Showing posts with label Achievement. Show all posts
Showing posts with label Achievement. Show all posts

Monday, 27 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-41

आपली पाठ आपणास दिसत नाही
स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत.

⚉ एके दिवशी सौ. निता व त्यांची बहीण माझ्या भेटीला आल्या. सौ. निता खूप त्रस्त व मानसिक रुग्ण वाटत होत्या. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे जाणवत होते. त्यांची मोठी बहीण माझ्याशी बोलत होती "माझ्या बहिणीला (सौ नीता तिचा नवरा खुप छळतो, तिला तिच्या कामावर जाऊन, रस्त्यात कुठेही अगदी  कसलेही  भान न ठेवता बेदम मारहाण करतो.) केवळ पैशासाठी तिचा हा अमानुष छळ चाललेला आहे. ती आता काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. आम्ही यावर बर्‍याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु काही गुण नाही, तुमच्याकडे आशेने आलो आहोत."

Photo by Luriko Yamaguchi from Pexels

त्या बाईची पूर्ण माहिती नाथांसमोर मांडल्यावर त्यांना प्रखर पितृदोष असल्याचे कळले. तसेच त्या बाईने अनेक विफल कार्याचा गुंता केला होता. अशाप्रकारची तिची समस्या सोडवण्यासाठी मी तिला हवनकार्य करावे लागेल, असे सांगितले. त्यावर तिने "मी तयार आहे. लवकरात लवकर आपण हे कार्य करावे. परंतु तूर्तास मला एखादी प्राणप्रतिष्ठा केलेली वस्तू मिळाल्यास मी आपली आभारी राहीन" असे ती म्हणाली. तिच्या विनंतीवरून मी तिला गोरक्षनाथांची प्राणप्रतिष्ठित वस्तू दिली.

त्यानंतर सहा महिने या बाईचा पत्ताच नाही. एके दिवशी तिने कार्यालयात फोन करून आगाऊ भेटण्याची वेळ ठरवली व ती मला भेटायला कार्यालयात आली. त्या बाईंना प्रत्यक्षदर्शी पाहिल्यावर मला कुतूहल निर्माण झाले की, काही महिन्यांपूर्वी पाहिलेली हीच का ती बाई? कारण तिच्यात खूप प्रभावी फरक पडला होता. "गुरुजी तुमच्या वस्तूने खरोखरीच किमया केली, माझे पती माझ्याशी खूप चांगले वागतात, तसेच माझा बारा वर्षाचा होस्टेलला असणारा मुलगा माझ्यासोबत राहायला आला आहे, माझी नोकरीही उत्तम आहे.

आम्ही नवरा-बायको मुलगा असे तिघे एकत्र राहतो. परंतु एक समस्या आहे तुम्ही दिलेली वस्तू माझ्याकडून गहाळ झाली  ती मला नव्याने हवी आहे". मी म्हटलं तुम्हाला तर प्रखर पितृदोष आहे, त्याचे निवारण करा पण पैशाचे बजेट नसल्याचे त्यांनी मला सांगितले व पुन्हा माझ्याकडून ती प्राणप्रतिष्ठित वस्तू घेऊन गेली.

पुन्हा एका वर्षाने त्या बाईचा फोन आला की मला माझ्या नवर्‍या पासून वेगळे व्हायचे आहे. तो मला पुन्हा त्रास द्यायला लागला आहे. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. भेट ठरवली.... आणि पुन्हा गायब.... 

पितृदोष असलेल्या व्यक्ती खूप हट्टी असतात. त्यांना हे कार्य करण्याची गरज माहीत असते परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवायचे नसते, त्यांची मानसिकता फारच कृश झालेली असते. मी अशा अनेक हट्टी मानवांना भेटलो आहे. पितृदोषाचे अनेक दुष:परिणाम आहेत. त्यासाठी आम्ही खास पुस्तकच काढले आहे परंतु शेवटी मानला तर  देव....
--------------------------------------------------------------------
You can't see your back

⚉ One day Mrs. Nita and her sister came to visit me. Hundred Nita seemed very distressed and mentally ill. He felt mentally and physically abused. Her older sister was talking to me. No, we've tried it a lot, but to no avail.

After presenting the complete details of the woman to Nathan, he realized that he had strong patriarchy. Also, the woman was involved in many failed tasks. To solve her problem like this, I have to do her funeral," he said. She said, "I'm ready. You should do this as soon as possible. But I would be grateful if you could find something I could do right now." At her request, I gave her the relics of Gorakshanatha.

For the next six months, the woman went missing. One day she called the office and made an appointment in advance, and she came to the office to meet me. When I saw the woman as an eyewitness, I became curious as to why she was the same woman I had seen a few months ago because she had a significant difference. "Guruji, your stuff worked, my husband treats me very well, and my 12-year-old son in a hostel has come to live with me. My job is great.

Photo by Grisha Stern from Pexels

The three of us live together as husband and wife and son. But there is a problem. I have lost the item you gave me. I want a new one. "

One year later, the woman called and said that she wanted to be separated from her husband. He is bothering me again. I am ready to do whatever you say. Decided to visit .... and disappeared again...

Individuals with patriarchal defects are very stubborn. They know the need to do this, but they don't want to put it into action, their mentality is fragile. I have met many such stubborn humans. There are many side effects of patriarchy. We have prepared a particular book for this, but in the end, God willing...

  • Meruprustha Shree Yantra in Brass on Turtle Shree Yantra is one of the most auspicious, important and powerful Yantras, which not only gives the maximum benefit but also proves beneficial for almost everybody.It is the source of attaining all worldly desires & fulfilling all wishes through inner cosmic power & mental strength.
  • Meru Shree Yantra is very beneficial for getting good health and wealth.
  • Meru Shree Yantra is used for removing bad energies and getting positive aura in your surroundings.
  • Meru Shree Yantra helps to protect us from all bad effects.
  • Best Suited for Puja gears or gift on auspicious moments.

