Showing posts with label spiritual. Show all posts
Showing posts with label spiritual. Show all posts

Monday, 29 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-19

सत्य अनुभव
भाग-१९

Image by Sasin Tipchai from Pixabay 

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेप्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
⚉ श्री साठे, हे एका त्यांच्या दगडी चाळ मुंबई, येथील मित्राला घेऊन माझ्याजवळ आले.  त्यांचे नाव धात्री असे होते. त्यांची मोठी मुलगी नववीला, दुसरी सहावीला होती. मोठ्या मुलीच्या पाठीमागे त्या शाळेतील एक अवगुणी मुलगा हात धुऊन लागला होता व ती मुलगीसुद्धा त्यात वाहत चालली होती. मुलगी अभ्यासाने खूप हुशार होती,  परंतु या प्रकरणामुळे तिचेअभ्यासात व्यवस्थित लक्ष लागत नव्हते व या कारणास्तव तिला परीक्षेत गुण कमी मिळत होते. मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीची चिंता हीच चिते प्रमाणे असते. श्री धोत्रे  हे पाणावलेल्या डोळ्यांनी मला सर्व हकीकत सांगत होते.

मी त्यांच्या जवळून सर्व माहिती घेऊन, नाथांचा आदेश घेतला व उत्तर असे आले की,  त्या मुलीला पितृदोष आहे व तिला त्या गुंड मुलाने प्राप्त करण्यासाठी काळ्या विद्येचा प्रयोग केला होता. प्रयोगाद्वारे तिला प्रभावी केले होते. मुलगी हाताबाहेर जाण्याअगोदर तिच्या वडीलांनी तिला नाथांच्या दरबारात आणले होते. 

सिद्ध कवच-उतारा-हवन व साधना या मार्फत ती मुलगी त्या गुंड मुलाच्या तावडीतून बाहेर आली होती. तिच्या अभ्यासातही प्रभावी फरक पडला होता. पुढे ती बी.एस.सी झाली. मेडिकल नंतर सध्या ती डॉक्टरी क्लिनिक प्रॅक्टिस करीत आहे. नाथांच्या कृपेने त्यांचे सर्व व्यवस्थित झाले. 



Friday, 26 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-17

सत्य अनुभव - भाग-१७ (मराठी-हिंदी-English ) 


⚉ 2003 साली माझ्याकडे बोरीवली वरून अमितच्या ओळखीने, पुण्याचे संदेश माझ्या संपर्कात आले. त्यांनी मला फोन केला. नमस्कार, मी पुण्याहून संदेश कुलकर्णी बोलतो आहे. मी ज्या ठिकाणी राहतो तेथील मालकाने केवळ तीन दिवसात घर खाली करण्याची नोटीस दिली आहे. त्या मालकाचे त्याच्या भावंडांबरोबर भांडण झाले आणि जागेच्या भांडणावरून माझ्यावर संक्रांत आली.  मी व माझे आई-वडील असा संसार आहे. आपण कृपया मार्गदर्शन करावे, या संकटावर मात करण्यासाठी काही उपाय सांगावे. 

मी त्यांची संपूर्ण माहिती घेऊन नाथांच्या आदेशाप्रमाणे त्यांना काही सिद्ध तोडगे सांगितले व तुम्हाला प्रखर पितृदोष असल्याने त्याचे हवन करावे लागेल असे सांगितले. त्यावर मी सांगितल्याप्रमाणे संदेश यांनी उपाय केले. परंतु पितृदोषाचे हवन केले नाही. व  त्यांच्या मालकाने तीन दिवसा वरून तीन महिन्याची मुदत दिली. त्यावर संदेश यांनी माझे आभार मानले. तेव्हा त्यांना या दिवसाच्या आत आपण पितृदोष हवन करून घ्या.  असे स्पष्ट सांगितले होते.

तीन दिवसा वरून नव्वद दिवसांच्या मुदतीत संदेश यांनी हवन करून घेतले नाही. आणि जागेच्या मालकाचा रुद्रावतार झाला.  90 दिवसाने यांनी पुन्हा माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व मला अजून थोडी मुदत हवी आहे. मी जरूर पितृदोष हवन करीन आणि त्याला पुन्हा 45 दिवसांची मुदत मिळाली. 

