सत्य अनुभव
भाग-२५
अनुभवाशिवाय शहाणपण नसते. |
⚉ भ्रमंतीच्या काळात साधना करण्याचा योग अनेकदा आला. अशाच एके ठिकाणी गुरुतुल्य श्री योगेन्द्रदास महाराज यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांच्या आग्रहाखातर मला त्यांचे घरी बोलावले व थांबवून घेतले. माझी राहण्याची उत्तम व्यवस्था करून, साधना करण्याचा दिवस ठरवला. म्हणाले की, हम सब मिलके साधना करेंगे! और अपने अपने शक्तियों को बूलायेगे. मी म्हणालो काय करणार आपण साधना करून, अजून काय भरभक्कम होऊया ! दिवस, वेळ, ठिकाण ठरले. ज्या पहाटे आम्ही साधनेला बसणार होतो. त्याच्या आदल्या रात्री बारा वाजता महाराज माझ्याकडे आले आणि म्हणाले की, मै अभी पुजे मै बैठा था ! तो मैने देखा की आपकी साधना उच्चतम है! आणि त्यांनी त्यांचे दोन्ही तळहात मला दाखविले. तर ते पूर्णपणे लाल झालेले होते.
देखिये बिना कोई चीज इस्तमाल किये मेरे हाथ कैसे लाल हो गये है. मै सवरे तीन बजे आऊंगा आप तैयार रहीए! मी ठीक आहे, असे म्हटले!
Photo by Anthony Shkraba from Pexels |
पहाटे तीन वाजता महाराजांनी व त्यांच्याबरोबर एक ब्राह्मण आणि एक सहकारी माझ्याकडे आले. मी तयार असल्याने त्यांच्याबरोबर साधनेला निघालो. नदी पार केल्यावर एका ठिकाणी नदीच्या मध्यावर मी पोहोचलो. तेथे आधीच हवनाची मांडणी केली होती.
महाराजांनी मला आदेश दिला. आप अभी साधना करने बैठो. मै भी आपके साथ बैठता हू. पहाटेचे साडेतीन वाजले होते. मी माझ्या गुरु प्रणालीला नमस्कार करून, नाथांचा आदेश घेऊन, सुगंधी अत्तर लावून साधनेसाठी आसनस्थ झालो. शक्तीचे आव्हान करण्यास सुरुवात केल्यावर अनेक आवाज यायला लागले. माझ्या भ्रूमध्यावर सूर्यमंडळ तळपायाला लागले. अनेक हॅलोजन माझ्यावर मारावे, इतका प्रकाश मी अनुभवत होतो . शक्ती माझ्याभोवती प्रदक्षिणा घालीत होती. मला खूप सुरक्षित असल्याचा अनुभव आला. मनात भरून आले की, आपल्या हाकेला ही शक्ती अनेक थर पार करून उपलब्ध होऊ शकते.
हा माझा साधनेचा, माझ्या गुरूचा, माझ्या भक्तीचा, विश्वासाचा, सन्मान होता. आमच्यासोबत आलेले इतर सहकारी, शक्तीच्या सहवासाने गुंग होऊन झोपून गेले. साधना पूर्ण झाल्यावर मी डोळे उघडल्यानंतर पाहिले तर लांब महाराज उभे होते. मी नमस्कार करून उठलो व महाराजांनी मला हवनाच्या इथे बसायला सांगितले. सोबत आलेला ब्राह्मण व मी असे आम्ही दोघांनी मिळून लघुरुद्राला सुरुवात केली. मी पण मनाने एकाग्र होऊन ते पूर्ण केले व पूर्ण आहुतीचा नारळ अर्पण केला.
सर्व विधी पूर्ण झाल्यावर महाराजांनी मला जवळ घेतले व म्हणाले, आप आजसे बाबा बन गये हो! पण मला कोणत्याही पदवीची-उपाधीची गरज नव्हती. मी मनातून खूपच खुश होतो. शक्तीच्या सहवासातून मी सुखावून गेलो होतो. एखाद्या टॉर्च मध्ये नव्याने बॅटरी घातल्यानंतर जसे तेज येते, तसेच काहीसे मी अनुभवत होतो. हा सत्य अनुभव मी आजवर माझ्या शिष्यांना सांगितला तो मी आज, तुमच्या पुढे मांडतो आहे.