50% OFF OFFER

RUDRADIVINE Brass Meru Shree Yantra with Tortoise for Good Luck, Success and Prosperity (3 x 2 Inch)-Success

Thursday, 23 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-38

अंधारात केले, पण उजेडात आले
कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच

⚉ एके दिवशी मुंबईहून पोतनीस नावाचे गृहस्थ आले. त्यांनी त्यांच्याकडील कामाचा संदर्भ मला समजावून सांगितला. त्यावर मी त्यांना एक विशिष्ट साधना करायला सांगितली. त्यावर त्यांनी होकार देत म्हटले, चालेल मी साधनेसाठी माझ्या भाचीला बसवतो. त्यावर मी त्यांना नकार दिला व म्हटले नाही चालणार.

त्यावर तोडगा म्हणून त्यावेळचे माझे स्नेही साधक श्री विजय यांनी आपल्याकडची एक केस मला देत म्हटले, महाराज त्या व्यक्तीचे काम होईल व पोतनिसाचे ही काम होईल. म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका आर्या नामक स्त्रीला पाचारण केले. तिचे व तिच्या पतीचे अजिबात पटत नव्हते. आर्याने माझ्याकडे येण्याअगोदर श्री विजय यांच्याकडे श्री सबनीस राहणार, नागपूर यांच्यासाठी भैरवी साधना केली होती.

परंतु तिचा तो एकंदरीत अंगलगटपणा पाहून, मी तिला घरचा रस्ता दाखविला. त्यानंतर माझ्याकडे ऑफिस कामाला असलेल्या संतोष नामक व्यक्तीने त्याच्या बहिणीला माझ्याकडे साधनेला आणले. परंतु तिचा ओढा माझ्याकडे घरकाम करण्याचा असल्याने ती साधीका होऊ शकली नाही.

त्यावेळी माझ्याकडे दोन वेगवेगळी ग्रहण लागलेला वीरेंद्र नामक मुलगा येत होता.  त्याने या साधनेबद्दल नीट समजून घेतले व स्वतःच्या पत्नीनेही साधना करावी. म्हणून आग्रह धरला. त्यावर मी त्याला नकार देत म्हटले, मला गाढव रेटावं लागेल. ती एकाग्रतेत खूप कच्ची आहे. मला खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यावर तिथे उपस्थित असलेल्यांनी माझ्यावर दबाव आणला व मी त्यासाठी राजी झालो.

Photo by Antonio Dillard from Pexels

आपली नोकरी सांभाळून ती बाई रोज साधना करीत असे.  रोज तिला वेगवेगळे अनुभव येऊ लागले. शक्ती आपली करामत दाखवत होती.  ती बाईही खुश होती. मला एके दिवशी तिने स्वतःचे एका परपुरुषाशी संबंध असल्याचे सांगितले. त्यावर मी तिला हे चुकीचे आहे, असे सांगितले. कृपया आपण माझ्या नवऱ्याला यातील काहीही सांगू नका. अशी विनवणी तिने माझ्याजवळ केली.

एके दिवशी तिला अत्यंत भिन्न भिन्न अनुभव येऊ लागले. आपण करीत असलेल्या साधनेवर तिचा विश्वास व श्रद्धा न राहिल्याने तिने आपला काढता पाय घेतला. नाथपंथावर अविश्वास दाखवित, अगणित आरोप केले. तिला सातत्याने वाटत होते कि, मी गुरुजींना सांगितलेले गुपित माझ्या नवऱ्याला सांगणार नाही ना. 

परंतु तिच्या आरोपामुळे तिचे पितळ मला उघडे करावे लागले. परंतु नवऱ्याचा आपल्या बायकोवर असलेल्या अति विश्वासाने त्याचा घात केला होता. कारण ती साधनेनें ध्येयाच्या जवळ येऊन ठेपली  होती, पण शेवटी विनाशकालीन विपरीत बुद्धी.

चांगले साधक किंवा साधिका मिळण्यासाठी भाग्य लागते व त्यातच मी कमी पडल्याने यांचे काम होऊ शकले नाही. आपल्या गुरूंवर श्रद्धा,  विश्वास , प्रेम पाहिजे. तसेच जी साधना करतो त्यात चिकाटी,  जिद्द हवी केवळ घोकंपट्टी ने काहीही साध्य होत नाही.
--------------------------------------------------------------------
Done in the dark, but came to light

⚉ One day a householder named Potnis came from Mumbai. He explained to me the context of his work. On that, I asked them to do a particular sadhana. He nodded and said, "I'll get my niece for the tool." I refused and said no.

As a solution to this, my friendly seeker of that time, Mr. Vijay, gave me a case and said, Maharaj, it will be the work of that person, and it will be the work of Potnisa. So he called a woman named Arya, whom he knew. She and her husband did not get along. Before Arya came to me, Shri Sabnis would stay with Shri Vijay, had done Bhairavi Sadhana for Nagpur.

But seeing her overall engagement, I showed her the way home. Then a man named Santosh, who was working for me in the office, brought his sister to me. But since she wanted me to do housework, she could not become a simpleton.

At that time, a boy named Virendra was coming to me with two different eclipses. He understood this sadhana very well, and his wife should also do the sadhana. So insisted. I refused and said, I have to ride a donkey. It is very raw in concentration. I have to work hard. Those present put pressure on me, and I agreed.

Photo by Ike Louie Natividad from Pexels

Taking care of her job, she used to do sadhana every day. Every day she began to have different experiences. Shakti was showing her magic. She was happy too. One day she told me that she was having an affair with a stranger. I told her it was wrong. Please don't tell my husband any of this. She made such a request to me.

One day she began to have very different experiences. Lacking faith and confidence in the tool she was doing, she pulled out her leg. Disrespecting Nathpantha made many allegations. She always thought that I would not tell my husband the secret I had told Guruji.

