Wednesday, 3 June 2020

3-Jun-20

नमस्कार,

अर्जुंदास महाराजांचा हा सर्व अविर्भाव पाहून माझे स्नेही श्री राजेंद्र यांनी मला लाल बापू राहणार गुजरात येथे स्वत:सोबत  येण्याची विनंती केली. कारण लाल बापू हे एक उत्तम साधक होते आणि त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही दोघे गुजरातला जाण्याचे ठरविले. 

मी त्यांच्यासोबत केवळ बापूंच्या सदिच्छा भेटीस गेलो होतो. एक साधक जेव्हा दुसऱ्या साधकाला भेटतो तेव्हा त्याला त्याच्याकडून बरंच काही अनुभवायला मिळतं या हेतूने मी त्यांच्या दर्शनाला राजेंद्र यांच्याबरोबर गेलो. बरीच त्रेधा तिरपीट करीत आम्ही गुजराच्या एका छोट्याशा खेडेगावात त्यांच्या घरी पोहचलो, त्यांचे घर एक छोटेखानी बंगलाच्या स्वरुपात होते. 

श्री. राजेंद्र ह्यांची जुनी ओळख असल्याने बापूंच्या घरची मंडळी त्यांना ओळखत होती. लाल बापू यांच्या मातोश्री या आमच्या भेटीस पुढे आल्या त्यांचे वय त्यावेळेस किमान 8५ च्या आसपास असावे पण त्या खूप चपळ असल्याचे वाटले. थोड्यावेळाने लाल बापू यांनी त्यांच्या अध्यात्मिक कक्षात मला आणि राजेंद्रला बोलावले, लाल बापू यांचे वय 65 होते उंची साडेसहा फूट आणि मजबूत बांध्याचे तसेच करारी चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व मी त्यांना प्रथम दर्शन स्वरूपात पाहिले. 

राजेंद्र यांच्याबरोबर त्यांनी खाजगीत काहीतरी सल्लामसलत केली आणि त्यांना अध्यात्मिक कक्षेच्या बाहेर थांबण्यास सांगून माझ्याशी एकांत साधण्याचा प्रयत्न लाल बापू यांनी केला. लाल बापू हे एक चमत्कारिक साधक होते त्यांच्या अनेक चमत्कारी गोष्टी माझ्या ऐकिवात होत्या त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी जीन साधना केलेली होती आणि त्या माध्यमाद्वारे त्यांनी अनेकांचे आर्थिक प्रश्न सोडवले होते. असे मी ऐकून होतो. 

जेव्हा आपण आपल्या शक्तीचा वापर कोणत्याही कार्यासाठी करतो तेव्हा त्या मोबदल्यात शक्तीला भोग देणे क्रमप्राप्त असते परंतु लाल बापू यांनी त्यांच्या शक्तीचे देणे बरेच वर्ष बाकी ठेवल्याने ती शक्ती त्यांचे ऐकेनाशी झाली होती. मला त्यांनी त्यांच्या आसनासमोर बसवलं आणि बेटा म्हणून संबोधायला सुरुवात केले. माझ्या डाव्या हातावर एखाद्या सुरीचे  टोक जसे अलगदपणे फिरवावे तसे अलगदपणे काहीतरी फिरविल्याचे मला जाणवले. 

मला त्यांनी विचारले, बेटा कुछ मेहसूस हो रहा है आपको? तेव्हा मी त्यांना म्हणालो, हा बापू मुझे मेरे हात के उपर छूरी कि नोक चलने जैसा महसूस हो रहा है. त्यावर ते हसून म्हणाले की, यहा नही होगा तो कहा होगा? बेटा आप बहार जाके बैठो और राजेंद्र को अंदर भेज दो. 

