Showing posts with label vastu items for home for good luck. Show all posts
Showing posts with label vastu items for home for good luck. Show all posts

Friday, 3 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-23

सत्य अनुभव
भाग-२३

⚉ श्रीयुत पाटील राहणार, जुन्नर पुणे. ही एकूण तीन भावंडं परंतु प्रत्येकाला आपल्या कामात अडथळे येत असे. घरात शांती नाही, पैशांची चणचण, काही व्यक्ती आजारी. अशावेळी पाटीलांना तिकडचे स्थानिक गुरुजी कुलकर्णी यांनी माझा पत्ता दिला. 

वेळ ठरवून सर्व भावंडे माझ्या भेटीसाठी आली. त्यांचे प्रश्न घेतल्यानंतर काही दिवसातच त्यांना असलेल्या  दोषांबद्दल मी गायत्रीयाग करायला सांगितला. परंतु तो तिन्ही भावंडांच्या घरात करायचा असल्याने मला माझ्या कामाचे कौशल्य दाखवायला लागणार होते. कारण एकाच वेळी तीन हवने सुरू होती. मी माझ्याबरोबर काही सहकारी घेऊन गेलो. त्यांच्या प्रत्येकी घरी गायत्री याग सुरू झाला.

मी त्यांच्या वास्तूचे परीक्षण करत होतो. त्या वास्तूच्या अवतीभोवती असणाऱ्या अनिष्ट शक्ती चवताळल्या होत्या. तरीसुद्धा आम्ही आमचे कार्य सुरूच ठेवले. कालांतराने एक म्हातारी बाई या तिन्हीही भावांच्या घराच्या कौलावर बसलेली दिसली, पण ती माझ्या नजरेस नजर भिडवत नव्हती. सर्व मंत्रप्रयोग केल्यानंतर त्या अनिष्ट शक्तीचे उच्चाटण झाले. 

त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाला मी भस्म लावला. त्यापैकी एका व्यक्तीला त्याच्या कपाळाला भस्म लावताना मला काही संकेत मिळाले, म्हणून मी त्याच्या पाठीत जोरात धपाटा घातला. तर मला त्याच्या भावाने विचारले गुरुजी काय झाले?मी म्हटलं की हा माणूस लोकांच्या घरी दशक्रिया कधी होईल याची वाट पहात असतो. कारण वाढलेल्या वाडीतील वडे याला फार आवडतात. आणि त्यासाठी हा सर्व घर शोधत फिरत असतो.

हे बोलल्यावर धपाटा खाल्लेला माणूस रडायला लागला. व माझे पाय पकडून मला म्हणाला, गुरुजी मला माफ करा पण काय करू मला तशी तीव्र इच्छा होते. त्यावर मी त्याला सांगितले की तुला हे प्रकार प्रामाणिकपणे सोडावे लागतील. 

त्यांच्या घरात राहणारी एक वीस वर्षीय मुलगी तिचे बाहेर प्रेमप्रकरण होते, ते घरच्यांना मान्य नव्हते. शिवाय त्या मुलीला अडसराचा त्रास होत होता. त्यावर मी त्यांना काही उपाययोजना सांगितली. त्यांच्या घराच्या जवळच त्यांची शेतजमीन होती. तेथे एका नागदेवतेचे स्थान होते. परंतु त्याची पूजाअर्चा कशी करावी हे त्यांना बिलकुल ठाऊक नव्हते. अशावेळेस माझ्या मार्गदर्शनाचा त्यांना उपयोग झाला. गायत्री यागानंतर संपूर्ण गाव याग दर्शनासाठी तेथे येऊन गेला. आमचा पाहुणचार पाटलांनी व्यवस्थितरित्या करून सर्व पुजाऱ्यांचे  शुभ आशीर्वाद घेतले.


Image by Tanuj Handa from Pixabay