अति तेथे माती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो.
⚉ मुंबईला राहणारे श्री नेरकर हे माझ्याकडे एका ओळखीने आले होते. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे जुने घर काही केल्या विकले जात नव्हते. तसेच त्यांना नवे घर विकत घ्यायचे होते. ते ही काम होत नव्हते. त्यांनी खूप प्रयत्न केले होते परंतु त्यांना यश कुठूनच मिळत नव्हते ते हताश व निराश झाले होते.
त्यांची समस्या नाथांकडे मांडल्यावर श्री नेरकर यांना कुलदेवीचा पाठिंबा नसल्याचे कळले. त्यावर मी त्यांना कुलदेवीचे हवन आपल्याला करावे लागेल असे सांगितले. मी आपल्याला कळवतो असे बोलून नेरकर तीन महिने गायब झाले. फोन नाही की, त्यांचा संदेश नाही. अचानक एका संध्याकाळी ते माझ्या घरी आले. हातात पैशाचे पाकीट होते ते म्हणाले, गुरुजी क्षमा करा. मी खूप मूर्खपणा केला आहे. इतरांच्या नादी लागून बरेच पैसे वाया घालवले आहेत, पण आता तुमच्याकडूनच मला मार्ग मिळावा यासाठी मी हे पैसे घेऊन आलो आहे. मला मार्ग द्या मी त्रस्त झालो आहे, मी त्यांची समजूत काढली व धीर देत आपण यातून काहीतरी मार्ग काढू. तुम्ही श्री गोरक्ष नाथांवर विश्वास ठेवा असे सांगितले.
ठरल्या दिवशी त्यांच्याकडे हवनकार्याला जाणार तोच त्यांचा सकाळी मला फोन आला व ते म्हणाले की, माझ्या बायकोला अचानक अडचण आली आहे, तेव्हा कृपया आपण दुसरा मुहूर्त शोधून मला सांगावे. ते फोनवर आपल्या नशिबाला दोष देत बसले होते. मात्र माझ्यापुढे पंचायत झाली कारण भाड्याची गाडी व याज्ञिकांना मी वेळ दिली होती, तरी सुद्धा या सर्वांची मी समजूत काढली व असे प्रसंग क्वचितच येतात कारण यजमानांची अजून शिक्षा भोगून झाली नाही असे आपण समजायचे. पुढची वेळ ठरवून सर्वांना त्याबद्दल सूचना दिली.
आम्ही सर्व नेरकर यांच्या घरी वेळेवर पोहोचलो सर्व मांडणीसहित हवनकार्य सुलभ पार पडले, मी नेरकरांना म्हटले आता यापुढे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा पाठिंबा आहे. त्यामुळे तुमची यापुढची कार्य यशस्वी पार पडतील यात मला शंका नाही. कृपया तुम्हीसुद्धा चांगल्याच विचारांची जोड ठेवा.
ज्या व्यक्तीच्या ओळखीने वरील कार्य झाले त्यांनी वेळोवेळी फोन करून सांगितले की, गुरुजी आज नेरकरांची जुनी जागा विकली गेली, आज नेरकरांनी नवीन जागा विकत घेतली, आज अमुख अमुक अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर येत होत्या, पण गेली दहा वर्ष श्री नेरकर यांचा मला फोन आला नाही आणि मी सुद्धा केला नाही. गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा प्रत्यय आम्हाला आला होता.
Photo by Nick Bondarev from Pexels |
नेरकर नंतर स्वघोषित वास्तुतज्ञ झाल्याचे कळले. चुकीच्या पायावर घर बांधता येत नाही. आणि तेच झाले त्यांचे बिनकामाच्या तोडग्यामुळे त्यांचे संबंधी अडचणीत तर आलेच पण नेरकरांना सुद्धा खूप त्रास झाला. असे एका रात्रीत बाबा झालेले माझ्या निदर्शनास खूप आहेत. भविष्यातही असे अनेक व्यक्ती- प्रवृत्ती भेटतील तरी सुद्धा आम्ही आमचे कार्य सुरूच ठेवणार....
--------------------------------------------------------------------
Redundancy
⚉ Mr. Nerkar, who lives in Mumbai, came to me with an acquaintance. Their problem was that their old house was not being sold. They also wanted to buy a new home. That was not the case. He had tried so hard, but he was frustrated and disappointed that he was not getting success from anywhere.
After presenting his problem to Nathan, Mr. Nerkar came to know that Kuldevi did not support him. I told them that we have to perform the Havan of Kuldevi. Nerkar disappeared for three months, saying I would let you know. No phone, no message. Suddenly one evening he came to my house. He had a wallet in his hand and said, Guruji, forgive me. I have done so much nonsense. I have wasted a lot of money by following the whims of others, but now I have brought this money so that I can find it away from you. Give me a way, I'm troubled, I understand them, and with patience, we will find a way out of it. You told me to trust Shri Goraksh Nath.
I got a call from him in the morning about going to his funeral on the appointed day, and he said, my wife has a sudden problem, so please find another moment and tell me. He was sitting on the phone, blaming his fate. However, there was a panchayat in front of me because I had given time to the rented car and the yajnas, but I understood all this, and such incidents rarely happen because we realized that the hosts have not yet been punished. He decided the next time and informed everyone about it.
We all reached Nerkar's house on time. The funeral procession went smoothly with all the arrangements. I told Nerkar that now you have the support of your family goddess. So I have no doubt that your next task will be successful. Please add good thoughts too.
The person who did the above work called from time to time and said that Guruji, today Nerkar's old land was sold, today Nerkar bought a new property, today I was hearing many such things, but for the last ten years, I have not received a call from Mr. Nerkar. And I didn't either. We had come to the realization of the need to die.
Nerkar later became a self-proclaimed architect. A house cannot be built on the wrong foundation. And that's what happened. Not only did their relationship get into trouble due to their useless settlement, but Nerkar also suffered a lot. I have seen many such fathers in one night. We will continue our work even if we meet many such people in the future...
No comments:
Post a Comment