राजेंद्र त्यांच्या अध्यात्मिक कक्षेमध्ये गेले व किमान एक तासाने ते बाहेर आहे. आल्यानंतर त्यांनी मला पूर्णपणे न्याहळण्यास सुरुवात केली आणि ते म्हणाले,  तु मला इतके महिने तुझ्या साधना-शक्तीबाबत काहीही स्पष्ट कल्पना दिली नाहीस की याद्वारे तू काय काय करू शकतोस. आज मला बापूंनी तुझ्याबद्दल अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. बापूंचे म्हणणे आहे,  इस बेटे के पास क्या है ये आपको पता भी है राजेंद्र आप किस चीज को मेरे पास लेके आये हो इसका कुछ अंदाजा है? ये चलते हुए किसी भी तांत्रिक-अघोरी विद्या को आराम से पकड के अपने बस में कर सकता है. ये बेटा बहुत कुछ कर सकता है. मै इससे बहुत प्रभावित हुआ हू इसे मै अपनी जीन की विद्या देना चाहता हु अगर वो उस के लिये तयार है तो मै उसे वो विद्या सिखाने के लिए राजी खुशी तयार हूं. 

त्यांची ही ऑफर ऐकून मी राजेंद्रला पूर्णपणे मनाई केली आणि माझ्या आयुष्यात फक्त माझे बाबाच गुरु असून त्यांनी दिलेल्या साधनेवर माझा शंभर टक्के विश्वास आहे मला कोणत्याही इतर विद्येबद्दल अभिलाषा नाही. प्रत्येक वेळी अनेक साधकांच्या भेटीमध्ये मला माझे गुरु आणि त्यांची विद्या किती श्रेष्ठ आहे व त्यांचे मार्गदर्शन किती मोलाचे आहे हे वारंवार जाणवत होते त्यामुळे मला त्यांची जास्त ओढ लागलेली असायची... 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Hello,

Seeing all these appearances of Arjundas Maharaj, my dear Shri Rajendra requested me to come with him to Gujarat, where Lal Bapu will stay. Because Lal Bapu was a great seeker and we both decided to go to Gujarat to visit him.

I had gone with him only for Bapu's goodwill visit. When a seeker meets another seeker, he gets to experience a lot from him, so I went to see him with Rajendra. After trembling a lot, we reached his house in a small village in Gujarat. His home was in the form of a little bungalow.

Mr. as Rajendra had an old acquaintance, Bapu's family knew him. Lal Bapu's mother came forward to visit us. She must have been around 85 years old at that time, but she seemed to be very agile. After a while, Lal Bapu called Rajendra and me to his spiritual room. Lal Bapu was 65 years old.

He had some private consultation with Rajendra, and Lal Bapu tried to keep me alone by telling him to stay out of the spiritual realm. Lal Bapu was a miraculous seeker. I had heard many supernatural stories about him. He had done sadhana in his twenties, and through that, he had solved many financial problems. That's what I was hearing.

When we use our power for any work, it is a matter of sacrificing power in return, but Lal Bapu left his ability for many years, so that power was lost to him. They sat me down in front of their seat and started calling me Beta. I felt as if I were spinning something on my left hand, like the tip of a knife.

Did he ask me, son, are you feeling anything? Then I said to him, ha Bapu, I feel like a knife is running over my hand. He smiled and said, "If it doesn't happen here, where will it happen?" Son, go outside and sit and send Rajendra inside.

Rajendra went into his spiritual room, and he is out for at least an hour. When he came, he started looking at me thoroughly, and he said, you have not given me any clear idea about your sadhana-shakti for so many months, what can you do with it? Today, Bapu has told me many amazing things about you. Bapu says, do you know what this son has, Rajendra? Do you have any idea what you have brought to me? While walking, he can comfortably hold any Tantric-Aghori Vidya in his under. This son can do a lot. I am very impressed with it; I want to give him the knowledge of my gene, if he is ready for it, then I am happy to teach him that knowledge.

After hearing his offer, I altogether forbade Rajendra, and in my life, only my father is a guru, and I have one hundred percent faith in the tool given by him. I have no desire for any other knowledge. Every time I visited many seekers, I often realized how great my Guru and his experience were and how valuable his guidance was, so I used to be more attracted to them...

No comments:

Post a Comment