But her accusation forced me to expose her brass. But the husband's overconfidence in his wife had hurt him. Because that tool had come close to the goal, but in the end, it was the opposite intellect of destruction.

It takes luck to get the right seeker or seeker, and I could not do it because I fell short in that. We need faith, trust, and love for our Guru. Also, in the sadhana that one does, one requires perseverance, perseverance, nothing can be achieved by mere ghokampatti.

A beautiful handmade rudraksha bracelet. Colour: brown quality: AAA (1 % Authentic). 5mm diameter beads are throughout the bracelet. However, the quality of rudraksha brads ( Seeds ) and length varies. We assure you the best quality we provide A benefit of rudraksha in different jobs recommended for businessmen, signifies knowledge, understanding and creativity, administrative officer, leader, minister, hotel owner (It is beneficial for those who is trying to get a job in such fields or working in such field) energized with lord blessings A rudraksha bracelet shiva god suitable for all rashes, rudraksha can be worn by all (men, women, and children) on a regular basis, irrespective of sex, age, culture, the ethnic, geographical and religious background can wear it. Stay as it is, very demandable, lightweight, easy to wear A packing: (Handmade and Stretchable) natural five face / panchmukhi rudraksha bracelet lab certified and energized 'India rudraksha' by acharya. Is packed safely and beautifully An astrology benefits: natural 5 Mukhi Rudraksha bead bracelet is a very magical and powerful effect life. Five faces (Mukhi) rudraksha blesses the wearer with creative thoughts, better communication skills, improved speaking power, and meditation, helps to obtain spiritual faith and insight, aid in meditation and spiritual sadhana

Wednesday, 22 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-37

यशस्वी भव!

⚉ एका संध्याकाळी मी असाच निवांत बसलो असताना, माझ्या दारावरची बेल वाजली. मी दार उघडले तर समोर वयस्कर एक जोडपे उभे होते. खरंतर मी त्यांना या आधी भेटलो होतो. पण कुठे?  ते आठवेना. त्यावर ते जोडपं म्हणाले की, आम्ही प्रियाचे आई-वडील आहोत, आपल्या ऑफिसला गेलो होतो.  परंतु ते बंद असल्याने आपला पत्ता विचारत विचारत आलो. मी त्यांना घरात घेतले व शांतपणे विचारले, काय झाले? सर्व काही ठीक आहे ना? हे ऐकताच दोघेही ढसाढसा रडायला लागले. मी त्यांची समजूत काढली व मला खरं काय आहे ते सांगा. असे म्हणालो.

आमची चूक झाली. आम्ही तुमचे ऐकायला हवे होते. तुमचे न ऐकता आम्ही आमच्या मर्जीने आमच्या मुलीचे लग्न लावून दिले व पश्चाताप झाला.

खरी घटना अशी की, काही महिन्यापूर्वी हे जोडपे माझ्याकडे आले होते. आपल्या मुलीची समस्या घेऊन. प्रिया ही एक डॉक्टर होती व ती एका दुबई-स्थित कंपनीत कामाला होती. कॉम्प्युटरवर नेट चॅटींगमध्ये तिचे एका मुलाबरोबर प्रेम संबंध झाले. तो एक इंजिनियर असून पुण्याचा राहणारा, परंतु अमेरिकेत कामाला होता. हे लग्न फार थोड्या दिवसात ठरले. आई-वडिलांना या लग्नाबद्दल थोडीफार शंका होती, तेव्हा हे लग्न यशस्वी होईल का? यासाठी हे वरील जोडपे माझ्याकडे प्रश्न घेऊन आले होते. त्यावर मी नाथांकडून आदेश घेतो असे सांगितले.

आदेश घेवून त्यांना सांगितले,  तुमच्या मुलीला लग्नाअगोदर एक विशिष्ट साधना करायला हवी. जर तिचे लग्न सफल व्हावे व नवरा कायमस्वरूपी संमोहित व्हावा. यासाठी ही साधना करणे आवश्यक आहे. तसेच प्रीयाला पितृदोष असून त्याचे निवारण होणे गरजेचे आहे.  यावर तिच्या आई वडिलांनी मला असे सांगितले, प्रिया दुबईवरून भारतात परतली की, एअरपोर्टवरून थेट तुमच्या घरी तिला घेऊन येतो.  असे सांगून ते जोडपे निघून गेले होते.

परंतु त्यांनी त्यांचा शब्द न पाळता प्रियाचे लग्न लावून दिले व काही दिवसातच सासरकडून नवऱ्याचा मानसिक व शारीरिक त्रास होऊ लागला. अनेक प्रयत्न करूनही तिला यात सुधारणा करता आली नाही. अनेक प्रयत्न निष्फळ ठरत होते. म्हणून आज तिचे आई-वडील माझ्याकडे न्याय मागायला आले. आपण जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत.

Photo by Bianca from Pexels

सर्वप्रथम प्रिया माझ्या घरी आल्यानंतर तिच्याकडून पितृदोषासाठी हवन करून घेतले.  तसेच साधनेची पूर्ण माहिती व कल्पना दिली. त्यावर तिने हमी दर्शवत, प्रत्यक्ष साधना करण्यास सुरुवात केली. काही दिवस अत्यंत शांत व सुखरूप गेले. परंतु एका मध्यरात्री ती झोपेतून उठली व माझ्या पत्नीला सांगू लागली वाचवा वाचवा. तिला शुद्धीवर आणत आम्ही प्रश्न केला की, काय झाले?  त्यावर ती म्हणाली, एका बलाढ्य शक्ती माझ्याशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे अक्राळविक्राळ रूप पाहून मी पूर्णपणे घाबरले. तिची समजूत काढून तिच्याकडून साधना व्यवस्थित करून घेतली व पुर्णाआहुती नंतर ती आपल्या घरी गेली. काही दिवसातच त्यांच्याकडून फोन आला की नाथ व आपल्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले आहे.
--------------------------------------------------------------------
Success

⚉ One evening as I was sleeping, the doorbell rang. An elderly couple stood in front of me as I opened the door. I had met them before. But where I don't remember that. The couple said, "We are Priya's parents. We went to our office." But since it was closed, we kept asking for your address. I took them home and quietly asked, what happened? Is everything alright Hearing this, both of them started crying loudly. I understood them and told me the truth. That said.

