Showing posts with label miracles from heaven. Show all posts
Showing posts with label miracles from heaven. Show all posts

Tuesday, 9 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-2

भाग-२

(मराठी) 

सत्य अनुभव 



नमस्कार, 

⚉ महाडचे सावंत बाबा-दादा महाराजांकडे येऊन मोठ्या बढाया मारून मोठी रक्कम उकळत असे एका रात्री त्यांच्या भेटीला दादा महाराजांनी मला महाडला नेले सावंत बाबांचा भोंदूपणा माझ्या लक्षात आला होता. त्या रात्री त्यांची भोंदूगिरी पूर्णपणे उघडकीस आणण्याचे मी ठरविले आणि तसे सिद्ध करून दाखविले मोठ-मोठी ख्यातनाम व्यक्ती दादा महाराजांचे शत्रू होते स्वार्थी आणि लबाडपणा पाहून मी तिथे न जाण्याचे ठरविले होते, परंतु तिथे येणाऱ्या अनेक व्यक्ती दादा महाराजांकडून पीडित झालेले माझ्याकडून आशेची वाट पाहात होते. 

⚉ रमेश नावाचा मुलगा एका चांगल्या कंपनीत कामाला होता परंतु तेथील कर्मचारी त्याला खूप त्रास देत असत तसेच त्याचे त्याच्या मामे बहिणी वर प्रेम होते ब्राह्मण घराणे असल्यामुळे कोणीही संमती द्यायला तयार नव्हते. घरात होणाऱ्या अजब चमत्काराने रमेश व त्याचे कुटुंब त्रस्त झाले होते. रमेशला त्यांच्या काकावर संशय होता काका कोकणात जाऊन चेटूक उठवण्याचे काम करीत होता, रमेशचा भाऊ एका बारबाला बरोबर संबंध ठेवून होता त्याच्या शिक्षणाचा पेक्षा असूनहि तो त्यात अपयशी ठरत होता. 

हे सर्व सांगताना रमेश खूपच काकुळतीला आला होता रमेश हा अनिकेतचा मित्र त्यामुळे मी त्याला काही तोडगे सांगितले त्यातून तो सुखावू लागला व त्याचे माझ्याकडे येणे जाणे वाढले गुरु सेवेच्या नावाखाली त्याची अनेक कामे तो माझ्याकडून करुन घेत होता त्याच्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास वाढत होता रमेशच्या भावाला सुधारण्यासाठी मी त्याला शाबरी मंत्र देऊन ताळ्यावर आणण्याचे ठरवले आपल्या अगोदर आपल्या भावाला मंत्र मिळाल्यामुळे रमेश दुखावला होता परंतु तोपर्यंत रमेशची सर्व कामे विनामूल्य झालेली होती.

⚉ प्रीतम नावाच्या मुलाच्या आईला पोतराज शक्तीने पकडले होते. बारा वर्षे ती अंथरुणात पडून होती त्यांनी आजपर्यंत अनेक बुवा-बाबा केले परंतु यश मिळाले नाही हतबल झालेला प्रीतम एका दुपारी  मला त्याच्या घरी घेऊन गेला मला बघताच त्याची आई पिसाळली नजरा नजर झाल्यानंतर ती रडायला लागली उतारा व वास्तू बंधन अशाने तुझी आई बरी होईल असा मी त्याला ठाम विश्‍वास दिला. त्या विश्वासावर त्याने सर्व विधी करून घेतल्या त्या विधीला नाथांनी पूर्णपणे पाठिंबा दिला। त्या वेळेला संगणक वेब डिझाईन साठी खूप महत्व होते त्यात त्याला व त्याच्या भावाला यश मिळाले नोकरी व व्यवसायात यश प्राप्ती झाली.

⚉ याच दरम्यानच्या काळात प्रीतमचा मित्र जय याला काही खास तोडग्यायामुळे संपूर्ण भारतासाठी जपान कडून अफिलिटेड सर्टिफिकेट मिळाले होते. परंतु स्वार्थवृत्ती, बाहेरख्यालीपणा व गुरु निंदा-चेष्टा याने जयची धूळधाण झाली होती त्यामुळे सर्व यशावर पाणी पडले होते आपली चूक कबूल करून तो माझ्याकडे माफीसाठी आला होता परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

⚉ श्री साने नावाचे गृहस्थ यांनी मला त्यांच्याकडे वास्तू परीक्षणासाठी बोलावले मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर त्यांच्या घरी गेलो घरातले दृश्य पाहून मी खूपच अचंबित झालो पाच मुली व श्रीयुत साने यांचा दहा बाय दहाच्या पत्राच्या चौकटीत संसार सुरु होता आणि ही चौकट एका जुन्या स्मशानभूमीवर होती त्यांच्या घरात रोजच भानामती होत असे. वास्तू बंधन नक्की कुठले करायचे घराचे की स्मशानाचे?

