व श्री साठेंनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु एका बँकेचे अध्यक्ष असलेल्या कुलकर्णी यांनी आपल्या कानावर हात ठेवले होते.

अखेर एके दिवशी श्री साठेनी मला फोन करून सांगितले  की, श्री कुलकर्णी यांना दुसरा अटॅक आला आहे. काय करायचे? बेजबाबदार, उद्दाम, मतलबी, स्वार्थी माणसांसाठी आमचे दरवाजे बंद आहेत. कृपया दुसरा दरवाजा ठोठवावा. असे मी साठेंना बजावून सांगितले. लबाड 



Monday 29 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-19

सत्य अनुभव
भाग-१९

Image by Sasin Tipchai from Pixabay 

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेप्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
श्री साठे, हे एका त्यांच्या दगडी चाळ मुंबई, येथील मित्राला घेऊन माझ्याजवळ आले.  त्यांचे नाव धात्री असे होते. त्यांची मोठी मुलगी नववीला, दुसरी सहावीला होती. मोठ्या मुलीच्या पाठीमागे त्या शाळेतील एक अवगुणी मुलगा हात धुऊन लागला होता व ती मुलगीसुद्धा त्यात वाहत चालली होती. मुलगी अभ्यासाने खूप हुशार होती,  परंतु या प्रकरणामुळे तिचेअभ्यासात व्यवस्थित लक्ष लागत नव्हते व या कारणास्तव तिला परीक्षेत गुण कमी मिळत होते. मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीची चिंता हीच चिते प्रमाणे असते. श्री धोत्रे  हे पाणावलेल्या डोळ्यांनी मला सर्व हकीकत सांगत होते.

मी त्यांच्या जवळून सर्व माहिती घेऊन, नाथांचा आदेश घेतला व उत्तर असे आले की,  त्या मुलीला पितृदोष आहे व तिला त्या गुंड मुलाने प्राप्त करण्यासाठी काळ्या विद्येचा प्रयोग केला होता. प्रयोगाद्वारे तिला प्रभावी केले होते. मुलगी हाताबाहेर जाण्याअगोदर तिच्या वडीलांनी तिला नाथांच्या दरबारात आणले होते. 

सिद्ध कवच-उतारा-हवन व साधना या मार्फत ती मुलगी त्या गुंड मुलाच्या तावडीतून बाहेर आली होती. तिच्या अभ्यासातही प्रभावी फरक पडला होता. पुढे ती बी.एस.सी झाली. मेडिकल नंतर सध्या ती डॉक्टरी क्लिनिक प्रॅक्टिस करीत आहे. नाथांच्या कृपेने त्यांचे सर्व व्यवस्थित झाले. 



Sunday 28 June 2020

Ayurveda-Tips-3

हळद

आयुर्वेदामध्ये हळदीला फार महत्त्व आहे. आपल्या रोजच्या जेवणात हळदीला असणारे स्थान सगळ्यांनाच माहिती आहे. हळदीचे अनेक प्रकार आहे. हळदीचे व्यवसायासाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, अभ्यासासाठी, यशासाठी. या सिद्ध हळदीचा चांगला उपयोग होतो.

त्वचा उजळ होण्यासाठी, त्वचा तजेलदार होण्यासाठी, व अनेक आजारांवर, ॲलर्जी, त्वचेवर डाग, खाज कॅन्सरसारख्या रोगावर हळदीचा वापर केला जातो. सर्दी झाली की गरम दूध हळद घालून घेतात.  कफ, खोकला थांबण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर होतो. डायबिटीस वर हळद उपयुक्त असून काविळ, यकृत या आजारांवर लाभदायक आहे. रोजच्या जेवणातून  हळद घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जखम भरण्यास मदत होते. रक्‍त येत असल्यास ते थांबवण्यासाठी  गुण हळदीत आहे.  हळद स्वादाला कडवट, पण आरोग्यासाठी गुणकारी व लाभदायक आहे.

वनस्पतिशास्त्रात काळी हळद,  कुकवी (लाल हळद),  पिवळी हळद,  जांभळी हळद , सफेद हळद याला अत्यंत महत्त्व आहे. अनेक पुजारी  अनुष्ठानासाठी या वस्तूंचा उपयोग करतात.

काळी हळद - हे भद्रकाली चे प्रतीक असून पैशाची आवक वाढण्यासाठी, शत्रुसंकटात रक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो.

लाल हळद - हे लक्ष्मीचे प्रतीक असून पैसे स्थिर राहण्यासाठी पैशाची आवक वाढण्यासाठी या हळदीचा बहुमूल्य उपयोग होतो.

सफेद हळद - सरस्वती मातेचे प्रतीक असून, विद्या यशप्राप्तीसाठी या हळदीचा उपयोग होतो.

जांभळी किंवा निळी हळद  - या हळदीचे उपयोग संमोहनशास्त्रासाठी, नातेसंबंध दृढ करण्यासाठी व्यवसायासाठी, आपली कामे जलद गतीने होण्यासाठी या सर्व वनस्पतींचा उपयोग केला जातो. परंतु या वनस्पती विशिष्ट मुहूर्तावर नक्षत्रावर सचेतक केल्यास त्यांचा उपयोग बहुमूल्य होतो. 

* वरील वनस्पती वाचकांना साधकांना हवी असल्यास संपर्क करावा संपर्क क्रमांक - ९३२६६६२४४१.


योग वल्ली - अजानवृक्ष


अजान वृक्षाची किमया अनेक औषधे बनविण्यासाठी होते. तसेच अध्यात्मात त्याचा सिद्धी साधण्यासाठी उपयोग असल्याचे म्हटले जाते. आताही आपण देहू आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वरांची समाधी आहे,  तेथे त्यासमोर एक भव्य अजानवृक्ष आहे. त्याची फळे, पाने घेण्यास सक्त मनाई आहे. त्या वृक्ष छायेखाली अनेक साधक ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. त्या काळात साधकांच्या ज्ञानेश्वरी पोथीवर पारायण काळात एखादे तरी पान पडले. तरी ते भाग्याचे समजले जाते. व त्या साधकाला सिद्धीसाठी मार्ग सक्रिय होतो. अशी परंपरा आहे. 



हा वृक्ष केवळ नाथांच्या पावित्र समाधी जवळ आढळतो. याच वृक्षाची मुळे त्यांच्या समाधीला टोचत होती. समाधीत बाधा येत असल्याने त्यांनी एकनाथ महाराजांना दृष्टांत देऊन या झाडाखाली माझी समाधी असल्याचे सांगून, त्याची  मूळ, शाखा कापण्यास सांगितले. त्याप्रमाणे एकनाथांनी त्यांच्या आदेशानुसार त्या झाडाची मुळे छाटली.  ज्ञानेश्वरांची भेट घेऊन पुढचा अध्यात्मिक प्रवास त्यांच्या अधिपत्याखाली सुरू ठेवला.  हे आपणा सर्वांना ठाऊक आहे.