We made a mistake. We wanted to hear from you. Without listening to you, we voluntarily arranged our daughter's marriage and repented.

The fact is, the couple came to me a few months ago. He was taking your daughter's problem. Priya was a doctor working for a Dubai-based company. She fell in love with a boy while chatting on the net on the computer. He is an engineer and lives in Pune but worked in the United States. The wedding took place in a short time. When the parents were a little skeptical about this marriage, will it succeed? For this, the above couple had come to me with questions. He said that he would take orders from Nathan.

Taking orders, he told them that your daughter should do a particular sadhana before marriage. If her marriage is successful and the husband is permanently hypnotized. It is necessary to do this sadhana. Also, Priya has a patriarchal defect, and it needs to be rectified. Upon this, her parents told me that when Priya returned to India from Dubai, she would pick her up at your house directly from the airport. The couple had left.

But they did not keep their word and arranged the marriage of Priya, and within a few days, her husband started harassing her mentally and physically. Despite many attempts, she could not improve. Many attempts were in vain. So today, her parents came to me to ask for justice. We are ready to do whatever you say.

Video by cottonbro from Pexels

First of all, after Priya came to my house, I took Havan from her for patriarchy. It also gave complete information and ideas of the tool. She started practicing sadhana, showing her guarantee. Some days passed very quietly and safely. But one night she woke up and told my wife to save her. Bringing her to consciousness, we asked, what happened? At that, she said, a mighty force tried to join me. But seeing their monstrous form, I was terrified. She took her understanding and arranged the sadhana from her, and after the full sacrifice, she went to her house. Within a few days, a call came from him that everything was fine with Nath and his grace.

Unlock Your True Potential!

Tuesday, 21 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-36

संग तसा रंग

⚉ अनेकवेळा केवळ फोनवर चर्चा करणार्‍या सौ. आराधना पेठे मला भेटायला आमच्या ऑफिसमध्ये आल्या. त्यांच्या अनेक प्रश्नानंतर या स्वतःच्या मूळ मुद्यावर आल्या. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे पती एका हॉटेल व्यवसायात होते परंतु त्यांच्यावर अफरातफरीचा आरोप आला होता. त्यामुळे ते खूप त्रस्त व मानसिक चिंतेत होते.
तसेच त्यांना घराच्या कर्जफेडीसाठी बँकेने तकादा लावला होता. घर जप्तीपर्यंत मजल गेली होती. त्यामुळे सौ. आराधना पेठे खूपच बिथरल्या होत्या आणि ते स्वाभाविक होते. ते कर्नाटक सेमीचे रहिवासी असल्याने त्यांची मराठी भाषा थोडी  वेगळीच होती. त्यामुळे ती मला समजून घ्यायला उशीर होत होता परंतु त्यांची निकड मला कळली होती.

त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतल्यावर मी त्यांना 'नाथांकडून आदेश काय येत ते प्रथम पाहू या, मगच त्यावर उपचार करू' असे सांगितले. नाथांकडून काही पूजा व हवनाचे  आदेश आले. त्याप्रमाणे  सौ. आराधना  पेठे  यांना फोन करून सांगितले. त्यावर त्यांनी आम्ही तुम्हाला कळवू असे सांगितले.

दरम्यान बँकेने त्यांना शॉट नोटीस दिली व ताकीद दिली. पेठे कुटुंब घाबरले त्यांनी तात्काळ पूजा हवन करण्याचा निर्णय घेतला, तसा त्यांनी फोन करून आमच्याकडे वरील उपचार करण्याची मागणी केली. त्यानुसार पुढील उपाययोजना केल्या.

Photo by Jawm Ling from Pexels

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व सौ. आराधनाकडे हवनासाठी गेलो. त्यांच्या घरात मंगल प्रसंग असल्याची अनुभूती आली,  घरात शांतता व प्रसन्न वातावरण होते, स्वच्छता होती तसेच सर्व आनंदी होते जणू यांना  काही विवंचना नाहीतच असे वाटत होते, आमचेही  मन प्रसन्न झाले.

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व विधी पूर्ण केला, त्यानंतर पेठे  मंडळींनी प्रश्न विचारला "आमच्या समस्येचे निराकरण होईल ना? उद्या बँकेचा शेवटचा दिवस आहे " मी म्हटलं "नाथांवर विश्वास ठेवा ते नक्कीच मार्ग काढतील."

दोन दिवसांनी सौ. आराधना यांचा फोन आला की त्यांच्या पतीवरचा आळ गेला व बँकेने आम्हाला काही मुदत दिली. तसेच पुढील कर्जफेडीसाठी काही योजना सांगितल्या त्यामुळे आमच्यावरचे संकट गेले असून आम्ही सर्व आपले खूप आभारी आहोत.

मी म्हटलं "माझे नको नाथांचे आभार माना" त्यावर त्या म्हणाल्या, "परंतु गुरुजी आपल्या सहकार्याशिवाय ही हे शक्य नव्हते, मी आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही."

केवळ काही उपचारांवर सौ. पेठे कुटुंबाला आधार मिळाला होता. आम्हाला या घटनेमुळे खूपच आनंद झाला होता.
--------------------------------------------------------------------
With the same color

⚉ Many times Mrs. who only discusses on the phone. Aradhana Pethe came to our office to meet me. After many of their questions, this happened to its own original point. Her problem was that her husband was in the hotel business, but she was accused of fraud. So he was very distressed and mentally anxious.
He was also charged by the bank for repaying a home loan. The house was confiscated. Therefore, Mrs. Aradhana Pethe was very scattered, and it was natural. As he is a resident of Karnataka Semi, his Marathi language was a bit different. So it was too late for her to understand me, but I knew her urgency.

