भाग-७
(मराठी)
Photo by Josh Hild from Pexels |
⚉ बोईसरला मी एकाकडे वास्तू परीक्षणासाठी गेलो होतो. त्यावेळेस तिथे सुर्वे यांची ओळख झाली. आपल्या घरगुती प्रश्नांमुळे ते त्रस्त झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात सोन्याच्या अलंकाराची डाय बनविणारा उत्तम कारागीर म्हणून सुर्वे प्रख्यात होते. परंतु गेली काही वर्षे त्यांना काम मिळत नव्हते. सुर्वे व त्यांच्या पत्नीला सौ. लताच्या घरी नवनाथांच्या यागाच्यावेळी बोलाविले त्यांच्याकडून यज्ञात आहुती देऊन त्यांना उपकृत केले. त्यानंतरच्या भेटीमध्ये श्री व सौ सुर्वे यांच्या चूका निदर्शनास आणून दिल्या. एक दिवस ठरवून त्यांच्याकडे वास्तुपरीक्षणास गेलो. समुद्रकिनारी असलेला त्यांचा उत्तम बंगला होता. त्यांच्या घरी वास्तुपरीक्षणाला आल्यानंतर मला तेथील ठळक मुद्दे कळले.
श्री. सुर्वे यांच्या बेडरुमच्या खिडकीतून रात्री बारा नंतर एका अज्ञात शक्तीचे श्री सुर्वे यांना बोलावणे येत असे. त्यांच्या नावाने ती शक्ती त्यांना हाका मारत असे. सुरुवातीला आपली कुणीतरी थट्टा करीत आहे. असे सुर्वेना वाटत होते. परंतु अनेक दिवसापासून त्यांची खात्री झाली. हा भयानक प्रकार असून आपण यासाठी असमर्थ आहोत हे कळल्यावर त्या दिवसापासून सुर्वे व त्यांचे कुटुंबीय बेडरूममध्ये झोपत नसे.
हॉलच्या एका कोपऱ्यात सोफा होता व त्या सोफ्यावरती बसलेल्या माणसाला आपले कुणीतरी पाय खेचते आहे. अशी सत्य जाणीव होत असे त्यामुळे रात्रीचे जागरण व सकाळची झोप असा त्यांचा दिनक्रम झाला होता.
सुर्वेंची मुलं बिथरली होती. परंतु पत्नी मात्र खंबीर असल्यामुळे या सर्व समस्येला तोंड द्यायचे तिने ठरविले. मी माझ्या शिष्याला त्या सोफ्यावर बसण्यास सांगितले, तेव्हा त्याला आपले कुणीतरी पाय खेचते आहे असे जाणवले.
वास्तूचे पूर्ण परिक्षण करून मी त्या सोफ्यावर जाऊन बसलो. मलाही तो अनुभव घ्यायचा होता, परंतु काही क्षणातच कोणी अज्ञात शक्तीने माझ्या पायाला पकडून नमस्कार केल्याचे मला जाणवले. आणि मी तो नमस्कार माझ्या सद्गुरू पर्यंत पोहोचवला . आता मला सर्व चित्र स्पष्ट दिसत होते. यातून तुम्हाला 100% बाहेर काढीन असे आश्वासन मी सुर्वे यांना दिले.
सुर्वेला वास्तुबंधन व दरमहा नवनाथ हवन असे सहा महिने करावे लागेल असे सांगितले. परंतु एवढा खर्च कसा करावा असा प्रश्न होता? त्यावर आपले पहिले हवन झाल्यावर पुढची पाच महिन्याची हवने आपोआप होतील. असा मी त्यांना शब्द दिला वास्तु बंधन व तांत्रिक क्रिया केल्यावर श्रीयुत सुर्वे याना त्याच्या दुसऱ्या दिवशी नेपाळहून एक पहिली ऑर्डर आली सुर्वे यांनी मला तात्काळ फोन करून ही खुशखबर सांगितली. अनेक वर्ष दुश्मनाप्रमाणे वागणारा त्यांचा सख्खा मेव्हणा तिसऱ्या दिवशी नवीन ऑर्डर घेऊन आला व सुर्वेकडे माफी मागितली. माझ्याकडून आज पर्यंत जे काही चुकले आहे त्याबद्दल मला माफ करा असा दिनक्रम महिनाभर सुरू होता . महिन्याभराने मी दुसरे नवनाथ हवन करण्यास सुर्वेन कडे गेलो. लांबचा प्रवास असल्याने सुर्वेच्या घरीच विश्रांती केली.
