भाग-1
(मराठी)
सत्य अनुभव
नमस्कार,
⚉ दादा महाराजांकडे एक अगरबत्ती होलसेलचा व्यापारी यायचा त्याची मनोकामना पूर्ण होण्यासाठी दत्त जयंतीला त्याने भंडारा ठेवण्याचे ठरविले परंतु किती माणसांच्या भंडारा द्यावा हे त्याला कळेना अर्धा तास सर्वजण त्यावर संकेत घेत होते. पण प्रत्येकाच्या निर्णयात विसंगती आढळत होती.
दादा महाराजांनी माझ्याकडे बोट दाखवत सांगितले की, यांना विचारा, अर्थात मी आदेश घेऊन साडेआठशे माणसं येतील असे सांगितले. त्यावर सर्वांच्याच मुद्रा आश्चर्यचकित झाल्या एवढी माणसे जर आली नाही तर आपले हसू होईल असे त्या व्यापाऱ्याला वाटत होते. तो दिवस आला दत्त जयंती ची पूजा हवन झाल्यावर भंडाऱ्यासाठी केवळ 70 माणसे जमा होती.
दादा महाराजांनी मला तात्काळ बोलावणे धाडले त्यांना फोनवर दिलासा देत मी सांगितले आहे काळजी करू नका सर्व ठीक होईल. मी त्यांच्याकडे जाण्यासाठी माझी पत्नी व वडिलांना घेऊन सोबत निघालो तर त्यांच्या देवळापुढे फार भलीमोठी रांग होती. मी त्या रांगेत उभा राहिलो दादा महाराजांना समजताच त्यांनी थेट गाभाऱ्यात येण्याचा निरोप पाठवला. शेवटच्या पंक्तीपर्यंत 835 माणसे घेऊन गेली होती असे महाराजांकडून मला समजले. त्या व्यापाराला खूप हायसे वाटले. त्याने माझे त्रिवार आभार मानले.
⚉ महाराज यांच्या सांगण्यावरून मी एका बड्या उद्योगपतीकडे वास्तू परीक्षणासाठी गेलो होतो. वास्तु म्हणजे त्याचा महाल होता प्रत्येक कोपऱ्यात छुपे कॅमेरे लावले होते व त्याचा मालक रामजीभाई त्याच्या ऑफिसमध्ये बसून मला कॅमेराद्वारे न्याहाळत होता. दोन तास संपूर्ण वास्तू परीक्षण केल्यानंतर मी त्यांच्या ॲटोमॅटीक ऑफिस मध्ये पोहचलो. एखाद्या सिनेमामधले ऑफिस बघावे तसे चित्र होते. त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक मोठेखानी ऑफिस टेबल होते. तसेच पोशाखातील रामजीभाई एखाद्या सिनेमातला गडगंज श्रीमंत असा हिरो किंवा विलन बसल्याचे मला जाणवले.
माझ्याशी चर्चा सुरू करण्याच्याआधी त्यांनी आपल्या खिशातली बंदूक काढून माझ्या व त्यांच्यामध्ये ठेवली. कदाचित त्याला मला घाबरवायचे होते त्याच्या त्याला रुबाब/धाक दाखवायचा होता. बोलो जो बोलना है वो पटापट बोलो असे तो रुबाबात माझ्यावर तिरस्कारित आदेश सोडू लागला. खरतर मी दादा महाराजांच्या विनंतीनुसार तिथे आलो होतो त्यासाठी मी काहीही मोबदला घेतला नव्हता.
तरीही परिस्थितीचा मन ठेवून मी मला त्या वास्तूत जाणवले सर्व अनुभव त्यांना कथन करण्यास सुरुवात केली. अचंबित झालेला रामजीभाई माझ्याकडे प्रश्नांवर प्रश्न करू लागला. त्यातील एक भाग म्हणजे त्याची सोळा वर्षाची मुलगी दररोज रात्री बारा वाजता त्यांच्या बंगल्याच्या समोरील गेस्टहाऊसमध्ये उठून जात असे, तिथे एका अनिष्ठ शक्तीच्या भोगाचा बळी ठरली होती. हे मी त्यांना आदेश घेऊन सांगितल्यावर रामजीभाई ढसाढसा रडू लागले.
कारण रामजीभाईच्या कौटुंबिक नाजूकबाबीचा विषय होता त्याच्यासाठी त्याने माझ्याअगोदर बंगाल वरून एका मांत्रिकाला आणले होते परंतु तो त्यात अपयशी ठरल्याने त्याला तेथेच रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या होत्या. त्याचा दुसरा माणूस म्हणजे मी होतो यातून मार्ग मिळण्यासाठी काय करावे लागेल असे रामजीभाईने मला विचारले, यासाठी दादा महाराजांची आपण सल्लामसलत करावी असा मी त्याला सल्ला दिला व आपले काम मी करून देऊ शकेन अशी त्यांना ग्वाही दिली.