श्री ज्ञानेश्वर त्रिकाल ज्ञानी होते. त्यांनी अजान वृक्षाचे महत्त्व जाणून त्यास जवळ केले.  
"अजान रुक्षाचे फळ तेषां मुखी जाण ते सेवन करता म्हणून अजरामर होय निश्चित''

हा वृक्ष फळ मुळासहीत अत्यंत उपयुक्त देह व लोह सिद्धी करणारा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे शरीरातील सर्व व्याधींचे निर्मूलन करतो त्याप्रमाणे धातू परिवर्तनही करतो. असे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे व म्हणून ज्ञानेश्वरांनी तो आपल्या समाधीवर वेलीच्या स्वरुपात ठेवला आहे. याच्या विशिष्ट प्रकाराने नुसते सेवन केले असता अष्टांगयोग साधन प्राप्त होते. असा यासंबंधी दावा आहे म्हणून त्यास योग वल्ली पण नाव आहे.

उपचार -  
  • अजानवृक्ष फळाचे वेलदोड्याबरोबर सेवन केल्यास गर्भधारणा होते, याबरोबर चूर्ण घेतल्यास गुप्त रोगावर उपाय होतो. 
  • बकुळा बरोबर सेवन केल्यास सर्वजण संमोहित होतात.
  • साखरेबरोबर सेवन केल्यास यश प्राप्त होते. 
  • जांभळीच्या सालीसोबत चूर्ण घेतल्यास ब्रह्मंपदसारखा मान-सन्मान मिळतो. 
  • आंब्यासोबत सेवन केल्यास धनुर्विद्या आत्मसात होते.

वरील  लहान वृक्ष वाचकांना, साधकांना हवे असल्यास माझ्याकडून उपलब्ध होईल. याची दखल घ्यावी.
संपर्क. -  9326662441

Saturday 27 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-18

सत्य अनुभव - भाग-१८ (मराठी-हिंदी-English ) 


"गरज सरो वैद्य मरो!''

एके दिवशी मुंबईहून निकीचा मला फोन आला. गुरुजी माझ्याबरोबर सावंत नावाचे गृहस्थ आहेत, ते आपल्याला भेटू इच्छितात. जर भेट झाली नाही तर त्यांना आत्महत्या करावी लागेल. त्यांच्या कळकळीची विनंती वरून मी त्यांना भेटण्याचे ठरले.

माझ्याकडे त्यावेळी संदेश यांचे पितृ देवतेचे हवन सुरू होते व निकी व सावंत हे दोघे माझ्या घरी आले. संदेशने माझ्या सांगण्यावरून सावंतांना पितृदोषाचा मान दिला. काही राजकीय पुढारी व स्थानिक गुंड सावंत यांच्या पाठीमागे त्यांचा जीव घेण्यासाठी लागले होते. आपला व्यवसाय व घर या दोन्ही ठिकाणी ते राहू शकत नव्हते. घरात अडचणी भांडणे व अस्वस्थता यामुळे बेजार झालेले सावंत माझ्यापुढे याचना करीत होते. पुढे आदेशा अंती असे निदर्शनास आले की, त्यांना कुलदेवीची नड होती व त्यांच्या पत्नीसाठी उठवणी - भागवणी केली होती. पर्यायाने त्यांच्या मुलीला झाले होते हा सर्व प्रयोग त्यांच्यावर केला होता.

त्यांच्या घरी कुलदेवीचे हवन केले गेले. परंतु त्यांची मुलगी त्या हवनाला उपस्थित राहू शकली नाही. सावंतावर असलेली काळीजादु, दुश्मन व घरगुती समस्या या त्रिसूत्री चे निरसन करायचे होते.  साधना, जप, देवदर्शन हवन ह्याने त्यांना  मार्ग  मिळत चालला होता. परंतु उठवणी भागवणीची क्रिया सरण्यासाठी तितकीच साधनेची गरज होती. 

माझ्याकडे वास्तव्याला असलेल्या सावंतच्या मुलीने ध्यान धारणेच्या सातत्याने आपल्या साधनेत चांगलीच मजल मारीत होती. तिची साधना एक चांगला अविष्कार घडवीत होती. परंतु तिचे एका मुलावर असणारे प्रेम तिच्या घरच्यांना मान्य नव्हते.  याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत होता.
 
मधू सारखी नापास होत होती. परंतु नाथांच्या कृपेने तिला असणाऱ्या उठवणी भागवणीच्या त्रासाचे निरसन शेवटच्या टप्प्यात होते. बीकॉमची परीक्षा दिली होती व सावंताचे सर्व शत्रू नेस्तनाबूत झाले होते. आणि अनाकलनीय कारणास्तव सावंतानी आपल्या मुलीचे तात्काळ लग्न लावणार असे सांगून माझ्याकडून ते तिला घेऊन गेले. पुढे त्यांनी स्वतःहून आपल्या संपर्क तोडला. पुढे ते कोणत्या अडचणीत सापडले किंवा नाही ते शेवटपर्यंत कळले नाही. परंतु नाथांनी केलेल्या कृपादृष्टीचा विसर त्यांच्या कुटुंबियांना पडला. त्यावेळी त्यांच्या इतर कुटुंबीयांची बरीच कामे  मी पूर्ण पार पाडली होती. शेवटी काय गरज सरो वैद्य मरो.

सौ निमा राहणार मुंबई, हीचे पहिले लग्न अयशस्वी झाले होते. दुसर्‍या लग्नानंतर तिला आपल्या सासरी सासू-नणंदेचा खूप अतोनात त्रास होत होता. नवरा ही व्यवस्थित वागत नव्हता. एकदा तिचे दोन महिन्याच्या मुलाचे गर्भपात झाले होते . माझ्याकडे सौ नीमा व तिचे आई-वडील भेटायला  आले. 

आदेशा अंती असे कळले की नीमा व तिच्या नवऱ्या मध्ये वितुष्ट व्हावे, यासाठी घरच्यांनी अघोर क्रिया केल्या होत्या . त्या दूर करण्यासाठी व नवरा सासू  हे आपल्याला कायमस्वरूपी वशीभूत गुलाम होण्यासाठी निमानी माझ्याकडे वारंवार विनवणी केली. स्वतः डबल ग्रॅज्युएट असल्याने, ती फार फारच हुशार होती. विद्वेषण क्रीया मोडण्यासाठी मी हवन करण्याचे ठरविले व वशीकरणासाठी निमाला एक गुप्त साधना करायला सांगितली.

ती मनापासून रोज गुरु समक्ष साधना व्हावी यासाठी तिने माझ्या प्रवासासाठी गाडीचा खर्च केला. या साधनेसाठी तिने परिश्रम घेतले. नव्वद दिवसातच तिच्या मनाप्रमाणे घडायला लागले. स्वतंत्र राहण्याचा तिचा मानस होता, तो पूर्ण झाला.  तिची सासू तर तोंडाला खीळ बसल्या सारखी गप्प झाली होती. नणंद  कुणीतरी दम द्यावा तशी घाबरली होती. नवरा  तिचा पूर्णपणे गुलाम झाला होता. हा सर्व प्रताप पाहून नीमा चे आई-वडील थक्क झाले. ते माझ्या पाया पडू लागले. तुम्ही माझ्या मुलीचे आयुष्य वाचवले. तुमचे आभार आम्ही कसे मानावेत हेच कळत नाही. त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहत मी म्हटले, माझे नाही श्री गोरक्षनाथ यांचे आभार माना व त्यांना शरण जा. कालांतराने त्यांचाही संपर्क कमी झाला. शेवटी काय गरज सरो वैद्य मरो.