त्या दरम्यान त्यांनी माझ्याकडे येऊन हवन केले व आपले हक्काचे घर असल्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. त्यांचे उत्पन्न व ते विकत घेणारी जागा याचा ताळमेळ न लागल्याने मला प्रश्न पडला,  की हे कसे शक्य आहे? त्यावर संदेशने असे सांगितले माझ्याकडे स्क्रीन प्रिंटिंग चे खूप काम आहे. आम्ही रात्रंदिवस काम करू. तसेच आई जेवणाचे डब्याचे काम करते. व काही गरजू विद्यार्थ्यांना आम्ही घरी भाड्याने जागा देऊ. त्याचे मिळणारे पैसे, वडील सुद्धा काम करतात. त्यामुळे तिघांच्या उत्पन्नात सर्व ठीक होईल. 

घर विकत घेण्यासाठी स्वतःचे पैसे,  बँकेचे कर्ज असा मेळ असतो. परंतू त्यांच्याकडे घर  घेण्यासाठी पैसे नव्हते.  शेवटी पतपेढी, मित्र, आप्तेष्ट यांच्या सांघिक बळावर तसेच चमत्कारिकरित्या होणारी सहज कामे यावरून गुंठेवारी प्रकरणात बँक कर्ज देत नसतानाही यांचे खास कर्ज मंजूर झाले. 

Photo by Sippakorn Yamkasikorn from Pexels

हा सर्व चमत्कार नाथांचा होता!  त्यांनी ठरवलं तर मातीचे सोने होते. हा माझा तंतोतंत विश्वास सार्थ ठरला. पुढे संदेश स्वतः आपल्या आई-वडिलांना घेवून आपल्या मोठाल्या घरात राहण्यास गेले. नाथांच्या आशीर्वादासाठी त्या वास्तूचे वास्तूबंधन करून घेतले. अप्रतिम सोहळ्यानंतर आमचा पाहुणचार झाला. मला या वास्तूत तुमची गादीस्थान व्हावी अशी इच्छा आहे. असे संदेश ने सांगितले. परंतु आपण पुढे पाहू असे सांगून मी ते टाळले.

काही महिन्याने संदेशच्या आईचा मला फोन आला, महाराज  नमस्कार, संदेश सकाळी अकरा वाजेपर्यंत झोपून असतो. त्याची कामे सर्व अपूर्ण आहेत. काही पार्टीने आपली कामे परत नेली आहेत. तर काही जण बोंबाबोंब करीत आहे. तुम्ही त्याला जरा समजवा. संदेशला विचारल्यावर त्यांनी तसे काहीही नसल्याचे सांगितले. तरीसुद्धा मी दखल घेईन.  

परंतु काही दिवसांनी कर्जदार दार ठोठावू  लागले. आता अंथरूण तोकडं पडत असल्याचा अंदाज त्यांना आला पण उशीर झाला. १ कर्ज घेण्यासाठी-फेडण्यासाठी दुसरे कर्ज असा क्रमवार सुरू झाला व घरातली मंडळी बेजार झाली काय हो? हे असे किती दिवस चालणार आहे? नाथांचे हवन चांगल्यासाठी केले होते सर्व उलटे कसे झाले या संदेशाचा आईच्या प्रश्नाने माझे मन विच्छिन्न झाले. 

मी मला प्रश्न करू लागतो या व्यक्ती स्वतःच्या कर्मफळाचे भोग माझ्या व नाथाच्या माथी मारत आहे. मी त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली व पुन्हा त्या प्रकारे त्यावर त्यांनी सुधारणा करून पुढील मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.

आज मितीस ते माझ्यासोबत जीव ब्रह्म सेवा करून सुखाने राहत आहे.

Thursday, 25 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-16

सत्य अनुभव - भाग-१६ (मराठी-हिंदी-English ) 


⚉ चेंबूर येथून एक महिला माझे घर शोधत गाडी घेऊन आली. त्या महिलेची आई वय वर्षे 75, यांना खूप विचित्र त्रास होता. त्या महिलेच्या आईला सर्व अंगावरती सुई  टोचल्यासारखे  वाटायचे. कोणीतरी आपला जीव घेत आहे. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे. असे वाटायचे, अंगकाठी सुदृढ असून त्या रोज रडायच्या. 