त्यावेळी रामजी भाई ८०० करोडचा मालक होता व त्याला १००० करोडचा मालक व्हायचे होते. (सन २००० ची घटना) असे मला समजले की, तो त्या वेळेस मोठ्या मोबाईल कंपनीच्या मालकाला फायनान्स करीत होता. (इथे मुद्दामून नाव देत नाही.) वरील समस्येच्या निवारणासाठी दादा महाराज यांनी फार मोठी रक्कम त्याच्याकडे मागितल्याचे मला कळले. ते मला कदापि मान्य नसल्याने मी यातून माझा काढता पाय घेतला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अध्याय-1
( हिन्दी )
सत्य अनुभव
नमस्ते,
⚉ कोई एक अगरबत्ती का थोक व्यापारी अपनी इच्छा पूरी करने के लिए दादा महाराज के पास आता था, तो उसने दत्त जयंती पर भंडारा रखने का फैसला किया, लेकिन उसे नहीं पता था कि कितने लोग भंडारा की लिये आयेंगे। वह मौजूद साधक आधे घंटे से इस विषय पर चर्चा कर राहे थे। लेकिन हर किसी के फैसले में विसंगतियां थीं।
दादा महाराज ने मेरी और इशारा किया और कहा, "उससे पूछो, निश्चित ही मैंने आदेश लिया और आठ सौ पचास लोग आएंगे ऐसा कहा।" व्यापारी ने सोचा कि अगर वह पर्याप्त लोग नाही आये तो सब मेरी हँसी उडायेंगे। वह दिन आया जब दत्त जयंती पूजा के बाद भंडारे के लिए केवल 70 लोगही इकट्ठा हुए थे।
दादा महाराज ने तुरंत मुझे फोन करके तुरंत मंदिर में बुलाया। मैंने उन्हें फोन पर दिलासा दिया और कहा कि चिंता न करें, सब ठीक हो जाएगा। मैं अपनी पत्नी और पिता के साथ मंदिर में गया, लेकिन उनके मंदिर के सामने लंबी कतार थी। मैं उस कतार में खड़ा था। जैसे ही दादा महाराज समझ गए, उन्होंने सीधे मंदिर आने का संदेश दिया। मुझे महाराज से समझा कि 835 व्यक्ति अंतिम पंक्तितक आ गए थे। वह व्यापार बहुत अधिक प्रसन्न था। उन्होंने मुझे बहुत धन्यवाद दिया।
⚉ महाराज के कहने पर, मैं एक वास्तुपरीक्षण के लिए एक बड़े उद्योगपति के पास गया। वास्तु महल जैसी थी हर कोने में छिपे कैमरे थे और इसके मालिक रामजीभाई अपने कार्यालय में बैठे थे और मुझे कैमरे के माध्यम से देख रहे थे। दो घंटे तक पूरे महलका का परीक्षण करने के बाद, मैं उनके स्वचालित कार्यालय पहुंचा। यह किसी फिल्म में ऑफिस देखने जैसा था। उनकी और मेरे बिच एक बड़ी ऑफिस टेबल थी। इसके अलावा, मुझे एहसास हुआ कि सफेद कॉस्ट्यूम में रामजीभाई एक फिल्म में एक नायक या खलनायक जैसे दिख रहे थे।
इससे पहले कि वह मुझसे बात करना शुरू करता, उसने अपनी बंदूक निकाली और मेरे और उसके बीच रख दी। शायद वह मुझे डराना चाहता था। उन्होंने रुबाब में मुझसे नफरत भरे आदेश देने शुरू कर दिए, कहा, "जो बोलना है वो पटापट बोलो।" वास्तव में, मैं दादा महाराज के अनुरोध पर आया था जिसके लिए मैंने कुछ भी मुबादला नहीं लिया था।
फिर भी उस स्थिति को ध्यान में रखते हुए मैंने उन्हें उस वास्तु में महसूस किए गए सभी अनुभवों को बताना शुरू किया। आश्चर्यचकित, रामजीभाई मुझसे सवाल पूछने लगे। इसका एक हिस्सा उनकी सोलह साल की बेटी थी जो अपने बंगले के सामने गेस्टहाउस में नींद में आधी रात को जाती थी, जहाँ वह एक बुरीछाया का शिकार थी। जब मैंने उन्हें यह बताया, तो रामजीभाई रोने लगे।
क्योंकि रामजीभाई का परिवारका ये नाजुक मामला था, इसलिए उन्होंने मुझसे पहले बंगाल से एक मान्त्रिक को बुलाया था, लेकिन वह असफल रहे और उन्होंने वहीं खून की उल्टी शुरू कर दी थी। रामजीभाई ने मुझसे पूछा कि मुझे इस दलदलसे निकलने के लिए रास्ता क्या है। मैंने उन्हें दादा महाराज से परामर्श करने की सलाह दी और उनको ग्वाही दी कि मैं आपका काम कर के दे सकता हूं।
उस समय रामजीभाई 800 करोड़ के मालिक थे और वे 1000 करोड़ के मालिक बनना चाहते थे। (2000 की घटना) मुझे ऐसी खबर थी कि, वह उस समय एक बड़ी मोबाइल कंपनी के मालिक का वित्तपोषण कर रहा था। (मैं यहाँ उद्देश्य के लिए उनका नाम नहीं लेता।) मुझे पता चला कि दादा महाराज ने उनसे उपरोक्त समस्या को हल करने के लिए बड़ी राशि मांगी थी। चूंकि यह मेरे लिए कभी स्वीकार्य नहीं था, इसलिए मैंने ये केस छोड़ दिया।
Episode-1
(English)
True Experience
Hello
No comments:
Post a Comment