Photo by Ismael Sanchez from Pexels

Friday 26 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-17

सत्य अनुभव - भाग-१७ (मराठी-हिंदी-English ) 


2003 साली माझ्याकडे बोरीवली वरून अमितच्या ओळखीने, पुण्याचे संदेश माझ्या संपर्कात आले. त्यांनी मला फोन केला. नमस्कार, मी पुण्याहून संदेश कुलकर्णी बोलतो आहे. मी ज्या ठिकाणी राहतो तेथील मालकाने केवळ तीन दिवसात घर खाली करण्याची नोटीस दिली आहे. त्या मालकाचे त्याच्या भावंडांबरोबर भांडण झाले आणि जागेच्या भांडणावरून माझ्यावर संक्रांत आली.  मी व माझे आई-वडील असा संसार आहे. आपण कृपया मार्गदर्शन करावे, या संकटावर मात करण्यासाठी काही उपाय सांगावे. 

मी त्यांची संपूर्ण माहिती घेऊन नाथांच्या आदेशाप्रमाणे त्यांना काही सिद्ध तोडगे सांगितले व तुम्हाला प्रखर पितृदोष असल्याने त्याचे हवन करावे लागेल असे सांगितले. त्यावर मी सांगितल्याप्रमाणे संदेश यांनी उपाय केले. परंतु पितृदोषाचे हवन केले नाही. व  त्यांच्या मालकाने तीन दिवसा वरून तीन महिन्याची मुदत दिली. त्यावर संदेश यांनी माझे आभार मानले. तेव्हा त्यांना या दिवसाच्या आत आपण पितृदोष हवन करून घ्या.  असे स्पष्ट सांगितले होते.

तीन दिवसा वरून नव्वद दिवसांच्या मुदतीत संदेश यांनी हवन करून घेतले नाही. आणि जागेच्या मालकाचा रुद्रावतार झाला.  90 दिवसाने यांनी पुन्हा माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व मला अजून थोडी मुदत हवी आहे. मी जरूर पितृदोष हवन करीन आणि त्याला पुन्हा 45 दिवसांची मुदत मिळाली. 

त्या दरम्यान त्यांनी माझ्याकडे येऊन हवन केले व आपले हक्काचे घर असल्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. त्यांचे उत्पन्न व ते विकत घेणारी जागा याचा ताळमेळ न लागल्याने मला प्रश्न पडला,  की हे कसे शक्य आहे? त्यावर संदेशने असे सांगितले माझ्याकडे स्क्रीन प्रिंटिंग चे खूप काम आहे. आम्ही रात्रंदिवस काम करू. तसेच आई जेवणाचे डब्याचे काम करते. व काही गरजू विद्यार्थ्यांना आम्ही घरी भाड्याने जागा देऊ. त्याचे मिळणारे पैसे, वडील सुद्धा काम करतात. त्यामुळे तिघांच्या उत्पन्नात सर्व ठीक होईल. 

घर विकत घेण्यासाठी स्वतःचे पैसे,  बँकेचे कर्ज असा मेळ असतो. परंतू त्यांच्याकडे घर  घेण्यासाठी पैसे नव्हते.  शेवटी पतपेढी, मित्र, आप्तेष्ट यांच्या सांघिक बळावर तसेच चमत्कारिकरित्या होणारी सहज कामे यावरून गुंठेवारी प्रकरणात बँक कर्ज देत नसतानाही यांचे खास कर्ज मंजूर झाले. 

Photo by Sippakorn Yamkasikorn from Pexels

हा सर्व चमत्कार नाथांचा होता!  त्यांनी ठरवलं तर मातीचे सोने होते. हा माझा तंतोतंत विश्वास सार्थ ठरला. पुढे संदेश स्वतः आपल्या आई-वडिलांना घेवून आपल्या मोठाल्या घरात राहण्यास गेले. नाथांच्या आशीर्वादासाठी त्या वास्तूचे वास्तूबंधन करून घेतले. अप्रतिम सोहळ्यानंतर आमचा पाहुणचार झाला. मला या वास्तूत तुमची गादीस्थान व्हावी अशी इच्छा आहे. असे संदेश ने सांगितले. परंतु आपण पुढे पाहू असे सांगून मी ते टाळले.

काही महिन्याने संदेशच्या आईचा मला फोन आला, महाराज  नमस्कार, संदेश सकाळी अकरा वाजेपर्यंत झोपून असतो. त्याची कामे सर्व अपूर्ण आहेत. काही पार्टीने आपली कामे परत नेली आहेत. तर काही जण बोंबाबोंब करीत आहे. तुम्ही त्याला जरा समजवा. संदेशला विचारल्यावर त्यांनी तसे काहीही नसल्याचे सांगितले. तरीसुद्धा मी दखल घेईन.  

परंतु काही दिवसांनी कर्जदार दार ठोठावू  लागले. आता अंथरूण तोकडं पडत असल्याचा अंदाज त्यांना आला पण उशीर झाला. १ कर्ज घेण्यासाठी-फेडण्यासाठी दुसरे कर्ज असा क्रमवार सुरू झाला व घरातली मंडळी बेजार झाली काय हो? हे असे किती दिवस चालणार आहे? नाथांचे हवन चांगल्यासाठी केले होते सर्व उलटे कसे झाले या संदेशाचा आईच्या प्रश्नाने माझे मन विच्छिन्न झाले. 

मी मला प्रश्न करू लागतो या व्यक्ती स्वतःच्या कर्मफळाचे भोग माझ्या व नाथाच्या माथी मारत आहे. मी त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली व पुन्हा त्या प्रकारे त्यावर त्यांनी सुधारणा करून पुढील मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.

आज मितीस ते माझ्यासोबत जीव ब्रह्म सेवा करून सुखाने राहत आहे.

Thursday 25 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-16

सत्य अनुभव - भाग-१६ (मराठी-हिंदी-English ) 


 चेंबूर येथून एक महिला माझे घर शोधत गाडी घेऊन आली. त्या महिलेची आई वय वर्षे 75, यांना खूप विचित्र त्रास होता. त्या महिलेच्या आईला सर्व अंगावरती सुई  टोचल्यासारखे  वाटायचे. कोणीतरी आपला जीव घेत आहे. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे. असे वाटायचे, अंगकाठी सुदृढ असून त्या रोज रडायच्या. 

ठरल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी वास्तूबंधन केले। आईला सिद्धकवच धारण करण्यासाठी  दिले. त्यामुळे घरात येणाऱ्या शक्तीला बंधन झाले व ती शक्ती घराच्या बाहेरून आईला तिच्या नावाने हाक मारू लागली.  हे सर्व दृश्य स्वतः बघून आम्हाला सांगत असे. अंगाला टोचणाऱ्या सुया आता बंद झाल्या. बाहेरची शक्ती घरात शिरण्यासाठी तळमळत होती. आई भीतीपोटी घराच्या बाहेर जात नव्हती. मी त्यांना काही प्रयोग करण्यास सांगितले होते. 