After getting all the information from him, I told him, 'Let's see what Nathan's order is, then we will treat it.' Nathan ordered some poojas and havans. Accordingly, Mrs. Aradhana told Pethe by phone. They said we would let you know.

Video by cottonbro from Pexels

Meanwhile, the bank gave them short notice and a warning. Frightened by the Pethe family, they immediately decided to perform Pooja Havan, so they called us and demanded the above treatment. Further measures were taken accordingly.

As planned, we all Mrs. Went to Aradhana for Havana. There was a feeling of Mars in their house, there were peace and serenity in the house, there was the cleanliness, and everyone was happy as if they didn't feel any discomfort, our mind was also happy.

We completed all the rituals as scheduled, then the congregations asked, "Will our problem be solved? Tomorrow is the last day of the bank." I said, "Trust, Nathan, they will find a way."

Two days later, Mrs. Aradhana got a call that her husband was upset, and the bank gave us some time. He also mentioned some plans for the next loan repayment so that the crisis is over, and we are all very grateful to you.

I said, "Thank you for not wanting me, Nathan." She said, "But Guruji, this would not have been possible without your help. I will never forget your gratitude.

Mrs. on only a few treatments. The Pethe family had received support. We were pleased about this incident.

Saturday, 18 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-34

अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही

⚉ ऑफिसमध्ये मालाडहून सौ इंदू माझ्या भेटीला आल्या. त्या खूप घाबरलेल्या होत्या, रडत होत्या.  गुरुजी माझा संसार वाचवा ती स्त्री माझा संसार उध्वस्त करीत आहे. मी तिला पाणी पिण्यास दिले व म्हटले शांत व्हा. त्यांची संपूर्ण माहिती लिहून घेतली. तेव्हा असे कळले की,  तिच्या पतीला त्या शेजारच्या स्त्रीने जेवणातून काही वस्तू खायला देऊन संमोहित केले होते. त्यामुळे तो आपल्या पत्नीला यतेच्छ  मारहाण करीत होता. 

इंदुची माहिती पाहून तिला काही उपाय, वनस्पती-हवन सुचविले. ती त्वरित माझ्या भेटीला आली.  गरीब परिस्थिती असूनही ती भरपावसात माझ्याकडे प्रभावी कवच व विशिष्ट वनस्पती जिचा वापर तिला जेवणातून करावयास सांगीताला.  

तसेच  काही तोडगे मी तीला सांगितले. इंदूसाठी सिद्ध वनस्पतीद्वारे प्रभावीहवन करून त्या हवामानाचा भस्म तिला दिला. भस्म नवऱ्याला जेवणातून देण्यास सांगितले. तिनेही पूर्ण श्रद्धेने वरील सर्व उपाय सार्थकी केले. तिचा नवरा दारूच्या आहारी गेला होता. जुगार खेळत होता, तिला मारहाण करत होता व बाहेरख्याली असून शेजारील बाईच्या नादी लागला होता. 

परंतु नाथांच्या कृपेने व गुरु आशीर्वादाने मी दिलेला भस्म व इतर गोष्टींनी आपली सिद्धता सिद्ध करण्यास समर्थ ठरले. अशा अनेक गरीब निराधार स्त्रिया माझ्या या आध्यात्मिक प्रवासात मला भेटल्या. माझ्या कुवतीप्रमाणे प्रत्येकांचे दुःख दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील ही सर्व नाथांची कृपा.....

Photo by Austin Guevara from Pexels

⚉
घाटकोपर येथे राहणाऱ्या हैदराबादि  स्त्री  माझ्या भेटीस आली. जी प्रत्येक घरात जाऊन घरकाम करीत होती.  या स्त्रीला सुद्धा नवऱ्याचा असाच त्रास होता. नवरा पूर्णतः परस्त्री च्या नादी लागलेला होता. जुगाराचे वेड होते. घर खर्च तो स्वतः चालवत नव्हता. त्याची बायको कमवून आणायची तो जुगारात पैसे हरत असे.
 
सोहम भगवती मासिक वाचून ज्या घरी ती घरकाम करत होती, त्या स्त्रीने माझ्याकडे आणले. तिला पूर्ण विश्वास होता की, सोहम भगवती कार्यालयात आल्यावर आपले काम शंभर टक्के होणार. या विश्वासाच्या जोरावर व नाथांच्या कृपेने मी तिला सिद्ध कुंकू, प्रभावी कवच, प्रभावी धूप कांडी व भस्म इतर काही वनस्पती, विशिष्ट तोडगे या सर्वांच्या जोरावर तिचा नवरा तिच्याशी व्यवस्थित वागू लागला व त्यांचा संसार आज रोजी सुखी आहे.

सिद्ध कुंकुम
सिद्ध कुंकू हे अशा स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी तयार केलेले आहे. ज्या व्यक्तींना नवऱ्यापासून जाच किंवा इतर कारणाने त्रास होत असेल किंवा एखाद्या स्त्रीचा पती तिच्याकडे लक्ष देत नसेल व तो इतर ठिकाणी नादी लागला असेल तर सिद्ध कुंकुम चा नित्य वापराने तिचा पती अथवा पत्नी त्याला किंवा तिला पूर्ववत प्राप्त होऊ शकते. या कुमकुम मध्ये विशिष्ट प्रभावी वनस्पतींचा, भस्माचा, मंत्रांचा वापर केला असून सिद्ध कुंकुम गुणकारी, अनमोल उपयोगी आहे. यासोबत प्रभावी धूप काडीचा  वापर अवश्य करावा. 

सिद्ध कुंकुम

प्रभावी धूप


--------------------------------------------------------------------
Wisdom does not come without experience.

