हळद
आयुर्वेदामध्ये हळदीला फार महत्त्व आहे. आपल्या रोजच्या जेवणात हळदीला असणारे स्थान सगळ्यांनाच माहिती आहे. हळदीचे अनेक प्रकार आहे. हळदीचे व्यवसायासाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, अभ्यासासाठी, यशासाठी. या सिद्ध हळदीचा चांगला उपयोग होतो.
त्वचा उजळ होण्यासाठी, त्वचा तजेलदार होण्यासाठी, व अनेक आजारांवर, ॲलर्जी, त्वचेवर डाग, खाज कॅन्सरसारख्या रोगावर हळदीचा वापर केला जातो. सर्दी झाली की गरम दूध हळद घालून घेतात. कफ, खोकला थांबण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर होतो. डायबिटीस वर हळद उपयुक्त असून काविळ, यकृत या आजारांवर लाभदायक आहे. रोजच्या जेवणातून हळद घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जखम भरण्यास मदत होते. रक्त येत असल्यास ते थांबवण्यासाठी गुण हळदीत आहे. हळद स्वादाला कडवट, पण आरोग्यासाठी गुणकारी व लाभदायक आहे.
वनस्पतिशास्त्रात काळी हळद, कुकवी (लाल हळद), पिवळी हळद, जांभळी हळद , सफेद हळद याला अत्यंत महत्त्व आहे. अनेक पुजारी अनुष्ठानासाठी या वस्तूंचा उपयोग करतात.
काळी हळद - हे भद्रकाली चे प्रतीक असून पैशाची आवक वाढण्यासाठी, शत्रुसंकटात रक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो.
लाल हळद - हे लक्ष्मीचे प्रतीक असून पैसे स्थिर राहण्यासाठी पैशाची आवक वाढण्यासाठी या हळदीचा बहुमूल्य उपयोग होतो.
सफेद हळद - सरस्वती मातेचे प्रतीक असून, विद्या यशप्राप्तीसाठी या हळदीचा उपयोग होतो.
जांभळी किंवा निळी हळद - या हळदीचे उपयोग संमोहनशास्त्रासाठी, नातेसंबंध दृढ करण्यासाठी व्यवसायासाठी, आपली कामे जलद गतीने होण्यासाठी या सर्व वनस्पतींचा उपयोग केला जातो. परंतु या वनस्पती विशिष्ट मुहूर्तावर नक्षत्रावर सचेतक केल्यास त्यांचा उपयोग बहुमूल्य होतो.
* वरील वनस्पती वाचकांना साधकांना हवी असल्यास संपर्क करावा संपर्क क्रमांक - ९३२६६६२४४१.
योग वल्ली - अजानवृक्ष
अजान वृक्षाची किमया अनेक औषधे बनविण्यासाठी होते. तसेच अध्यात्मात त्याचा सिद्धी साधण्यासाठी उपयोग असल्याचे म्हटले जाते. आताही आपण देहू आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वरांची समाधी आहे, तेथे त्यासमोर एक भव्य अजानवृक्ष आहे. त्याची फळे, पाने घेण्यास सक्त मनाई आहे. त्या वृक्ष छायेखाली अनेक साधक ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. त्या काळात साधकांच्या ज्ञानेश्वरी पोथीवर पारायण काळात एखादे तरी पान पडले. तरी ते भाग्याचे समजले जाते. व त्या साधकाला सिद्धीसाठी मार्ग सक्रिय होतो. अशी परंपरा आहे.
हा वृक्ष केवळ नाथांच्या पावित्र समाधी जवळ आढळतो. याच वृक्षाची मुळे त्यांच्या समाधीला टोचत होती. समाधीत बाधा येत असल्याने त्यांनी एकनाथ महाराजांना दृष्टांत देऊन या झाडाखाली माझी समाधी असल्याचे सांगून, त्याची मूळ, शाखा कापण्यास सांगितले. त्याप्रमाणे एकनाथांनी त्यांच्या आदेशानुसार त्या झाडाची मुळे छाटली. ज्ञानेश्वरांची भेट घेऊन पुढचा अध्यात्मिक प्रवास त्यांच्या अधिपत्याखाली सुरू ठेवला. हे आपणा सर्वांना ठाऊक आहे.
श्री ज्ञानेश्वर त्रिकाल ज्ञानी होते. त्यांनी अजान वृक्षाचे महत्त्व जाणून त्यास जवळ केले.
"अजान रुक्षाचे फळ तेषां मुखी जाण ते सेवन करता म्हणून अजरामर होय निश्चित''
हा वृक्ष फळ मुळासहीत अत्यंत उपयुक्त देह व लोह सिद्धी करणारा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे शरीरातील सर्व व्याधींचे निर्मूलन करतो त्याप्रमाणे धातू परिवर्तनही करतो. असे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे व म्हणून ज्ञानेश्वरांनी तो आपल्या समाधीवर वेलीच्या स्वरुपात ठेवला आहे. याच्या विशिष्ट प्रकाराने नुसते सेवन केले असता अष्टांगयोग साधन प्राप्त होते. असा यासंबंधी दावा आहे म्हणून त्यास योग वल्ली पण नाव आहे.
उपचार -
- अजानवृक्ष फळाचे वेलदोड्याबरोबर सेवन केल्यास गर्भधारणा होते, याबरोबर चूर्ण घेतल्यास गुप्त रोगावर उपाय होतो.
- बकुळा बरोबर सेवन केल्यास सर्वजण संमोहित होतात.
- साखरेबरोबर सेवन केल्यास यश प्राप्त होते.
- जांभळीच्या सालीसोबत चूर्ण घेतल्यास ब्रह्मंपदसारखा मान-सन्मान मिळतो.
- आंब्यासोबत सेवन केल्यास धनुर्विद्या आत्मसात होते.
वरील लहान वृक्ष वाचकांना, साधकांना हवे असल्यास माझ्याकडून उपलब्ध होईल. याची दखल घ्यावी.
संपर्क. - 9326662441