घरातील सर्व मंडळी उच्चशिक्षित असल्याने त्यांना हा सर्व आभास वाटत असे. परंतु आईच्या त्रासापुढे सर्वच हतबल झाले होते. पुढे नवनाथांचा याग करून त्या शक्तीचा कायमचा निकाल लावला व हे प्रकरण निकालात काढले. शेवटी सर्व किमया ही नाथांची असल्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी त्या कुटुंबाला अहमदनगर पाथर्डी - वृद्धेश्वर देवस्थान,  मायंबा,  मढी येथे जाण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे हे कुटुंब तिथे जाऊन नाथांचे दर्शन घेऊन आले. आज रोजी हे कुटुंब त्यांची आई सुखी असून नाथांचे आभार मानतात व दरवर्षी नवनाथ याग माझ्याकडून करून घेतात. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीचे निरसन करायला माझ्याकडे येतात.  आज अनेक कुटुंबांना नाथामुळे मार्ग मिळाला आहे.

एकदा बोईसर येथून काही व्यक्ती माझ्याकडे आल्या. आणि महाराज माझ्या घरी बेडरूममध्ये जमिनीतून मला बाहेर काढ, असा आवाज येतो. आम्ही काही मांत्रिकाना या ठिकाणी नेल्यावर असे समजले की, त्या ठिकाणी गुप्तधन आहे. परंतु ते काढायला गेल्यावर मांत्रिकांना रक्ताच्या उलट्या होतात. कृपया आपण आमच्या समस्येचे निवारण करावे. 

आदेश घेऊन मी त्यांच्यासोबत ठरल्या वेळेप्रमाणे त्यांच्या गावी गेलो.  बोईसर चिंचणी येथे त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी ती जागा (आवाज येत असलेली)  मला दाखवली. मी त्या जागेवर जाऊन याचा अंदाज घेतला व नाथांना आदेश केल्यावर असे समजले की,  तिथे मोठ्या कडईत सोने वगैरे काही नसून, तिथे ग्रामदैवताची पंचधातूची मूर्ती होती व ती पवित्र सात्विक असल्याने तिच्यावर बोकड-कोंबडी यांचा बळी दिल्याने त्या त्या मांत्रिकाने रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या.  



मी त्या व्यक्तीस वरील हकीकत सांगितल्यावर त्यांचा त्यावर विश्वास बसेना. त्याला गुप्तधनाने पछाडले होते. परंतु त्यांचा भ्रम दूर करावा लागला. आज तिथे ग्राम देवीचे मंदिर झाल्याचे समजले. कारण आम्ही त्या घरातून त्या व्यक्तीच्या गुप्तधनाच्या नगरीतून परतलो होतो. त्या काळात माझ्याकडे अनेक गुप्तधनाच्या केसेस आल्या परंतु अनेकांना माझ्याकडून नाथांच्या कृपेने अनमोल मार्गदर्शन मिळत गेले आहे. तुझे आहे तुझ्या पाशी, तीही शांती मिळाली. अनेकांना केवळ काही अद्भुत तोडग्यावरच मार्ग मिळाला.

Wednesday 24 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-15

सत्य अनुभव - भाग-१५ (मराठी-हिंदी-English ) 


मी सोहम कार्यालयातून घरी परतण्यासाठी निघणार तोच, एक व्यक्ती हातात सोहम भगवती दीपावली 2002 चा अंक घेऊन मला विचारत होते की,  ज्ञानेन्द्रनाथ कुठे आहेत. सोहम भगवती चे ऑफिस ना ! 

मी म्हटलं हो, आपला परिचय, त्यावर त्या गृहस्थाने मी श्री साठे. राहणार मुंबई , एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. त्यावर त्यांनी माझ्याकडे त्यांच्या काही समस्या सांगितल्या. त्यातील प्रामुख्याने असलेल्या समस्या अशा की, त्यांनी एका व्यक्तीस उदार पैसे दिले होते. त्यांच्या मते ती व्यक्ती कोणी एक महाराज होती. परंतु ज्या वेळेस त्या महाराजांकडे पैसे मागायला जात असे,  त्यावेळी श्रीयुत साठे आजारी पडत असे. 

साठेशी बोलत असताना मला साठे यांचे घर दिसले. घरातील देवघर दिसले व त्या देवघराच्या खाली जाड लोखंडी खिळा ठेवलेला दिसला. त्यातून अशुद्ध निघणारी किरण मला स्पष्टपणे दिसत होती. त्यांच्या घरात मी नजर आणखीन भरभर फिरवत होतो. मी लगेचच त्यांना सांगितले की तुमच्या घरात अशा ठिकाणी एक वस्तू आहे तात्काळ जाऊन समुद्रात टाकून द्या.  त्यावर लगेच त्यांनी होकार दर्शवला व तुम्ही माझ्या घरी वास्तूपरीक्षणाला या.  अशी विनंती केली. 

Photo by ArtHouse Studio from Pexels

एके दिवशी ठरवून मी त्यांच्या घरी वास्तू परीक्षणाला गेलो.  त्यांच्या घरात फक्त मीच होतो.  त्यांचं घर संपूर्ण बाजूने बंद केलेले होते. ती ग्रील उघडून आम्ही दोघांनी घरात प्रवेश केला. वास्तु परीक्षण झाल्यावर मी देवघराच्या इथे बसलो व साठेंना बाहेरच्या हॉलमध्ये बसायला सांगितले.

साठे यांनी त्यांच्या गुरूंकडून मंत्र घेतल्यामुळे मी त्यांना तो गुरुमंत्र जपास सांगितला व मी सुद्धा आपला गुरु मंत्र म्हणत बसलो व त्यांना सक्त ताकीद दिली.  की कुणीही आवाज दिला किंवा दरवाजा ठोठावला की तुम्ही त्याला उत्तर देऊ नका. त्यावर ते असे म्हणाले की, इथे कुणी येण्याची शक्यता नाही. कारण की मी सर्व बाजूनी लोखंडी दरवाजे लावून घेतले आहे. जप करून केवळ दहा मिनिटं झाली असतील की, इतक्यात त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा कुणीतरी जोरात ठोठवायला सुरुवात केली.

घरातील अज्ञात शक्तीची उपस्तिथी चक्क जाणवत होता. त्यानंतर पन्नास-एक कावळे एकदम त्यांच्या किचनच्या कठड्यावर येऊन बसले  व जोरजोरात कर्कश आवाज करू लागले. गुरु मंत्राचा प्रभाव जसा वाढू लागला, तशी शांतता वाढू लागली. मी काही गोष्टींचा आदेश घेत गुरु प्रणालीला नमस्कार करून उठलो व बाहेर बसलेल्या साठेकडे जाऊन त्यांना डोळे उघडण्यास सांगितले.

डोळे उघडल्यावर साठेंनी मला असे सांगितले दरवाजे ठोठावणे, कावळ्यांचा कर्कश्श आवाज व माझ्या स्वतःच्या डोक्यात कोणीतरी जोरात हातोडी मारतो आहे, असे जाणवले त्यावर मी त्यांना सांगितले की तुमचे गुरु हे स्वतः कमकुवत आहे व त्यांना आपली साधना सुधारायला हवी.  माझा हा निरोप तुमच्या गुरुना  द्या. 

साठे यांचे गुरु हे नामांकित असून तेव्हा (सन २००२) त्यांचे 3000 शिष्य होते. गुरूंच्या भेटीनंतर साठेंनी घडलेला सर्व प्रकार आपल्या गुरुंना सांगितला. त्यावर त्यांनी हमी दर्शवत हे सर्व सत्य आहे, मला स्वतःला साधनेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, ही खंत व्यक्त केली.  