वरील साधनेने महाराजांनी माझी परीक्षा घेतली होती. माझा माझ्या असणारा गुरूवरचा विश्वास, माझी जिद्द, चिकाटी व संयम या गुणांनी मी यशस्वी झालो होतो. असा अनुभव मला अनेक वेळा आला की, अगदी नवशिक्या साधकही आपली परीक्षा द्यायला मागेपुढे करत नाही. पण आपला नाथावर असा दृढ विश्वास आपला तारक ठरतो.
वाचक हो आपण साधक आहात. अशा परीक्षा आपल्या आयुष्यात येऊन गेल्या असतील किंवा येतील त्यामुळे साधकांनी प्रत्येक परीक्षेसाठी तत्परता ठेवावी शेवटी नाथ हे आपल्या सोबत आहेतच, आदेश !
---------------------------------------------------------------------------------------------------------------
NATURAL INSECT REPELLENT: Add a few drops of this oil to the water in the spray can, it will not only deodorize but also keeps the insects at bay.
PAIN RELIEVER: Soak your feet in a footbath with a couple of drops of lemongrass essential oil to relax your soles. Good for those who suffer from arthritis.
NATURAL DEODORIZER: Add a few drops to spray bottle containing water. Spray it around the house.
AROMATHERAPY: Use in candle or electric diffuser to uplift mood and spirit, leaving an energized feeling. This oil has a sweet lemony aroma.
MASSAGE OIL: Mix a few drops of Organix Mantra's lemongrass oil with any one of the carrier oil such as Jojoba oil, coconut or almond oil.
Real Experience
Episode-25
There is no wisdom without experience.
⚉ Yoga was practiced many times during the wanderings. In one such place, I met Guru-like Shri Yogendradas Maharaj. At their urging, they called me to their home and stopped me. They arranged the day of sadhana, making the best arrangements for my stay. Said, we will all do sadhana together! And will summon their powers. I said, what are you going to do with sadhana? Let's be healthy! Day, time, place. The morning we were to sit on the instrument. Maharaj came to me at noon the night before and said, I was sitting in worship! So I saw that your sadhana is the highest! And they showed me both their palms. So they were completely red.
See how my hands have turned red without using anything. I will come at three in the morning, be ready! I said, okay!
Photo by Matheus Bertelli from Pexels |
At three in the morning, Maharaj and a Brahmin and a colleague came to me with him. I went to the tool with them as I was ready. After crossing the river, I reached a place in the middle of the river. Havana was already laid out there.
Maharaj gave me orders. You just sit down to do sadhana. I sit with you too. It was half-past three in the morning. I saluted my Guru system, took Nathan's order, applied perfume, and sat down for the instrument. As power began to challenge, many voices began to come. The sun began to set on my eyebrows. A lot of halogens should hit me, so much light I was experiencing. Power was swirling around me. I felt very safe. With that in mind, this power can be made available to your hake by crossing several layers.
It was an honor for my instrument, my Guru, my devotion, my faith. The other comrades who came with us fell asleep in the company of Shakti. When I opened my eyes after completing the sadhana, I saw a long maharaja standing. I saluted and got up, and Maharaj asked me to sit at Havana. The Brahmin who came with me and I started Laghurudra together. I also completed it with a concentrated mind and offered the coconut of complete sacrifice.
After completing all the rituals, Maharaj took me close and said, you have become a father from today! But I didn't need any degree. I was thrilled in my heart. I was relieved to be in the company of Shakti. I was feeling something like a flashlight after inserting a new battery into a flashlight. I am sharing this authentic experience with my disciples today.
Maharaj had tested me with the above tool. I was successful because of my faith in my Guru, my perseverance, perseverance, and patience. I have had the experience many times that even a novice seeker does not hesitate to take his exam. But such strong faith in our Natha is our savior.
Reader, you are a seeker. Such exams may or may not come or go in your life, so seekers should be ready for every review. In the end, Nath is with you, order!
No comments:
Post a Comment