ठरल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी वास्तूबंधन केले। आईला सिद्धकवच धारण करण्यासाठी  दिले. त्यामुळे घरात येणाऱ्या शक्तीला बंधन झाले व ती शक्ती घराच्या बाहेरून आईला तिच्या नावाने हाक मारू लागली.  हे सर्व दृश्य स्वतः बघून आम्हाला सांगत असे. अंगाला टोचणाऱ्या सुया आता बंद झाल्या. बाहेरची शक्ती घरात शिरण्यासाठी तळमळत होती. आई भीतीपोटी घराच्या बाहेर जात नव्हती. मी त्यांना काही प्रयोग करण्यास सांगितले होते. 

घरातील सर्व मंडळी उच्चशिक्षित असल्याने त्यांना हा सर्व आभास वाटत असे. परंतु आईच्या त्रासापुढे सर्वच हतबल झाले होते. पुढे नवनाथांचा याग करून त्या शक्तीचा कायमचा निकाल लावला व हे प्रकरण निकालात काढले. शेवटी सर्व किमया ही नाथांची असल्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी त्या कुटुंबाला अहमदनगर पाथर्डी - वृद्धेश्वर देवस्थान,  मायंबा,  मढी येथे जाण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे हे कुटुंब तिथे जाऊन नाथांचे दर्शन घेऊन आले. आज रोजी हे कुटुंब त्यांची आई सुखी असून नाथांचे आभार मानतात व दरवर्षी नवनाथ याग माझ्याकडून करून घेतात. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीचे निरसन करायला माझ्याकडे येतात.  आज अनेक कुटुंबांना नाथामुळे मार्ग मिळाला आहे.

⚉ एकदा बोईसर येथून काही व्यक्ती माझ्याकडे आल्या. आणि महाराज माझ्या घरी बेडरूममध्ये जमिनीतून मला बाहेर काढ, असा आवाज येतो. आम्ही काही मांत्रिकाना या ठिकाणी नेल्यावर असे समजले की, त्या ठिकाणी गुप्तधन आहे. परंतु ते काढायला गेल्यावर मांत्रिकांना रक्ताच्या उलट्या होतात. कृपया आपण आमच्या समस्येचे निवारण करावे. 

आदेश घेऊन मी त्यांच्यासोबत ठरल्या वेळेप्रमाणे त्यांच्या गावी गेलो.  बोईसर चिंचणी येथे त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी ती जागा (आवाज येत असलेली)  मला दाखवली. मी त्या जागेवर जाऊन याचा अंदाज घेतला व नाथांना आदेश केल्यावर असे समजले की,  तिथे मोठ्या कडईत सोने वगैरे काही नसून, तिथे ग्रामदैवताची पंचधातूची मूर्ती होती व ती पवित्र सात्विक असल्याने तिच्यावर बोकड-कोंबडी यांचा बळी दिल्याने त्या त्या मांत्रिकाने रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या.  



मी त्या व्यक्तीस वरील हकीकत सांगितल्यावर त्यांचा त्यावर विश्वास बसेना. त्याला गुप्तधनाने पछाडले होते. परंतु त्यांचा भ्रम दूर करावा लागला. आज तिथे ग्राम देवीचे मंदिर झाल्याचे समजले. कारण आम्ही त्या घरातून त्या व्यक्तीच्या गुप्तधनाच्या नगरीतून परतलो होतो. त्या काळात माझ्याकडे अनेक गुप्तधनाच्या केसेस आल्या परंतु अनेकांना माझ्याकडून नाथांच्या कृपेने अनमोल मार्गदर्शन मिळत गेले आहे. तुझे आहे तुझ्या पाशी, तीही शांती मिळाली. अनेकांना केवळ काही अद्भुत तोडग्यावरच मार्ग मिळाला.