रात्री मला दोन वाजता नाथांचा आदेश आला व मी माझ्या शिष्याला सुर्वे यांना बोलावण्यास सांगितले. त्यावर सुर्वे धावत माझ्याकडे आले व म्हणाले महाराज काय झाले एवढ्या रात्री का बोलावले? त्यावर मी त्यांना सांगितले की पुढील एक महिनाभर तुमच्या पत्नीला घराच्या बाहेर पाठवू नका. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. मी पुन्हा पुन्हा सांगून सतर्कतेचा इशारा दिला. मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही मी माझ्या पत्नीची योग्य काळजी घेईन. असे सांगितले. सकाळी सुर्वेना मी पुन्हा दक्षतेचा इशारा दिला त्यांनी त्यावर होकार दर्शविला.
दुसर्या दिवशी आम्ही आमच्या घरी निघालो. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सौ. सुर्वे यांनी मला फोन केला, महाराज मला तुम्हाला भेटायचे आहे . त्यावर त्यांना येऊ नका, असे मी सांगितले व त्याच दुपारी चार वाजता मला नाथांचा पुन्हा आदेश आला व माझ्या घराचा दरवाजा ठोठावला गेला.
मी सुर्वे यांना फोन केला की वहिनी कशा आहेत? त्यावर त्यांनी सांगितले की त्या निघून गेल्या, मला प्रथम नवरा बायकोमध्ये भांडण झाले असे वाटले म्हणून मी त्यांना म्हटले तुम्ही पुन्हा भांडलात का ?
यावर त्यांनी मला सांगितले की वहिनी या जगात नाही कारण मी नको सांगूनही सौ सुर्वे हट्टाने घराबाहेर आपल्या मैत्रिणीला भेटायला गेली आणि त्यात तिचा दुर्दैवी रेल्वे अपघात झाला. मी सतर्कतेचा इशारा देऊनही, काळाने त्यांच्या संसारावर दगा आणली होती. आज मितीस श्री सुर्वे व त्यांची दोन मुलांसोबत वास्तव्य करीत आहेत.
अध्याय-७
( हिन्दी )
सत्य अनुभव
⚉ मैं एक वास्तुपरीक्षण के लिए बोईसर गया था। उस समय, सुर्वे को वहां पेश किया गया था। वह अपनी घरेलू समस्याओं से परेशान था। सुर्वे को पूरे महाराष्ट्र में सोने के गहनों के बेहतरीन कारीगर के रूप में जाना जाता था। लेकिन पिछले कुछ सालों से उन्हें काम नहीं मिल पा रहा है। श्री. सुर्वे और उनकी पत्नी को लता के घर पर नवनाथ के यज्ञ के दौरान बुलाया गया, उन्होंने यज्ञदान दिया और उन्हें उपकृत किया। बाद की यात्रा में, श्री और श्रीमती सुर्वे की गलतियों को इंगित किया गया था। एक दिन की व्यवस्था की और वास्तुपरीक्षण के लिए उनके घर चला गया। बीच के किनारे उनका एक अच्छा बंगला था। वास्तुपरीक्षण के लिए उनके घर जाने के बाद, मुझे ठोस बातोओं का पता चला।
श्री सुर्वे को अज्ञात शक्ति द्वारा, आधी रात के बाद सुर्वे के बेडरूम की खिड़की से बुलाया जाता था। यही शक्ति उन्हें उनके नाम से बुला रही थी। शुरुआत में कोई आपका मजाक उड़ा रहा है। यही सुर्वेने सोचा। लेकिन वह कई दिनों तक सहमा रहा। सुर्वे और उनका परिवार उस दिन के बाद से बेडरूम में नहीं सोया है जब उन्हें पता चला कि यह एक भयानक प्रकार था और हम इसके लिए असमर्थ थे।
उनके घरके हॉल के एक कोने में सोफा था, और सोफे पर बैठा कोई भी आदमी किसी शक्तिके द्वारा घसीटा जा रहा था। इस तरह के सच को महसूस करते हुए, उनकी दिनचर्या रात में जागना और सुबह सोना था।
