Tuesday 21 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-36

संग तसा रंग

अनेकवेळा केवळ फोनवर चर्चा करणार्‍या सौ. आराधना पेठे मला भेटायला आमच्या ऑफिसमध्ये आल्या. त्यांच्या अनेक प्रश्नानंतर या स्वतःच्या मूळ मुद्यावर आल्या. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे पती एका हॉटेल व्यवसायात होते परंतु त्यांच्यावर अफरातफरीचा आरोप आला होता. त्यामुळे ते खूप त्रस्त व मानसिक चिंतेत होते.
तसेच त्यांना घराच्या कर्जफेडीसाठी बँकेने तकादा लावला होता. घर जप्तीपर्यंत मजल गेली होती. त्यामुळे सौ. आराधना पेठे खूपच बिथरल्या होत्या आणि ते स्वाभाविक होते. ते कर्नाटक सेमीचे रहिवासी असल्याने त्यांची मराठी भाषा थोडी  वेगळीच होती. त्यामुळे ती मला समजून घ्यायला उशीर होत होता परंतु त्यांची निकड मला कळली होती.

त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतल्यावर मी त्यांना 'नाथांकडून आदेश काय येत ते प्रथम पाहू या, मगच त्यावर उपचार करू' असे सांगितले. नाथांकडून काही पूजा व हवनाचे  आदेश आले. त्याप्रमाणे  सौ. आराधना  पेठे  यांना फोन करून सांगितले. त्यावर त्यांनी आम्ही तुम्हाला कळवू असे सांगितले.

दरम्यान बँकेने त्यांना शॉट नोटीस दिली व ताकीद दिली. पेठे कुटुंब घाबरले त्यांनी तात्काळ पूजा हवन करण्याचा निर्णय घेतला, तसा त्यांनी फोन करून आमच्याकडे वरील उपचार करण्याची मागणी केली. त्यानुसार पुढील उपाययोजना केल्या.

Photo by Jawm Ling from Pexels

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व सौ. आराधनाकडे हवनासाठी गेलो. त्यांच्या घरात मंगल प्रसंग असल्याची अनुभूती आली,  घरात शांतता व प्रसन्न वातावरण होते, स्वच्छता होती तसेच सर्व आनंदी होते जणू यांना  काही विवंचना नाहीतच असे वाटत होते, आमचेही  मन प्रसन्न झाले.

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व विधी पूर्ण केला, त्यानंतर पेठे  मंडळींनी प्रश्न विचारला "आमच्या समस्येचे निराकरण होईल ना? उद्या बँकेचा शेवटचा दिवस आहे " मी म्हटलं "नाथांवर विश्वास ठेवा ते नक्कीच मार्ग काढतील."

दोन दिवसांनी सौ. आराधना यांचा फोन आला की त्यांच्या पतीवरचा आळ गेला व बँकेने आम्हाला काही मुदत दिली. तसेच पुढील कर्जफेडीसाठी काही योजना सांगितल्या त्यामुळे आमच्यावरचे संकट गेले असून आम्ही सर्व आपले खूप आभारी आहोत.

मी म्हटलं "माझे नको नाथांचे आभार माना" त्यावर त्या म्हणाल्या, "परंतु गुरुजी आपल्या सहकार्याशिवाय ही हे शक्य नव्हते, मी आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही."

केवळ काही उपचारांवर सौ. पेठे कुटुंबाला आधार मिळाला होता. आम्हाला या घटनेमुळे खूपच आनंद झाला होता.
--------------------------------------------------------------------
With the same color

Many times Mrs. who only discusses on the phone. Aradhana Pethe came to our office to meet me. After many of their questions, this happened to its own original point. Her problem was that her husband was in the hotel business, but she was accused of fraud. So he was very distressed and mentally anxious.
He was also charged by the bank for repaying a home loan. The house was confiscated. Therefore, Mrs. Aradhana Pethe was very scattered, and it was natural. As he is a resident of Karnataka Semi, his Marathi language was a bit different. So it was too late for her to understand me, but I knew her urgency.

After getting all the information from him, I told him, 'Let's see what Nathan's order is, then we will treat it.' Nathan ordered some poojas and havans. Accordingly, Mrs. Aradhana told Pethe by phone. They said we would let you know.

Video by cottonbro from Pexels

Meanwhile, the bank gave them short notice and a warning. Frightened by the Pethe family, they immediately decided to perform Pooja Havan, so they called us and demanded the above treatment. Further measures were taken accordingly.

As planned, we all Mrs. Went to Aradhana for Havana. There was a feeling of Mars in their house, there were peace and serenity in the house, there was the cleanliness, and everyone was happy as if they didn't feel any discomfort, our mind was also happy.

We completed all the rituals as scheduled, then the congregations asked, "Will our problem be solved? Tomorrow is the last day of the bank." I said, "Trust, Nathan, they will find a way."

Two days later, Mrs. Aradhana got a call that her husband was upset, and the bank gave us some time. He also mentioned some plans for the next loan repayment so that the crisis is over, and we are all very grateful to you.

I said, "Thank you for not wanting me, Nathan." She said, "But Guruji, this would not have been possible without your help. I will never forget your gratitude.

Mrs. on only a few treatments. The Pethe family had received support. We were pleased about this incident.

No comments:

Post a Comment