अज्ञात शक्तीबद्दल साठेंना मी तोडगे व उपाय सांगितले. गेली अनेक वर्षे ते स्वतः करू शकले नाही. परंतु त्यांनी माझ्याकडे अनेक पीडित व्यक्ती आणल्या व त्यांना संकटातून सुटकेचा मार्ग दाखवला मधल्या काळात साठे यांनी इतरांकडून अनेक प्रयोग करून घेतले परंतु ते सर्व अयशस्वी झाल्याचे दिसले कदाचित त्यांचे कार्य माझ्याकडून पूर्ण व्हावे यासाठी तो योग आलेला नाही असे समजतो शेवटी नाथांची इच्छा.

पंधरा वर्षानंतर श्री साठे त्यांना सांगितलेले उपाय करण्यास तयार झाले. परंतु या काळात त्यांच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली होती. पत्नी त्यांच्याशी नीट वागत नव्हती (डिव्होर्स), त्यांच्या मुलाला कॅन्सर झाला होता (मृत्यू). कर्ज खूप वाढले होते. लोकांनी त्यांची फसवणूक केली होती. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत होती.

श्री साठे यांचे प्रश्न परत पाहण्यात आले व त्यांना काही उपाय मी सांगितले ते उपाय करण्याची त्यांनी तयारी दर्शविली. पण खूप उशीर झाला होता. या सर्व कालावधीत त्यांच्या मुलाचे निधन झाले. त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. साठे स्वतः गुरु बनून इतरांचे प्रश्न सोडवत होते. अनेकांना छोटे-मोठे तोडगे देणे, वास्तू परीक्षण करणे ही कामे स्वतःच करत होते. हे सर्व करत असताना त्यांच्या जीवावर बेतले. त्यांना पॅरालीसेसचा अटॅक आला. मरणाच्या दारातून ते परत आले.

ते  स्वतः सुरक्षित राहिले ते केवळ ते केवळ त्यांच्या घरचे वास्तुबंधन व सिद्धकवच यामुळे. सोबत त्यांना मंत्रदीक्षा दिली होती. शेवटी नाथांची किमया. 

Tuesday 23 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-14

100% Original and Natural One Face / Ek Mukhi / 1 Mukhi Rudraksha. One Face / Ek Mukhi / 1 Mukhi Rudraksha is the king of all Rudraksha. Energized by Acharya Dr. R.D.Bhardwaj The shape is half-moon/ cashew nut and the color is brown. A person wearing One Mukhi Rudraksha is able to lead a rich and powerful life by the blessings of Lord Shiva

67% OFF OFFER

ASTRO HUB® 1 Mukhi Rudraksha with Certificate / 1 Mukhi Rudraksha with certificate Nepal / 1 मुखी रुद्राक्ष, 1 Mukhi rudraksha original certified / 1 Mukhi Rudraksha Nepal / 1 Mukhi rudraksha original / 1 Mukhi rudraksha certified / 1 Mukhi rudraksha - spiritual awakening
सत्य अनुभव - भाग-१३ (मराठी-हिंदी-English ) 


सोहम भगवती मासिक वाचून येणारे पहिले गृहस्थ हे ठाण्याचे होते.  त्यांचे नाव श्री शिंदे, वय वर्ष 50 स्वभाव उग्र व सडेतोड असा होता. माझ्या भेटीला आल्यावर त्यांनी आपल्या समस्या मला सांगितल्या. माझी खूप ठिकाणी फसवणूक झाली आहे. तेव्हा जर मला इथे न्याय मिळणार असेल, तरच मला मार्ग द्या. 

नाथांच्या आदेशावरून मी त्यांना एक मुखी रुद्राक्ष दिला.  तसेच 12 झटपट तोडगे जसेच्या तसे दिले व त्यांना एका आठवड्याने परत संपर्क करायला सांगितला. त्याप्रमाणे ते एका आठवड्याने माझ्या भेटीला आले. महाराज तुम्ही दिलेल्या वस्तू व तोडगे खरच विलक्षण आहे.

सर्वप्रथम तुम्ही महाराज, वगैरे वाटत नाही व  त्या वस्तू व तोडगे म्हणजे मला सारे काही फसल्यासारखे वाटत होते.  म्हटलं पुन्हा एकदा माझी फसवणूक झाली. पण मी चुकीचा होतो. माफ करा, जरा स्पष्टच बोललो काहीतरी अगाध आहे. मी म्हटलं ठीक आहे. प्रशंसा नको. ही सारी नाथकिमया आहे. तेच खरे किमयागार आहे. मी केवळ निमित्तमात्र आहे.  तेव्हा आभार त्यांचेच माना !........

पनवेल ठिकाणाहून त्यावेळेस एक बिल्डर माझ्याकडे आले व माझ्याकडे असलेल्या वनस्पतीचा भाव करू लागले  व तुमच्या सर्व वनस्पती मी विकत घेऊ शकतो. असे म्हणाले माझे स्वतःचे दोन फ्लॅट पनवेलमध्ये असून ते विकले जात नाही. जो कोणी विकत घ्यायला येतो. त्याला काही तरी अपाय होतो. यावर तुमच्याकडे काही तोडगा आहे का?  

मी म्हटले आपल्या जागेचे वास्तू परीक्षण करावे लागेल. तुमच्या गुरुकुलला लागणारी जागा मी सहजगत्या पाली येथे देऊ शकतो. तिथे एक माताजींचे मठ आहे. तो बिल्डर म्हणाला, त्या बिल्डरला एकंदरीत आपले स्वतःचे काम करून घ्यायचे होते. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्यांच्या व्यवसायात त्यांना अचानकपणे मोठे नुकसान झाले व त्यांचे सर्व मनसुबे धुळीला मिळाले.

Monday 22 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-13

Good Quality Ceramic Aroma Burner. Size 4 Inch About. The Main Benefit Of This Product Is You Can Use Any Tea Candle / Oil In It, Can Be Take Separately. Easy To Clean And Re-Use As Long You Want. Best Option To Gift In Any Occasion

50% OFF OFFER

Pure Source India Ceramic Clay Aroma Burner (Black_4 Inch) - spiritual awakening

सत्य अनुभव - भाग-१३ (मराठी-हिंदी-English ) 


एके दिवशी मला एका महाराजांचा फोन आला.  महाराज कैसे हो,  एक समस्या है, आपकी मदत चाहीये, क्या आप मेरे पास आ सकते हो?  मे गाडी भेजता हुं. मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या भेटीला गेलो. माझे  आवभगत  चांगले झाले.

मला तोवर कल्पना नव्हती की, यांनी मला का बोलावले आहे ? थोड्या वेळाने तिथे कुणी एक सावकार आला, मला नमस्कार केला. महाराज मला म्हणाले,  महाराज, हे गावके सावकार है, इनकी ये समस्या है, की, इनके घर मे एक जगह से आवाज आती है, मुझे यहा से बाहर निकालो. और  इनको सपना भी गिरता है की उस जगह  शायद धन है, तो कृपया इसे आप जाच ले, मी म्हटलं की ठीक आहे. ईथपर्यंत आलो आहे तर  काय भानगड आहे ते एकदा पडताळून पाहू या.