Tuesday, 16 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-8

भाग-८

(मराठी) 


सत्य अनुभव 


⚉ एका चंद्रग्रहणात मी व माझे सहकारी एका अज्ञात स्थळी ध्यान धारणेला बसण्याचा विचार करीत होतो. एका गुफेत शिवाची प्राचीन पिंडी होती, त्यासमोर बारीक मिणमिणती समई लावली होती. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता. गुफेच्या अंगणात किमान आठ ते दहा माणसं तोंडावर पांघरून घेऊन झोपली होती. मी आदेश म्हणत शिव मंदिरात प्रवेश केला. शिवपिंडीसमोर गुरूंच्या आदेशावरून शिवाची संमती घेतल्यानंतर शिवमंदिरात मी व माझे सहकारी साधनेला बसलो, आणि काही क्षणातच माझ्यासमोर एक अज्ञात शक्ती येऊन बसली, तीने मला चल उठ! असा हुकूम केला. त्यावर मी तर इथून उठणार नाहीच व माझे सहकारी ही उठणार नाही. जर मला व माझ्या सहकाऱ्यांना कोणतीही इजा झाली तर गाठ माझ्याशी आहे, कारण या ठिकाणी मी नाथांचा आदेश घेऊन बसलो होतो असे मी सांगितले व माझ्या समोरील अज्ञात शक्ती गायब झाली या सर्व गोष्टीचा ठामपत्ता माझ्या सहकाऱ्यांना नव्हता. कारण त्यांनी जप साधनेला सुरुवात केली होती. साधारण दोनच्या सुमारास अंदाजे एक वयोवृद्ध व्यक्ती (स्त्री) शिवमंदिरात झाडू घेऊन उभ्याने झाडू मारत होती हा आवाज मी व माझ्या सहकार्यांनी ऐकला.


खरं तर 2 वाजता तिथे झाडू मारण्याचा प्रश्नच नव्हता. झाडू मारुन झाल्यावर त्या शक्तीने शिवपिंडीसमोर नमस्कार केला व क्षणात गायब झाली. या सर्व गोष्टींची चाहूल आम्हा सर्वांना जाणवत होती. अशाप्रकारे अनेक अनुभव आम्ही सर्वजण घेत होतो. आमची साधना उत्तम प्रकारे झाली व एकेकजण साधनेवरून उठू लागले. सुमारे सव्वातीन वाजता आम्ही सर्वांनी किमान अडीच तास साधना केली. गुहेच्या बाहेर अंगणात आल्यावर डोक्यावरून पांघरूण घेतलेली व्यक्ती? तिथे नव्हती.  रात्री बाराची वेळ - शिवमंदिर - गुहेच्यावर - ग्रेव यार्ड - चंद्रग्रहण - पौर्णिमा गुहेच्या मागच्या बाजूला डाव्या हाताला स्मशान असा उत्तम अनन्य योग साधून आला होता. साडेतीन वाजता आम्ही ती गुफा सोडली व परतीचा प्रवास केला. सोबत गोड आठवणी घेऊन......


Photo by Artem Beliaikin from Pexels

⚉ निशाने त्यावेळी माझ्याकडे एक असं प्रकरण आणलं की, त्यावेळी श्री. अबक पालक मंत्री होते. ते व त्यांची पत्नी नियमित सद्गुरु गगनगिरी महाराजांकडे जात असे. परंतु श्रीमान यांच्या मोठ्या मुलाची तब्येत अचानक ढासळली व तो बिछान्यावर तो खीळला. अनेक डॉक्टरी उपाय करूनही गुण येत नव्हता. बहुदा हे प्रकरण बाहेरच्या बाधेचे असावे असा त्यांना दाट संशय होता. म्हणून त्यांनी मंत्री फेम श्रीयुत दिनकर या पुरोहिताकडून आपल्या मुलाबद्दलचे असे गार्‍हाणे मांडले.


श्री दिनकर यांनी तुमच्या मुलाला करणी बाधा झाली आहे असे सांगितले, त्यावर खर्च म्हणून मंत्री महोदयाकडून सव्वा लाखाची रक्कम घेतली. (आताचे सव्वा कोटी)  तुम्ही निश्चिंत रहा तुमचा मुलगा ठीक होईल. अशी हमी दिली व विशिष्ट दिवस ठरवून मंत्र्याच्या घरी नवचंडी याग सुरू झाला. एका बाजूला मंत्री महोदय यांचा मुलगा बिछान्यावरून 3 फूट उंच उडू लागला त्यावर घरचे सर्व घाबरले. महाराज,  हे काय चालले आहे? असा सवाल केल्यानंतर पुरोहित यांनी त्यांच्या अंगातील शक्ती निघते आहे. अशी स्वयंघोषित घोषणा केली. सर्व सोहळा पार पाडून तुमचा मुलगा आता ठीक आहे काळजी करू नका. असा आधार देऊन ते आपल्या घरी परतले.