⚉ Mrs. Indu from Malad came to visit me in the office. She was terrified, crying. Guruji, save my world. That woman is destroying my world. I gave her water to drink and said calm down. Wrote down their complete information. It turned out that her husband had been hypnotized by the woman next door. So he was beating his wife.

Seeing Indu's information, he suggested some solution, plant-incense. She came to visit me immediately. Despite her poor condition, she told me that she had an active shield and a particular plant to use in her meal.

I also told her some solutions. Influenced by the proven plant for Indus, it gave her the ashes of that weather. Bhasma asked her husband to give her food. She also fulfilled all the above measures with full faith. Her husband had gone on an alcohol diet. He was gambling, beating her, and was out and about.

But with the grace of Nath and the blessings of Guru, the ashes and other things I gave were able to prove their worth. Many such poor, destitute women met me on this spiritual journey. I will always be ready to alleviate the suffering of every one according to my strength.

Photo by Andrea Piacquadio from Pexels

⚉ A Hyderabadi woman from Ghatkopar came to visit me. Who went to every house and did housework. This woman had a similar problem with her husband. The husband was utterly obsessed with adultery. Gambling was crazy. He was not running the house himself. He used to gamble to earn money for his wife.
 
After reading Soham Bhagwati magazine, the woman at the house where she was doing housework brought it to me. She was confident that when Soham Bhagwati came to the office, her work would be one hundred percent. On the strength of this faith and by the grace of Nath, I gave her Siddha Kunku, an active shield, a useful incense stick, and some other plants, unique solutions, all her husband started treating her properly, and their world is happy today.

Siddha Kunku is made for such women and men. People who are being harassed by their husbands due to harassment or other reasons or if a woman's husband is not paying attention to her and she has become naदीve elsewhere, then by regular use of Siddha Kunkum, her spouse can get her or her back. In this kumkum, specific useful plants, ashes, mantras are used, and proven kumkum is beneficial, invaluable. Also, a helpful incense stick must be used.

Friday, 17 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-33

संग तसा रंग

⚉ सौ माला, राहणार डहाणू . सोहम भगवती मासिक वाचून मालाची वहिनी तिला माझ्या कार्यालयात घेऊन आली. तिची समस्या नाजूक होती, तिचा नवरा गेली सहा वर्षे लग्न करून झाले तरी तो संसार करण्यास तयार नव्हता.  त्यांचे कोणतेही शारीरिक संबंध आले नव्हते. 

कारण नवरा हा समलिंगी संबंधात अडकला होता. त्याला समोरच्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर काहीही दिसत नव्हते. त्यामुळे मालाची मनस्थिती  नाजूक होती की, आपण काय करावे ? घटस्फोट घ्यावा की जगाला ओरडून सांगावे? 

तिची सर्व माहिती घेऊन नाथाजवळ मांडली. त्यावर मला असे आदेश आले की, तांत्रिक हवन काही सिद्ध वनस्पती, पूजेच्या वस्तू  तसेच मालाच्या साधनेबद्दल आदेश मिळाले होते. त्याप्रमाणे मी त्यांच्या घरी जाऊन हवन करून घेतले व मालाला साधनेसाठी उपयुक्त म्हणून साधना कक्षात विशिष्ट पद्धतीने साधना करण्याची अनुमती दिली.

 रात्री बारा वाजता साधनेला सुरुवात होऊन, सकाळी तीन वाजेपर्यंत अशी ती साधना करायची होती. 14 दिवस तिने न चुकता, न डगमगता, न घाबरता, साधना केली.  साधनेनंतर पूर्णाहुती करण्यात आली. मालानी विश्वासाने संयमाने केलेली साधना फळास आली.

तिचा नवरा समोरच्या व्यक्तीच्या जाळ्यातून हळूहळू बाहेर निघू लागला,  त्यांचा संसार सुखी झाला. पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण, प्रेम वाढण्यास मदत झाली. काही दिवसांनी माला माझ्याकडे आली व माझ्या पाया पडून रडू लागली की,  गुरुजी तुमच्या कृपेने हे सर्वकाही मी अनुभवू शकते. अन्यथा आम्ही सर्व आशा सोडल्या होत्या. 

तुम्ही शिकवलेली साधना तसेच गळ्यात धारण करायला दिलेले कवच व काही इतर तोडगे यामुळे मी माझ्या संसारात आज रोजी सुखी होऊ शकले आहे. तुमचे उपकार जन्मभर फेडू शकत नाही.  तरी अशीच कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मी आपणास विनंती करतो. 

मी तिला म्हटले की, हे तुझेच यश आहे आणि ते तू तुझ्या जिद्दीने मिळवले आहे.  नाथांची कृपा हे त्याचे मूळ कारण आहे.  तरीही साधना तू चालता फिरता चालूच ठेव.  मंत्र जपात कुठलाही खंड करू नकोस.

Photo by Anna Shvets from Pexels

With the same color

⚉ Mrs. Mala, stay Dahanu. After reading Soham Bhagwati magazine, Mala's daughter-in-law brought her to my office. Her problem was delicate, her husband had been married for the last six years, but he was not ready to live. They had no physical contact.

Because the husband was involved in a homosexual relationship, he saw nothing but the person in front of him. So the mood of the goods was delicate, what should we do? Divorce or shout out to the world?

She took all her information and presented it to Natha. On this, I received orders that the technical Havan had received requests for some proven plants, objects of worship as well as means of goods. So I went to their house and performed Havan and allowed Mala to perform sadhana uniquely in the sadhana room as it is useful for sadhana.

The sadhana started at midnight and lasted till 3 a.m. For 14 days, she practiced sadhana without fail, without wavering, without fear. The instrument was then completed. Malani's sadhana with faith came to fruition.

Her husband slowly started to get out of the trap of the person in front of him; their world became happy. It helped the husband and wife to grow in love and affection for each other. A few days later, I came to me and fell at my feet and started crying that Guruji, by your grace, I can experience all this. Otherwise, we would have given up all hope.