माझ्या ज्ञानाची उजळणी म्हणून मी व माझ्या  शिष्य त्या सावकारासोबत त्याच्या घरी गेलो. त्या घराच्या पोट माळ्यात प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचे ओम शांती यांचे प्रवचन क्लासेस सुरू होते. सावकाराने त्यांना आवर्जून चालूच राहू दे, असे सांगितलं मला त्यांचा रुबाब कळला होता. त्यांनी त्यांच्या त्या जागी जिथे आवाज येत होता तिथे नेले. मी माझा शिष्य व सावकाराची दोन माणसं असे त्या जागेत उभे होतो.  

मी आदेश संकेत घेतल्यावर तेथील माती थोडी ऊकरायला सांगितले, तर त्यातून जुनी नाणी बाहेर आली. ती सर्व एकत्र केली व थोडे संकेताच्या दिशेने खणायला सुरुवात केली. तर तिथे मला तेली हाड मिळाले. तेली समाजाच्या माणसाच्या पायाचे हाड होते तांत्रिक क्रियेत वापर करण्याची तांत्रिकाची सवय असते. महाराजांना निरोप पाठवला की इथे वेगळा प्रकार आहे त्यावर महाराजांनी मला परत येण्यास सांगितले. 

Photo by Mark Rz from Pexels

मी पुन्हा महाराजांकडे गेलो व त्यांना झालेला प्रकार सांगितला त्यावर ते म्हणाले, अब आया उंट पहाड के नीचे,  सावकार से कम से कम पचास हजार रुपये मिलेगा, बस आप कुछ मत बोलो, मी म्हटलं मला यात काहीही स्वारस्य नाही. मला माझ्या घरी परत पोहचत करा. अरे आपको पैसा कमाने नही आता, मी म्हटलं ठीक है. महाराज माझ्या नजरेतून पार उतरला होता.

अशाच एका भटकंतीत मला मुंबईत एक (स्मगलर?) भेटला. जो पैशाने गडगंज होता. तो आतापर्यंत बऱ्याच बाबांना भेटला होता. परंतु त्यात त्याला बरेच भोंदू भेटल्यामुळे त्याला सर्वच साधक बावळट वाटत होते. त्याच्या घरात गुप्तधन असल्याचा दावा तो करीत होता. मी त्याला या भानगडीत पडू नका, असे म्हटल्यावर तो खवळला व म्हणाला ज्याच्यात ताकद आहे तोच हे काम करू शकतो.

माझा प्रश्न, ताकद म्हणजे काय?  साधक जेव्हा साधना करतो. तेव्हा परमेश्वर त्या साधकाला ताकद देत असतो.  त्याचा वापर त्यांनी कुठे करायचा, त्याचा अधिकार तुम्हाला नाही. जर माझी ताकद बघायची असेल तर तो समोर पसरलेल्या अथांग सागरात जे  दिसते आहे. तिथे फक्त आपण दोघे जाऊ या . माझा अविर्भाव पाहून, तो कदाचित खचला असावा. नको पुन्हा केव्हा तरी आपण भेटूया. 

हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एक सफारी घातलेल्या आडदांड व्यक्तीने पहिला. तो म्हणाला तुम्ही अध्यात्मातून लोकांची कामे करतात. हे तुमच्या आमदारांना माहित आहे का ? मी म्हटले नाही. माझे केवळ एवढेच म्हणणे आहे की, कुठल्याही साधकाची लायकी कुणीही ठरवू नये. कारण त्याचा हिशोब करणारा जो सर्वत्र आहे तो परमेश्वर करण्यास समर्थ आहे.

माझ्या साधना काळात आलेले अनुभव खूपच बोलके असल्याचे मला वाटते परंतु असे अनेकांना अनेक अनुभव येतच असतात म्हणून कोणी थोर होत नसतो मी देखील माझे कर्तव्य म्हणून लोकांची कार्य अगदी झपाटल्यासारखा करीत होतो. (अजूनही करीत आहे)  मी माझ्या गुरूंना दिलेल्या जीवब्रह्म सेवेच्या वचनात कटिबद्ध आहे.

भ्रमंती करीत असताना माझ्या हे लक्षात आले की,  समाजात देवाच्या नावाखाली अनेकांची चक्क लूटमार होत आहे आपल्याला मिळालेले ज्ञान हे सामान्य लोकांपर्यंत गेले आहे. तेव्हा कुठल्यातरी मार्गाने समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. पुस्तक रुपाने हे समाजात यावे असे वाटले म्हणून नाथाकडे यासाठी आदेश विचारला तेव्हा सोहम भगवती या मासिकाची दिशा मला दाखवली गेली व तसा श्रीगणेशा केला तो आजतागायत सुरू आहे

Sunday 21 June 2020

Ayurveda-Tips-2

Natural & Safe | For All Skin Type | Contain NO PARABEN, NO MINERAL OIL, NO ARTIFICIAL COLOR, NO ARTIFICIAL PERFUME, NO SILICON & NO CHEMICAL BASED STABILIZERS

62% OFF OFFER

Khadi Global Retinol Deep Wrinkle Repair Serum With Vitamin C Serum, Vegan Glutathione, Vitamin E & Tea Tree Extract Anti-Wrinkle Serum, Best Retinol Serum 30ml - Ayurveda




खोकल्यावर उपाय  
1) सतत खोकला-कफ, बारीक ताप येत असेल पर दहा ग्रॅम अडुळशाचा रसात दहा ग्रॅम मध व अर्धा ग्रॅम पिंपळीचे चूर्ण घालून त्याचे चाटण वरचेवर घेत जावे. घसा मोकळा होतो व बरे वाटते.

2)  कांद्याच्या रसात मध मिक्स करून प्यावे, खोकला नाहीसा होतो.

3) लिंबाच्या रसात त्याच्या चार पट मध मिक्स करावे व चाटावे खोकला दूर होतो.

4) लवंग तोंडात धरून चोखल्यास खोकला मिटतो.

5) एक चमचा मध व दोन चमचे आले रस पिण्याने खोकला जातो.

6) थोडा हिंग शेकून त्याला गरम पाण्यात मिसळुन पिण्याने खोकला जातो.

7) थोडा खजूर खाऊन वर थोडे गरम पाणी पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो व खोकला व दम जातो.

8) रात्री मिठाचा खडा तोंडात धरल्यास खोकला कमी होतो.

9) पुदिन्याचा रस पिण्याने खोकला जातो.

10) कोमट पाण्याबरोबर ओवा खाल्ल्याने खोकला बरा होतो.

11) गरम केलेल्या दुधात हळद व तूप घालून प्यावे खोकला व कफ जातो.


ओवा


  • ओवा हा पदार्थ साधारणपणे प्रत्येकाच्या घरात असतो गृहिणी याचा उपयोग मसाल्यासाठी करतात पण हा छोटा औषधी ओवा सुद्धा आहे.

  • सर्दी-पडसे आधी मध्ये ओवा अत्यंत उपयोगी आहे यासाठी ओवा उकळून त्याचे पाणी पिणे आराम मिळतो.

  • ओवा चावून खाणे अथवा धुरी घेणे सर्दी-पडशाचा लाभकारी आहे पोटामध्ये कृमी झाल्यास आवळ्याची पावडर घ्यावी.

  • कोरडा खोकला असल्यास ओवा पानामध्ये ठेवून चावावे.