ही सर्व हकीकत निशाने जशीच्या तशी मला सांगितली. मी श्री दिनकर यांना चांगला ओळखत होतो. कारण ते एक उत्तम दशग्रंथी ब्राह्मण होते.  परंतु करणी बाधा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का ? असा सवाल मला पडला,  म्हणून मी निशा यांना श्री दिनकर यांनी चुकीची केले आहे असे सांगितले.


काही दिवसांनी निशाकडून मला निरोप आला की, तुम्हाला मंत्रीमहोदयांनी व श्री दिनकर यांनी विनंती करून बोलावले. त्यावर मी का असा प्रश्न केला?  त्यावेळेस निशा म्हणाली श्री दिनकर हे गेल्या महिनाभर  अंथरुणाला खिळून आहे आणि मंत्री महोदय यांचा मुलगा आहे तसाच आहे . त्यात कोणतेही सुधारणा नाही असे सांगितले.

मला इतर कामामुळे कोणाकडे जाणे शक्य नव्हते व तीन दिवसांनी निरोप आला की श्री दिनकर यांचा मृत्यू झाला आणि काही कालावधीतच मंत्रीमहोदयाच्या मुलाचाही मृत्यू झाला.


माझ्या साधना काळात अनेक समस्या व अध्यात्मिक चमत्कार एकमेकांच्या हातात हात घालून चालत होत्या.  कधीतरी मरणापेक्षा ही अनंत यातना होत होत्या.  तर कधी परमेश्वराचे माझ्यावर असलेल्या प्रेमाने मी भारावून जात असे नियमित साधना हीच माझी जमेची बाजू होती. माझ्या सोबत असणाऱ्या मंडळीबरोबर अध्यात्म या विषयावर तासनतास चर्चा होत असे.

Monday, 1 June 2020

01-Jun-20

नमस्कार,

बाबांनी दिलेल्या गुरु मंत्राचे  मी त्याच दिवशी संध्याकाळी अनुष्ठान करण्यास सुरुवात केली.  बाबांचा असा आदेश होता की तुम्हाला मी जी रात्रीची साधना दिलेली आहे ती थोडी कमी करून हा जो गुरुमंत्र दिलेला आहे याची साधना तुम्ही जास्तीत जास्त करावी.

मी रात्री बारा वाजता सिद्धी साधनेचा  जप करण्यासाठी बसायचो रात्रीचे मला तो विधी संपेपर्यंत अडीच वाजायचे आणि एक दीड तास झोपून चार वाजता ब्राह्ममुहूर्तावर उठून शुचिर्भूत होऊन पुन्हा गुरुमंत्राच्या जपासाठी बसण्यास सुरुवात केली होती. उत्पन्नाचे काहीही साधन नसताना मी केवळ साधनेच्याच आहारी गेलो होतो आणि केवळ साधना हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे असे मला वाटायला लागले होते.  माझा जन्म केवळ या साधनेसाठी झालेला आहे असं मी समजून होतो. 

माझ्या सिद्धी साधना आणि गुरु मंत्राच्या जपाचा प्रभाव माझ्या घराच्या वास्तूत इतका झाला होता की, माझ्या घरी आणि ऑफिसमध्ये सर्व लोकांना त्या शक्तीचा वेगवेगळा प्रभाव दररोज जाणवत होतात आणि त्याने ते खूपच प्रभावित झाले होते. 

बाबांच्या आदेशानुसार मी गुरु मंत्राचे अनुष्ठानास सुरुवात केली आणि त्याच्या पूर्ततेसाठी हवन सोहळा स्वतः स्वतःच्या घरात  गुरु मंत्राचे अनुष्ठानपूर्ती हवन करावे असे बाबांनी सांगितले होते त्याप्रमाणे मी हवन कार्य पूर्ण करून त्याची मांडणी केलेल्या वस्तू सर्वपणे आवरु लागलो.  असे करताना हवन कुंडाच्या विटा उचलण्यास गेल्यानंतर मला हे समजले की त्या प्रत्येक विटेचे वजन वाढलेले असून ते मला उचलणे अशक्य आहे म्हणून मी लगेचच त्या परिस्थितीत बाबांकडे आदेश घेण्यासाठी गेलो. 