सुर्वे के बच्चे सहमें हुए थे। लेकिन क्योंकि उसकी पत्नी हौस्लेवाली थी, उसने इन सभी समस्याओं का सामना करने का फैसला किया। जब मैंने अपने शिष्य को उस सोफे पर बैठने के लिए कहा, तो उसे लगा कि कोई उसके पैर खींच रहा है।
इमारत की पूरी जाँच के बाद, मैं सोफे पर बैठ गया। मैं इसे भी अनुभव करना चाहता था, लेकिन कुछ ही क्षणों में मैंने महसूस किया कि किसी ने मेरे पैर को अज्ञात शक्तिसे पकड़ लिया था और मुझे अभिवादन किया था। और मैंने अपने सदगुरु को बधाई दी। अब मैं सभी चित्रों को स्पष्ट रूप से देख सकता था। मैंने सर्वे को आश्वासन दिया कि मैं आपको इस समस्यासे 100% से बाहर निकाल दूंगा।
सुर्वे को कहा कि उन्हें वास्तुबंधन और लगातार छह महीने के लिए नवनाथ हवन करना होगा। लेकिन सवाल यह था कि इतना खर्च कैसे किया जाए? उस पर आपके पहले हवन के बाद, अगले पांच महीनों का अगला हवन अपने आप हो जाएगा। इस तरह मैंने उन्हें शब्द दिया। वास्तु बंधन और तकनीकी कार्य करने के बाद, श्री सुर्वे को अपने दूसरे दिन नेपाल से पहला काम का ऑर्डर मिला। सुर्वेने तुरंत मुझे फोन किया और मुझे यह खुशखबरी सुनाई। उनका जो साला था, जो कई सालों से दुश्मनई निभा रहा था वह तीसरे दिन एक नए ऑर्डर के साथ सुर्वे के घर आया और सुर्वे से माफी मांगी। मैंने अब तक जो कुछ भी बुरा बर्ताव किया है, उसके लिए मुझे क्षमा करें।
मै दूसरे महीनेमें नवनाथ हवन करने के लिए सुर्वे के यहाँ गया। सुर्वे के घर पर आराम किया क्योंकि यह एक लंबी यात्रा थी।
रात के दो बजे, नाथजी का आदेश मेरे पास आया और मैंने अपने शिष्य को सुर्वे को बुलाने के लिए कहा। सुर्वे मेरे पास दौड़ा और बोला, "महाराज, आपने मुझे इतनी रात क्यों बुलाया?" मैंने उनसे कहा कि अगले एक महीने के लिए अपनी पत्नी को घर से बाहर न भेजें। क्योंकि उनकी जान को खतरा है। मैंने चेतावनी दोहराई। मैं आपके शब्द से बाहर नहीं हूं मैं अपनी पत्नी की उचित देखभाल करूंगा। सुर्वेने कहा। सुबह मैंने सुर्वेको फिर से चेतावनी दी उसपर सुरवेने हामी भरी।
अगले दिन हम सब अपने अपने घर गए। अगली सुबह, श्रीमती सुर्वे ने मुझे कॉल किया, महाराज, मैं आपसे मिलना चाहता हूं। मैंने उन्हें नहीं आने के लिए कहा, और दोपहर में चार बजे, मुझे नाथजी से एक और आदेश मिला और उसी दोरान मेरे दरवाजे पर किसी अज्ञात शक्ति ने दस्तक दी।
मैंने सुर्वे को यह देखने के लिए कॉल कि, उनकी बीवी कैसी है। उसने कहा कि वह छोड़ के चली गयी, मुझे लगा कि पति और पत्नी के बीच झगड़ा हुआ होगा, इसलिए मैंने उनसे पूछा, क्या आपने फिर से झगड़ा किया ?
इस पर उसने मुझे बताया कि बीवी इस दुनिया में नहीं है. मेरे मन करने के बावजूद वो हठ करके अपनी सहेलीसे मिलने के लिए घर से बाहर चली गई और एक दुर्भाग्यपूर्ण ट्रेन दुर्घटना में उनकी मृत्यु हुई। मेरी चेतावनियों के बावजूद, समय ने उनकी दुनिया को धोखा दिया। आज की तारीख में श्री सुर्वे अपने दो बच्चों के साथ रह रहा है।
Episode-7
(English)
True Experience
No comments:
Post a Comment