The sadhana you have taught me, the armor you have given me to wear around my neck, and some other solutions have made me happy in my world today. Your gratitude cannot be repaid for life. However, I request you to have the same grace on our family forever.

I told her, this is your success, and you have achieved it through your perseverance. Nathan's grace is the root cause. Still keep the sadhana going on. Do not break any mantra jap.

यह बेस्टसेलिंग पुस्तक सरल भाषा में सिखाती है कि पैसे की सच्चाई क्या है और अमीर कैसे बना जाता है। लेखक के अनुसार दौलतमंद बनने की असली कुंजी नौकरी करना नहीं है, बल्‍कि व्यवसाय या निवेश करना है।

34% OFF OFFER

Rich Dad Poor Dad - 20th Anniversary Edition (Hindi) Paperback – 1 September 2002-success

Wednesday, 15 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-31

अशक्यकोटीतील गोष्टी
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था

⚉ श्री शेट्टे, राहणार मुंबई. जुलै 2005 मध्ये या यजमानाकडे पितृ याग  करायचा होता सकाळी पावसाने जोर धरला होता त्याचे साहित्य आणून ठेवले होते व त्या घरातील सर्वांनी हवंन कार्यासाठी सुट्टी काढली होती.

यजमानांचा सकाळीच मला फोन आला आम्ही सर्वांनी सुट्टी काढली आहे तुम्ही नक्की येणार ना कारण पाऊस ही जोरदार आहे मी प्रवासासाठी गाडीही ठरवली होती मी म्हटलं नाथांचा आदेश आहे, आम्ही नक्की येणार.

आम्ही ठरलेल्या वेळी हवंन कार्याला निघालो जसजसे आम्ही मुंबईच्या दिशेने जात होतो तसतशी आमची वाट बिकट होत चालली होती. शेवटी पोलीस चेक पोस्टवर आम्हाला पोलिसांनी अडवले व पुढे आपल्या जीवाला धोका आहे. असे बजावले परंतु मला केवळ नाथांचा आदेशच दिसत होता. मी त्यांना न जुमानता पुढील प्रवास पत्करला.

पुढे तर पोलिसांनी रस्ता अडविला होता माझ्या सहकार्यांनी माझ्या सांगण्यावरून तो रस्ता मोकळा केला रस्त्यावरचे लोक आम्हाला वरून ओरडत होते पुढे जाऊ नका पण माझ्या निश्चयापुढे ते सर्व हतबल झाले काही अंतरानंतर आमच्या गाडीचा चालक मी पुढे गाडी चालवणार नाही, कारण रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहात गाडीचा तोल जाऊ शकतो. तुम्ही माझ्या मालकांशी बोला. मग पुढे ठरवून मी त्यांच्या मालकांशी बोललो जर तुमच्या गाडीला काहीही नुकसान झाले तर ते मी स्वतः भरून देइन. या वचनानंतर मालकांच्या संमतीनुसार गाडी चालक गाडी चालवण्यास राजी झाला.

मोठ्या अथक प्रयत्नानंतर आम्ही यजमानांकडे पोहोचलो आम्हाला पाहताच त्यांना हायसे आणि नवल वाटले. पुढे त्यांच्या घरचा सोहळा सुरळीत पार पडला व मी व माझे सहकारी परतीच्या प्रवासाला पाण्यातून वाट शोधत शोधत निघालो.  वाहन व माझे सहकारी सर्व सुखरूप आपापल्या घरी पोहोचले हा केवळ नाथांचं चमत्कार होता.. श्री शेट्टी यांचे ज्या कामासाठी हवन केले होते ते काही महिन्यातच काम पूर्ण झाले त्यांनी माझे व नाथांचे आभार मानले....

Photo by Valdemaras D. from Pexels
--------------------------------------------------------------------
Impossible things

⚉ Mr. Shette will live in Mumbai. In July 2005, the host was supposed to pay his respects to his father. He had brought his belongings in the morning when it was raining heavily, and everyone in the house was on vacation.

I got a call from the hosts in the morning. We are all on holiday. You will come because it is raining heavily. I had also arranged a car for the trip.

We left for Hawan at the appointed time. As we were heading towards Mumbai, our wait was getting worse. Eventually, we were stopped by the police at the police check post, and our lives are in danger. It sounded like that, but I could only see Nathan's order. I took the next journey despite them.

Later, the road was blocked by the police. My colleagues cleared the way at my request. The people on the street were shouting at us from above. Don't go ahead. You talk to my boss. Then I decided to speak to their owners, and if there is any damage to your car, I will pay for it myself. After this promise, the driver agreed to drive the vehicle with the consent of the owner.

After much effort, we reached out to the hosts who were hilarious and surprised to see us. Later, the ceremony at their house went smoothly, and my colleagues and I set out on our way back, looking for a way out of the water. It was only a miracle of Nath that the vehicle and my colleagues reached their homes safely. The work for which Mr. Shetty was offered was completed within a few months. He thanked Nath and me...

Tuesday, 14 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-30

अती झाले अन आसू आले
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते

⚉ माझ्याकडे मुंबईहून एक सोनल नावाची बाई आपल्या आई-वडिलांना घेऊन आली. वडील रिटायर इन्कम टॅक्स ऑफिसर होते. महिला 26 वर्षाची असावी.  नवरा चांगल्या ठिकाणी कामाला होता. लग्न होऊन केवळ सहा महिने झाले होते. परंतु नवरा आपल्या आई बहिणीच्या सांगण्यावरून तो आपल्या पत्नीला सोनलला खूप त्रास देत होता. त्यामुळे त्यांचे दोन महिन्याचे बाळ सुद्धा गेले. सोनल मला तिची हकीकत रडतच सांगत होती. की महाराज, काहीही करा पण माझ्या नवर्‍याला माझा गुलाम करा. त्याने मला खूप त्रास दिला आहे.  मी नाथांकडून आदेश घेऊन सोनलला एक गूढविद्या शिकवली. तिने मन लावून श्रध्देने साधना पूर्ण केली. त्यानंतर एक विशिष्ट हवनाद्वारे तिची मनोकामना पूर्ण झाली.  या साधनेच्या पूर्णाहुतीला आपण जी  इच्छा मनी धरतो तेच ती शक्ती पूर्ण करीत असते.
आज रोजी सोनल, आपल्या नवऱ्याबरोबर स्वतंत्र संसार करीत असून, तिला दोन मुले आहेत. नाथांच्या कृपेने हा चमत्कार घडला.  त्यांना त्रिवार अभिवादन.....