बाबांना झालेल्या हवनातला प्रकार सांगितल्यानंतर ते गोड स्मित करून म्हणाले की, श्री गोरक्षनाथांना तुमची साधना तुमचे अनुष्ठान खूप आवडले असल्याने त्यांनी तिथेच वास करण्याचा, थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला काही मंतरलेले तांदूळ देत आहे ते आपण त्या विटेवर टाकून तीन वेळा आदेश म्हणून त्या विटा उचलाव्या. आदेशानुसार मी त्या विटेवर आणलेले तांदूळ सर्वत्र टाकले आणि तीन वेळा आदेश आदेश आदेश असे म्हणून नमस्कार केला आणि काही चुकले असल्यास मला क्षमा करावी अशी विनंती केली परंतु त्या विटेचे वजन अजूनच अनेक पटीने वाढले आणि ती वीट जागेवरची हलण्यास तयार नव्हती म्हणून मी माझ्या घरच्यांचा आधार घेऊन त्या विटा माझ्याच घरात एका कोपऱ्यात सांभाळून ठेवल्या. 

माझ्या घरच्या वास्तूचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि चैतन्यपूर्ण असे झाले होते.  मी समाजापासून या जगापासून हळूहळू अलिप्त होत चाललो होतो आणि मी एकांतवास गाठू लागलो होतो मला कोणत्याही गोष्टीत रस-आवड राहिली नव्हती. मी माझ्या छोट्याश्या एका जागी बसून एकाच ठिकाणी तासन-तास बघत असे, माझी अवस्था एखाद्या संन्यास्याप्रमाणे झाली होती मला केवळ परमेश्वराची कास लागली होती माझे  व्यवसाय उत्पन्न आणि संसार याचा मला विसर पडू लागला होता..

ठरवून एके दिवशी सकाळी पाच वाजता बाबानी मला माझ्या घराबाहेर भेटण्यास बोलावून, म्हणाले की, मी काही महिन्यासाठी बाहेरगावी चाललेलो आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि दिलेले  मंत्र जप हे संपूर्ण सुरू ठेवा. बाबा म्हणाले मी माझ्या गुरूंशी शप्पथ घेऊन सांगतो की माझ्या हातचं काहीही न राखता मी तुम्हाला सर्वस्व दिलेले  आहे तरी तुम्ही यापुढे तुमचे शिष्य स्वतः बनवू शकता, लोकांचे प्रश्न सोडवू शकता आणि या जग कल्याण्यासाठी स्वतःला समर्पित करून तुमचा जन्म घेण्याचा हेतू पूर्ण करा. आपला संसार नेटाचा करुन  व्यवसायामध्ये ज्या पद्धतीने जितकं शक्य आहे तेव्हढे लक्ष घालून स्वतःचा उदरनिर्वाह करावा. मी काही महिन्यातच परत येईन. सकाळच्या या मुहूर्तावर गुरूंनी दिलेला आशीर्वाद घेऊन मी माझ्या घरी माघारी परतलो एका वेगळ्या उद्दिष्टाकडे नजर रोखीत... 

Thursday, 28 May 2020

28-May-20

नमस्कार,

बाबांकडे गेल्यावर मी त्यांच्या हातात तो नारळ ठेवला आणि त्यांना विचारले की हे कसे काय शक्य आहे? त्यावर त्यांनी मला सांगितले की प्रथम तो नारळ  पाण्यामध्ये विसर्जन करून मग माझ्याकडे या, मग आपण बोलू... 
बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी तो नारळ एका तलाव-पाण्यात विसर्जन केला आणि पुन्हा बाबांच्या घरी आलो तर बाबा माझी वाट बघतच होते. 

आज झालेल्या हवनाच्या विधीबद्दल बाबा बोलू लागले ते म्हणाले की, आपण ज्यांच्या घरी आज हवन करायला गेलो होतो त्या यजमानाच्या घरी सुरुवातीला भिंतींच्या कोपऱ्यातून शुद्ध सुगन्धी पाणी निघायला लागले, हा प्रकार काय म्हणून त्या यजमानांनी अनेक ठिकाणी चौकशी केल्यावर त्यांना असं कळलं होतं की तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असून तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात. परंतु ते पाणी दिवसेंदिवस रंग बदलत अखेरीस ते भगव्या रंगात येऊ लागले त्याला खूप दुर्गंध येत होता. नंतर त्या वाईट शक्तीने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आणि ते यजमान दुःखी-कष्टी-पीडित  झाले. त्यांच्याकडे जी वाईट शक्ती होती जी तुम्हाला म्हातारा माणसाच्या रुपात दिसली ती होती आणि ती वाईट शक्ती घरातल्या सर्व माणसांना खुप त्रास देत होती. 

