Wednesday, 15 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-31

अशक्यकोटीतील गोष्टी
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था

श्री शेट्टे, राहणार मुंबई. जुलै 2005 मध्ये या यजमानाकडे पितृ याग  करायचा होता सकाळी पावसाने जोर धरला होता त्याचे साहित्य आणून ठेवले होते व त्या घरातील सर्वांनी हवंन कार्यासाठी सुट्टी काढली होती.

यजमानांचा सकाळीच मला फोन आला आम्ही सर्वांनी सुट्टी काढली आहे तुम्ही नक्की येणार ना कारण पाऊस ही जोरदार आहे मी प्रवासासाठी गाडीही ठरवली होती मी म्हटलं नाथांचा आदेश आहे, आम्ही नक्की येणार.

आम्ही ठरलेल्या वेळी हवंन कार्याला निघालो जसजसे आम्ही मुंबईच्या दिशेने जात होतो तसतशी आमची वाट बिकट होत चालली होती. शेवटी पोलीस चेक पोस्टवर आम्हाला पोलिसांनी अडवले व पुढे आपल्या जीवाला धोका आहे. असे बजावले परंतु मला केवळ नाथांचा आदेशच दिसत होता. मी त्यांना न जुमानता पुढील प्रवास पत्करला.

पुढे तर पोलिसांनी रस्ता अडविला होता माझ्या सहकार्यांनी माझ्या सांगण्यावरून तो रस्ता मोकळा केला रस्त्यावरचे लोक आम्हाला वरून ओरडत होते पुढे जाऊ नका पण माझ्या निश्चयापुढे ते सर्व हतबल झाले काही अंतरानंतर आमच्या गाडीचा चालक मी पुढे गाडी चालवणार नाही, कारण रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहात गाडीचा तोल जाऊ शकतो. तुम्ही माझ्या मालकांशी बोला. मग पुढे ठरवून मी त्यांच्या मालकांशी बोललो जर तुमच्या गाडीला काहीही नुकसान झाले तर ते मी स्वतः भरून देइन. या वचनानंतर मालकांच्या संमतीनुसार गाडी चालक गाडी चालवण्यास राजी झाला.

मोठ्या अथक प्रयत्नानंतर आम्ही यजमानांकडे पोहोचलो आम्हाला पाहताच त्यांना हायसे आणि नवल वाटले. पुढे त्यांच्या घरचा सोहळा सुरळीत पार पडला व मी व माझे सहकारी परतीच्या प्रवासाला पाण्यातून वाट शोधत शोधत निघालो.  वाहन व माझे सहकारी सर्व सुखरूप आपापल्या घरी पोहोचले हा केवळ नाथांचं चमत्कार होता.. श्री शेट्टी यांचे ज्या कामासाठी हवन केले होते ते काही महिन्यातच काम पूर्ण झाले त्यांनी माझे व नाथांचे आभार मानले....

Photo by Valdemaras D. from Pexels
--------------------------------------------------------------------
Impossible things

Mr. Shette will live in Mumbai. In July 2005, the host was supposed to pay his respects to his father. He had brought his belongings in the morning when it was raining heavily, and everyone in the house was on vacation.

I got a call from the hosts in the morning. We are all on holiday. You will come because it is raining heavily. I had also arranged a car for the trip.

We left for Hawan at the appointed time. As we were heading towards Mumbai, our wait was getting worse. Eventually, we were stopped by the police at the police check post, and our lives are in danger. It sounded like that, but I could only see Nathan's order. I took the next journey despite them.

Later, the road was blocked by the police. My colleagues cleared the way at my request. The people on the street were shouting at us from above. Don't go ahead. You talk to my boss. Then I decided to speak to their owners, and if there is any damage to your car, I will pay for it myself. After this promise, the driver agreed to drive the vehicle with the consent of the owner.

After much effort, we reached out to the hosts who were hilarious and surprised to see us. Later, the ceremony at their house went smoothly, and my colleagues and I set out on our way back, looking for a way out of the water. It was only a miracle of Nath that the vehicle and my colleagues reached their homes safely. The work for which Mr. Shetty was offered was completed within a few months. He thanked Nath and me...

No comments:

Post a Comment