भुतांच्या वस्तीत श्रीयुत साने राहायला आले होते त्यांच्या घराण्याला कायमस्वरूपीचे सुतक लागले होते त्यांची एक मुलगी जन्मताच नाथभोळी होती व तिच्या बळावर हा गाडा खेचला जात होता साने हे कोकणातले असल्यामुळे कौल-गाऱ्हाणे यात मग्न होते. मी सांगितलेले उपाय त्याने या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले परंतु पुढील दहा वर्षानंतर साने पुन्हा माझ्याकडे आले याचना करू लागले पण तोपर्यंत सर्व खेळ विस्कटला होता. वेळेस त्यांच्या मुलीने साधनेच्या बाबतीत माघार घेतली व कर्मदरिद्री साने हतबल झाले काही तोडगे केल्यानंतर त्यांना आराम पडला परंतु ते सध्या अनावश्यक  प्रश्नात  अडकल्याचे समजते.

⚉ श्री. रुपेश पुनर्विवाहित नोकरी नसलेला, कर्जबाजारी 108 बियरबार फिरलेला, बाहेरख्याली लफडेबाज अशा बहुगुणी माझ्या संपर्कात आला होता. वरील सर्व दुर्गणांपास प्रायशीत्त मिळून योग्य मार्ग मिळावा असे या स्वामी भक्ताचे म्हणणे होते त्यांच्या चुका मी त्याला वारंवार निदर्शनास आणून देत होतो। 75 वर्षांची आई या नवसाच्या मुलामुळे त्रस्त झाली होती. त्याच्या बहिणीचा ही संसार डळमळीस आला होता. 

परंतु मी श्री रुपेश यांना आधार देण्याचे ठरविले माझ्या ओळखीच्या माणसाकडून त्यांना आर्थिक मदत व नोकरी मिळवून दिली. अंगात आळस असलेला पुरुष हा कामचोर असतो हे माझ्या लक्षात येत होते. पण अध्यात्माकडे त्याचा वाढलेला ओढा व गुरुसेवा ही त्याची जमेची बाजू होती असे मला वाटत होते. मी त्यांना काही गुप्त मंत्राद्वारे साधना करण्याचे सांगितले. कालावधी दहा दिवस वेळ रात्री बारा ते तीन, मी सोबत नऊ दिवस त्यांच्या बरोबर होतो व शेवटचा दिवस तुम्ही एकट्याने जप करायचा मी बाहेर तुमची वाट पाहतो असे निक्षून सांगितले होते. काहीही झाले तरी डोळे न उघडता न घाबरता हा शेवटचा दिवस पणाला न्या. असे त्याला मी आदेश दिले.

बारा वाजून 40 मिनिटांनी रुपेश यांना आवाज ऐकू यायला लागले व अधीर झालेले रुपेश आपले डोळे उघडून इथेतिथे पाहू लागले. आपली साधन सामुग्री अर्धवट टाकून घाबरून बाहेर आले व मला असे अनुभव आले हे कथन करू लागले पण तोपर्यंत खेळ संपला होता त्यांच्या अथक विनंतीमुळे मी त्यांना पुढची साधना शिकविण्याचे ठरविले. साधनेस बसल्यावर त्यांच्या डोक्यावर असलेल्या बाभळीच्या झाडावरून एक भूताचे मूत्र त्यांच्यावर थेंब थेंब पडत असल्याचे मला दिसले. तसे मी माझ्या सर्व सहकार्यांना दाखविले त्यामुळे तेथे फार मोठा हशा झाला. 

अस्वस्थ रुपेश स्वस्थ बसायला तयार नाही अनेक चुका-शंका हे त्याचे अपयशाचे कारण ठरले त्याची डबघाईला आलेली परिस्थिती पाहून मी त्यांना शेवटची संधी देण्याचे ठरविले आणि काही गुप्त मंत्राद्वारे पुन्हा साधनेस बसवले त्यात ते यशस्वी ठरत होते त्यावेळेस त्यांना दररोज चांदीची कोणतेही एखादी वस्तू कुठेही पडलेली सापडत असे त्याचे त्याला फार कौतुक होते पण तुम्ही याचा बोलबाला करू नका असे मी त्यांना निक्षून सांगत होतो परंतु चमत्काराच्या नावाखाली ते याचा प्रपोगंडा करीत होते त्यांना मिळणारे संकेत ते नको त्या ठिकाणी वापरायला लागले होते लोकांचे प्रश्न सोडवताना मी व माझे सहकारी म्हणून त्यांना सोबत ठेवले होते. मी त्याची वाईट वृत्ती ही मी नेहमीच त्याच्या निदर्शनास आणून देत असे व चुका करू नका असे समजावून सांगत असे असे. त्यांचे उच्च शिक्षण झाले होते परंतु संस्काराचा घडा रिकामा होता.