विशेष म्हणजे त्यांच्या घरात जो एक बारा वर्षाचा मुलगा होता, तो जेव्हा अभ्यासाला बसायचा त्यावेळेस त्याच्या डोक्यात कोणीतरी मारायचं, तसेच तो आंघोळीला गेला तर त्याचे कपडे मुद्दामून एखाद्या पाण्याच्या पिंपात टाकले जायचे, अचानक होणाऱ्या हालचाली, घरातले पैसे गायब होणे अशा अनेक गोष्टींमुळे ती लोक त्रस्त झाली होती. 
आपल्या आधी तिथे काही याग्निक हवनाला गेलेले असताना त्यांनी हवामानाची मांडणी सुरू केल्यावर त्या शक्तीने ती संपूर्ण हवनाची मांडणी उध्वस्त करून टाकली होती आणि हा प्रकार बघून ते याग्निक धूम ठोकून पळून गेले होते.

आपण हा विधी उत्तम रित्या पार पाडला असून आज ती सर्व लोक सुरक्षित आहे. आजच्या या विधीत माझ्यासोबत तुमचाही मोलाचा वाटा असून तुम्ही फार चांगल्या पद्धतीने हे कार्य पार पडल्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे असं सांगून बाबांनी मला शाब्बासकी दिली. 

हा सर्व प्रसंग ऐकून खरतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती कारण मला हवन करण्यापूर्वी त्या यजमानांच्या घरातील संकटाची पुसटशीही  कल्पना नव्हती आणि आपण एवढं मोठं धाडस कार्य आपल्या गुरुं सोबत केलं त्यामुळे मी स्वतःच्याच कार्याबद्दल अचंबित होतो. 

त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, आपण आपलं दुःख घेऊन बसलो आहोत. आपले प्रश्न, आपल्या शंका या पलीकडे जगात अनेक त्रस्त व्यक्ती आहेत कि, त्या लोकांच्या समस्या माझ्या समस्येपेक्षा खूप पटीने मोठ्या असल्या तरीही त्याला सामोरे जाण्यास ती लोक सज्ज असतात?

खरंतर अशी लोकं काही ढोंगी लोकांच्या जाळ्यात फसतात आणि त्यांना आर्थिक फटका बसून ते अध्यात्मावरचा  विश्वास गमावून बसतात. कुठेतरी आपली सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य हे लक्षात घेऊन आपण ही पीडितांची सेवा करण्यास आपल्या गुरूंना हातभार लावू शकतो का? याबाबत मी विचार करू लागलो. 

बँकेचा प्रश्न मार्गी लागल्याने, मी माझ्या गुरुंना माझ्या पुढच्या व्यवसायाबद्दल विचारणा केली असता त्यांनी मला आज आपण जो  हवन विधी केलेला आहे त्याप्रमाणे हे कार्य करून आपण आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करावा. कारण तुमचा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झालेला आहे. असे बाबांनी मला निक्षून सांगितले. 

मी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर डिझाईन मध्ये बऱ्यापैकी हुशार असूनही मला त्यात माझे करियर करता आले नाही हे एक मनाला दुःख करून देत होते तर दुसऱ्या बाजूने लोकांचे प्रश्न आपण कसे काय सोडवायचे आणि त्यातून आपला उदरनिर्वाह कसा काय होईल? याबद्दल मी साशंक होतो. 

आज मिळालेल्या शंभर रुपयाच्या रकमेप्रमाणे जर मला कमाई होणार असेल तर मी माझा उदरनिर्वाह कसा करायचा? त्याची सुरुवात कशी होईल? की झाली आहे? हेच मला कळेना आणि या द्विधा मनस्थितीत मी माझं घर गाठले. घरी आल्यानंतर माझ्या कुटुंबाला मी झालेली सर्व हकीकत-चर्चा सांगितली, त्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे होते आणि ते मला स्पष्टपणे जाणवत होते.