⚉ सोनलने हा सर्व अनुभव आपल्या मैत्रिणीला सांगितला.  तिचे नाव मीना असे होते.  ती माझी भेट ठरवून मला भेटायला आली. भेटीदरम्यान तिने तिच्या नवऱ्यापासून कसा काय त्रास होतो, याची कल्पना मला दिली. आणि वरील साधना माझ्या घरी करण्यास विनंती केली. त्यावेळी माझ्याकडे पालघर हून एक अशीच केस आली  होती.  तिचे नाव तृप्ती असे होते. तिलाही नवऱ्याचा त्रास होत होता. परंतु एका वेळी एकच जण या साधनेला बसू शकत असल्याने मी मिनाला प्रथम प्राधान्य दिले. ठरलेल्या वेळेप्रमाणे मीना साधनेसाठी 14 दिवसांसाठी कामाची सुट्टी घेऊन आली. 

तिची आकलन शक्ती चांगली होती. पण मन चंचल असल्याने एक मतावर तिला ठाम राहणे हे तिला जमत नव्हते.
योग्य मार्गदर्शन घेऊन साधनेसाठी पेहराव करून पूर्ण तयारीनिशी मीना साधनेला बसली. 14 दिवसातच तिला शक्तीचे बरेच अनुभव आले. पण तिने न डगमगता साधना पूर्ण केली. मी तिला पूर्णाआहुती अगोदर शक्ती स्थानावर घेऊन गेलो आणि म्हणालो उद्या  पूर्णाहुती आहे.  त्या अगोदर या स्थानावर तुमची इच्छा (आपल्या नवऱ्या बद्दल मनात धरलेली आहे ) ती तू येथे स्थानावर उपस्थित शक्तीला सांगून घे!  त्याप्रमाणे तिने आपली मनोकामना तिथे प्रकट केली.

दुसऱ्या दिवशी  पूर्णाहुती  नंतर तिच्या घरून फोन आला की, तुझ्या नवऱ्याची तब्येत बिघडली आहे. आणि त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवले आहे.  त्यावर मी तिला विचारले,  की तू शक्तीकडे काय मागितलं?  तर ती म्हणाली गुरुजी मला माफ करा. मला माझे बॉस खूप आवडतात आणि ते माझे व्हावेत. आमच्यातला अडथळा दूर व्हावा. यासाठी मी शक्तीकडे साकडे घातले. मी म्हटल आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा व संधीचा कसा दुरुपयोग करून घ्यावा, हे तुझ्याकडून शिकावं . याबाबतची थोडीतरी कल्पना तू मला द्यायला हवी होती. काल पर्यंत तुला तुझा नवरा सुधारलेला व तुझ्यावर खूप प्रेम करणारा म्हणून पाहिजे होता. मग आज अचानक हे बॉसचे प्रकरण कुठून उफाळून आले. मीना खूप रडत होती, तिच्या चुकीच्या मनोकामनेबद्दल परंतु आता खूप उशीर झालेला होता. .....
--------------------------------------------------------------------
To exaggerate

⚉ A woman named Sonal came to me from Mumbai with her parents. The father was a retired income tax officer. The woman should be 26 years old. The husband was working in the right place. It had been only six months since the marriage. But the husband was harassing his wife Sonal a lot at the behest of his mother and sister. So did their two-month-old baby. Sonal was telling me her reality while crying. Sir, do anything but make my husband my slave. He has bothered me a lot. I took orders from Nathan and taught Sonal a mystery. She completed the Sadhana with faith. A special havan then fulfilled her wish. It is the power that fulfills the desires of the mind for the completion of this tool.
Today, Sonal lives with her husband and has two children. This miracle happened by the grace of Nathan. Greetings to them three times .....

⚉ Sonal shared all these experiences with her friend. Her name was Meena. She arranged to visit me. During the visit, she gave me an idea of ​​what was bothering her from her husband. And requested to do the above Sadhana at my house. At that time, I had a similar case from Palghar. Her name was Tripti. She, too, was troubled by her husband. But since only one person can fit this device at a time, I preferred Mina first. As per schedule, Meena took 14 days' work leave for Sadhana.

Photo by Asad Photo Maldives from Pexels

Her comprehension was excellent. But because of her fickle mind, she could not stand on one vote.
With proper guidance, Meena sat on the Sadhana with full preparation, dressed for the Sadhana. In just 14 days, she experienced a lot of strength. But she completed the Sadhana without hesitation. I took her to the power position before the full sacrifice and said tomorrow is the whole sacrifice. Before that, tell your wish (which is kept in mind about your husband) to the power present in this place! That's how she expressed her desire there.

The next day, after the funeral, a phone call came from her house, saying that her husband was not feeling well. And has put him in the hospital. I asked her, "What did you ask Shakti for?" So she said Guruji forgive me. I love my boss, and they should be mine. The barrier between us must be removed. For this, I put my hand to the power. I want to learn from you how to abuse your rights and opportunities. It would help if you gave me some ideas about ​​this. Till yesterday you wanted your husband to be reformed and to love you very much. Then all of a sudden, today, this boss case came out of nowhere. Meena was crying a lot about her wrong mindset, but now it was too late. .....
https://gxgu9gktreso.com/q0cpkp3hnx?key=24b8d68029709f174d441d85db6c08ea