  • भूक लागत नसेल तर ओवा सुंठ काळी मिरी आणि आणि मीठ वाटून पाण्याबरोबर घ्यावे.

  • जुनी जखम पोट फुटकुळ्या अथवा गजकर्ण खाज यामध्ये ओवा पाण्यामध्ये वाटून लावल्याने लाभ मिळतो .

  • ओवा, काळे मीठ व हिंग बारीक वाटावे पोटदुखी झाल्यास वरील मिश्रण अर्धा टी स्पून दिवसातून दोन वेळा पाण्याबरोबर घ्यावे हे एक रामबाण औषध ठरते.

  • ओव्याच्या काड्याने डोके धुतल्यास डोके स्वच्छ व निरोगी होते.

  • ओव्याचे सरबत पिण्याने हात पायांच्या कंपनाच्या स्थितित चांगलाच आराम मिळतो.

  • लहान मुलांना होणाऱ्या उलट्या जुलाबा मध्ये ओवा आईच्या दुधाबरोबर वाटून देण्याने लाभ होतो.

  • ओव्याचे चूर्ण ताकाबरोबर घेतल्यास पोटातील कृमी शिघ्र नष्ट होतात.

100% Taste the purity of pro-nature organic spices Ajwain (Jeera). Ajwain seeds are derived from a herb plant that is originated in India, No artificial colors, fresh and pure One can use in all types of curries, cooked vegetables, and pickles. Rich in fiber, Minerals, Vitamins, Anti-oxidants, Effective for cough and cold, Cures abdominal pain We handpick the best carom seeds to ensure quality. It is then carefully packed for premium quality cooking. All TRH spices & seeds are hygienically packed and undergo stringent and rigorous laboratory tests to meet FSSAI food safety norms. Net Weight: 200g




हाताजोडी


या वनस्पतीची उत्पत्ती भारतात गिरनार पर्वत, पहाड, मथुरा, कोकणपट्टी डोंगरी भाग तसेच भारताबाहेर इराण,  फ्रान्स, जर्मनी या देशात होते. या वनस्पतीचे सर्वाधिक प्रचलित नाव हातजोडीच आहे. याचे मूळ गोल कंद व मांसल असते . मुळापासून पाने व फुले येतात. पाने अंड्याच्या कृतीची हिरव्या रंगाची पानांची खालची बाजू सफेद रंगाची लवदार असते. फुले निळ्या सफेद रंगाची पाकळ्या बाहेर वळलेल्या असतात. ही वनस्पती डुकरे फार खातात. वनस्पतीत एक विषारी द्रव्य असतो ही वनस्पती इतर झाडांच्या जमिनीवर उगवते हिचे औषधी व तांत्रिक उपयोग आहे .


https://sohumbhagwati.org/


औषधी उपयोग -

गंड माळेत गाठीच्या भोवतालचा शोथ कमी होण्यास ह्याचा लेप करतात, उदररोगांत शौचास  साफ होण्यास लेप करतात. मासिक धर्म व्यवस्थित नसेल तरी याचा उपयोग होतो. कावीळ झाल्यास हातजोडीचे चूर्ण मधातून रोग्यास दिल्यास रोग्याच्या शरीरातून पिवळ्या रंगाचा घाम येऊ लागतो, तो टॉवेलने पुसून घ्यावा रोग्याच्या अंगावर घोंगडी घालावी. हातजोडी कावीळ रोग समूळ नष्ट होतो.  परंतु औषध जाणकारांच्या सल्ल्यानेच घ्यावे. अन्यथा घेऊ नये.


हातजोडीचे तांत्रिक उपयोग -

ही वनस्पती पारद शिवलिंग बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हा जोडी जवळ ठेवल्याने साधकावर परमेश्वराची कृपा होते.  कुलदेवता प्रसन्न होते. घरात धनसंपदा अन्नधान्याची भरभराट होते.  ही वनस्पती सिद्ध करून बाळगावी तसेच कोर्टकचेरीच्या कामात यश मिळते. शत्रुंपासून त्रास होत नाही.


मी स्वअनुभवाच्या आधारावर सांगू शकतो की, खरोखरच हातजोडी तंत्र जगताची एक अद्भुत अति प्रभावी चमत्कारिक विचित्र वस्तू आहे. माझा अनुभव आहे जर हातजोडी जिवंत मुहूर्त नक्षत्र योग पाहून सिद्ध केल्यास साधकास तंत्र साधनेत कित्येक उपलब्धी चे स्वामित्व प्राप्त होऊ शकते सावधान आजकाल बाजारात काही लोक नकली हात जोडी विकू लागले आहे. या वनस्पतीची आवश्यकता असल्यास वाचकांनी संपर्क साधावा. Click 



काळी गुंज

ही गुंज वनस्पती दुसऱ्या झाडाच्या साह्याने वर चढते, पाने चिंचे सारखी दिसतात. फुले तुर्यानी येतात. शेंगा एक इंच लांब झुबक्यांनी येतात. गुंजेच्या तीन जाती आहेत काळी, सफेद, लाल गुंज. 


https://sohumbhagwati.org/


औषधी उपयोग - 

गुंजेचा पाला वाटून बांधल्याने शोथ कमी होतो. लघवीची जळजळ कमी होते. खोकल्यावर या पाल्याची गोळी तोंडात धरतात या वनस्पतीचा धर्म मधुर स्नेहन कफनाशक मूत्रजनन व्रणरोपण आहे.


तांत्रिक उपयोग -
वरीलपैकी काळी गुंज ही अत्यंत दुर्मिळ अद्भूत व चमत्कारी वस्तु आहे. ही वनस्पती तिजोरीत अथवा देव्हाऱ्यात ठेवल्यास लक्ष्मी मातेची कृपा राहते. तंत्रशास्त्रात ही एक अत्यंत अद्भुत चमत्कारिक वनस्पती आहे .

Saturday 20 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-12

भाग-१२

(मराठी) 

सत्य अनुभव 

 मुंबईत  मूळ रस्त्यात अगदी मधोमध एका व्यक्तीची प्रॉपर्टी होती. जुनेपण मोठे असे कौलारू छप्पराचे घर होते. एकत्रित कुटुंब पद्धतीत राहणारे मराठी कुटुंब होते. परंतु त्यांच्या घरी दरवर्षी नियमित एखादी व्यक्ती मृत्यू पडत असून घरी सुतक चालूच असे. माझ्याकडे प्रकरण आल्यावर नाथांचा आदेश घेऊन, मी त्यांच्या घरी त्या कुटुंबाला भेटायला गेलो.  

त्यांच्या दारात एक भला मोठा वृक्ष होता. जणू तो सर्व घटनांचा साक्षीदार होता. मी त्यावर हात ठेवून मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर ते झाड खूप हालयला लागले.  जोरात सोसाट्याचा वारा सुटला व ते झाड कण्यायला लागले. मला त्यांचे  विवळणे कळत होते. त्याला फारच वेदना होत होत्या. त्या झाडाने त्या कुटुंबाचा इतिहास पाहिला होता. तो  क्षण खरोखरीच भारावून टाकणारा होता. माझ्यासोबतचे सारेच आश्चर्यचकित झाले होते. कारण इतक्यावर्षात ते झाड कधीही कणून विवळलेले नव्हते. मी ठीक आहे, असे म्हणत त्या झाडावरचा  हात काढला  व त्या कुटुंबासोबत त्या घरात गेलो. 

घरात गेल्यावर मी त्यांच्यातील एकाला विचारले की, तुम्ही या घरचे मुस्लिम पद्धतीने वास्तु बंधन करून घेतले आहे का? त्यावर ती व्यक्ती म्हणाली की, नाही आम्ही खरंच तसे काही केले नाही! पण माझे संकेत हे खोटे नसणार हा माझा ठाम विश्वास होता. तुमच्यापैकी कुणी कोंबडीच्या अंड्यावर काजळ लावून कुठे ते ठेवले आहे का? हा माझा प्रश्न त्या कुटुंबीयांना होता त्यावर पुन्हा नाही असे उत्तर मिळाले.

सुरुवातीला हे सर्व जवळजवळ खोटे बोलतात हा माझा अनुभव मला सांगत होता. इतक्यात आतून काका बाहेर आले व मला विचारले, तुम्ही काय प्रश्न केलात त्यावर मी पुन्हा तोच प्रश्न केला.  त्यावर काका म्हणाले,  हो मी स्वतः वरील क्रिया एका बंगाली बाबांच्या सांगण्यावरून केली होती.

हे उत्तर मला अपेक्षित होते. फार वाईट झाले, ठीक आहे, नाथ त्यातून आपल्याला नक्की मार्ग देतील. मला एक वाटी तांदूळ व  थोडा कापूर द्या. मी घरातील व्यक्तींना सांगितले, आणि आमच्यात बसलेल्या त्या अज्ञात अदृश्य शक्तीने आमच्या सर्वांदेखत चुटक्या वाजवल्या. जणू ती मला आव्हान देत होती. हे दृश्य याची देही याची डोळा सर्वांनीच पाहिले, आणि प्रत्येकाची भंबेरी उडाली. घरातील स्त्रिया कावऱ्याबावऱ्या झाल्या. त्यांना दिलासा देत मी वरील साहित्य मागविले त्याप्रमाणे त्यांनी ते मला आणून दिले.  ते मी त्या घरातील मेजवर ठेवले. त्या वाटीतील तांदळावर कापूर टाकला व पेटवला त्यावर माझ्या जवळ असलेली नाथांची सिद्ध विभूती टाकून मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि... 

https://www.pexels.com/photo/photo-of-wooden-house-in-forest-3363341/


त्या वाड्यातल्या स्वयंपाक घरातून सर्व भांडी धडाधड खाली आपटू लागली. माझ्या मंत्राचा प्रभाव त्या शक्तीवर होत होता. ती शक्ति अस्वस्थ झाली होती. खरं तर त्या शक्तीचा यात दोष नव्हता, कारण त्या घरातल्या कर्त्या पुरुषाने त्यांची घरी येऊन त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. चुकीच्या उताऱ्यामुळे हा जीवघेणा प्रकार घडला होता. आणि त्यामुळेच त्या घरातील एक व्यक्ती एका वर्षाला बळीच्या रुपात ती शक्ती हक्काने घेऊ लागली. कारण त्या शक्तीचे आमंत्रण केले होते.  परंतु त्यांच्या भोगाचा विचार केला नव्हता.  परंतु नकळतपणे घडलेल्या चुकीची दुरुस्ती करण्याची वेळ आली होती. नाथांच्यापुढे साऱ्या शक्तीनाच नमन करावे लागले आहे. तेव्हा या शक्तीचा बचाव शक्य नव्हता.

मी तुम्हाला तीन दिवसांची मुदत देतो, या दरम्यान तुम्ही नाथ याग करुन वास्तू बंधन करून घ्या. असे मी त्या घरच्या मंडळींना सांगितले मी त्यांना एक नारळ अभीमंत्रून दिला व घराच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यास सांगितले. याची मुदत केवळ तीन दिवस आहे. त्या दरम्यान आपण योग्य तो निर्णय घ्यावा.  असे सांगून मी माझ्या शिष्यतुल्य व्यक्तींबरोबर त्या वास्तूतून बाहेर निघालो.

दुसऱ्या दिवशी मध्यस्थांच्या मला फोन आला,  महाराज कालचा प्रकारातील नवनाथ यागाचे व वास्तू बंधनाचा खर्च किती येणार. त्यावर मी त्याला त्या वेळेचा खर्च सांगितला. थोड्यावेळाने त्या यजमानांचा फोन आला किती खर्च येणार मी तीच रक्कम सांगितली. त्यावर आम्हाला मध्यस्थीने आपल्या रकमेच्या तीन पट सांगितले आहे.  मला हे सर्व अपेक्षित होते. त्यापुढे तीन दिवस होऊन गेले परंतु कोणाचाही फोन आला नाही. सर्व मुसळ केरात आता काही खरं नाही मी आपल्या मनाशी बोलत होतो.

पंधरा दिवसानंतर तो मध्यस्थ माझ्याकडे आला सर्वप्रथम मी त्याला झालेल्या प्रकाराबद्दल फैलावर घेतले व अशी दलाली माझ्याकडे चालणार नाही असे खडसावून सांगितले. माफी मागत या मध्यस्थाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. महाराज आपण ज्यांच्या कडे गेला होता, त्यांच्याकडे एकाचा मृत्यू झाला आहे . तुम्ही दिलेल्या मुदतीनंतर त्यांच्या दरवाज्यात एक काळी कभिन्न मांजर आली व तिने विचित्र आवाज करताच आपण दिलेला नारळ वरून खाली पडला व त्याचे दोन तुकडे झाले. पुढील तीन दिवसात त्यांच्या घरात मयत झाले. आता काय करावे?  हे त्यांना कळत नाही, आपण काही उपाय सुचवा!

या आधीच उपाय सुचविला होता. परंतु त्यांचे नशीब, जिथे माझ्या नाथावर विश्वास नाही तिथे मी काय करणार?
आज मीतिस  घरातील एक दोन पुरुष उरलेत, कारण त्यांनी ती वास्तू सोडली व बाजूच्या बिल्डींग मध्ये ते राहायला गेलेत. आता म्हणे कोणी बिल्डर ती पीडित वास्तू मोडून तिथे टोलेजंग इमारत उभी करण्याचे मनसुबे आखत आहे. पण त्यातही त्याला यश नाही. समजा अशी वास्तू उभी राहिली तर तिथे लाखो रुपये कर्ज काढून एवढा अवाढव्य खर्च करून ज्याने फ्लॅट घेतला. तर तो त्याला फलदायी ठरेल का ? कदाचित काहीही घडू शकते.

पैशाच्या व्यवहारात मनुष्य देवाची देखील बोली लावतो. एकूण कामाचे पॅकेज मागणारी लोक मी माझ्या कारकिर्दीत पहिली आहेत. पैसे मोठे कि माणूस मोठा हे ज्याने त्याने ठरवायचे असते. जान हैं तो जहाँन है. 

Friday 19 June 2020

spiritual life coach

For men and Women A special gift on every god festival or every day, always give the gift everyone on valentine days friendship day The worshipper will be blessed by lord shiva

5% OFF OFFER

Death; An Inside Story: A book for all those who shall die Paperback - spiritual life coach

81% OFF OFFER

Nickel and Brown Wood and Brass Kavach Rudraksha Trishula Damru Locket Pendant Necklace - Spiritual Life coach