अंधारात केले, पण उजेडात आले
कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच
⚉ एके दिवशी मुंबईहून पोतनीस नावाचे गृहस्थ आले. त्यांनी त्यांच्याकडील कामाचा संदर्भ मला समजावून सांगितला. त्यावर मी त्यांना एक विशिष्ट साधना करायला सांगितली. त्यावर त्यांनी होकार देत म्हटले, चालेल मी साधनेसाठी माझ्या भाचीला बसवतो. त्यावर मी त्यांना नकार दिला व म्हटले नाही चालणार.
त्यावर तोडगा म्हणून त्यावेळचे माझे स्नेही साधक श्री विजय यांनी आपल्याकडची एक केस मला देत म्हटले, महाराज त्या व्यक्तीचे काम होईल व पोतनिसाचे ही काम होईल. म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका आर्या नामक स्त्रीला पाचारण केले. तिचे व तिच्या पतीचे अजिबात पटत नव्हते. आर्याने माझ्याकडे येण्याअगोदर श्री विजय यांच्याकडे श्री सबनीस राहणार, नागपूर यांच्यासाठी भैरवी साधना केली होती.
परंतु तिचा तो एकंदरीत अंगलगटपणा पाहून, मी तिला घरचा रस्ता दाखविला. त्यानंतर माझ्याकडे ऑफिस कामाला असलेल्या संतोष नामक व्यक्तीने त्याच्या बहिणीला माझ्याकडे साधनेला आणले. परंतु तिचा ओढा माझ्याकडे घरकाम करण्याचा असल्याने ती साधीका होऊ शकली नाही.
त्यावेळी माझ्याकडे दोन वेगवेगळी ग्रहण लागलेला वीरेंद्र नामक मुलगा येत होता. त्याने या साधनेबद्दल नीट समजून घेतले व स्वतःच्या पत्नीनेही साधना करावी. म्हणून आग्रह धरला. त्यावर मी त्याला नकार देत म्हटले, मला गाढव रेटावं लागेल. ती एकाग्रतेत खूप कच्ची आहे. मला खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यावर तिथे उपस्थित असलेल्यांनी माझ्यावर दबाव आणला व मी त्यासाठी राजी झालो.
Photo by Antonio Dillard from Pexels |
आपली नोकरी सांभाळून ती बाई रोज साधना करीत असे. रोज तिला वेगवेगळे अनुभव येऊ लागले. शक्ती आपली करामत दाखवत होती. ती बाईही खुश होती. मला एके दिवशी तिने स्वतःचे एका परपुरुषाशी संबंध असल्याचे सांगितले. त्यावर मी तिला हे चुकीचे आहे, असे सांगितले. कृपया आपण माझ्या नवऱ्याला यातील काहीही सांगू नका. अशी विनवणी तिने माझ्याजवळ केली.
एके दिवशी तिला अत्यंत भिन्न भिन्न अनुभव येऊ लागले. आपण करीत असलेल्या साधनेवर तिचा विश्वास व श्रद्धा न राहिल्याने तिने आपला काढता पाय घेतला. नाथपंथावर अविश्वास दाखवित, अगणित आरोप केले. तिला सातत्याने वाटत होते कि, मी गुरुजींना सांगितलेले गुपित माझ्या नवऱ्याला सांगणार नाही ना.
परंतु तिच्या आरोपामुळे तिचे पितळ मला उघडे करावे लागले. परंतु नवऱ्याचा आपल्या बायकोवर असलेल्या अति विश्वासाने त्याचा घात केला होता. कारण ती साधनेनें ध्येयाच्या जवळ येऊन ठेपली होती, पण शेवटी विनाशकालीन विपरीत बुद्धी.
चांगले साधक किंवा साधिका मिळण्यासाठी भाग्य लागते व त्यातच मी कमी पडल्याने यांचे काम होऊ शकले नाही. आपल्या गुरूंवर श्रद्धा, विश्वास , प्रेम पाहिजे. तसेच जी साधना करतो त्यात चिकाटी, जिद्द हवी केवळ घोकंपट्टी ने काहीही साध्य होत नाही.
--------------------------------------------------------------------
Done in the dark, but came to light
⚉ One day a householder named Potnis came from Mumbai. He explained to me the context of his work. On that, I asked them to do a particular sadhana. He nodded and said, "I'll get my niece for the tool." I refused and said no.
As a solution to this, my friendly seeker of that time, Mr. Vijay, gave me a case and said, Maharaj, it will be the work of that person, and it will be the work of Potnisa. So he called a woman named Arya, whom he knew. She and her husband did not get along. Before Arya came to me, Shri Sabnis would stay with Shri Vijay, had done Bhairavi Sadhana for Nagpur.
But seeing her overall engagement, I showed her the way home. Then a man named Santosh, who was working for me in the office, brought his sister to me. But since she wanted me to do housework, she could not become a simpleton.
At that time, a boy named Virendra was coming to me with two different eclipses. He understood this sadhana very well, and his wife should also do the sadhana. So insisted. I refused and said, I have to ride a donkey. It is very raw in concentration. I have to work hard. Those present put pressure on me, and I agreed.
Photo by Ike Louie Natividad from Pexels |
Taking care of her job, she used to do sadhana every day. Every day she began to have different experiences. Shakti was showing her magic. She was happy too. One day she told me that she was having an affair with a stranger. I told her it was wrong. Please don't tell my husband any of this. She made such a request to me.
One day she began to have very different experiences. Lacking faith and confidence in the tool she was doing, she pulled out her leg. Disrespecting Nathpantha made many allegations. She always thought that I would not tell my husband the secret I had told Guruji.
But her accusation forced me to expose her brass. But the husband's overconfidence in his wife had hurt him. Because that tool had come close to the goal, but in the end, it was the opposite intellect of destruction.
It takes luck to get the right seeker or seeker, and I could not do it because I fell short in that. We need faith, trust, and love for our Guru. Also, in the sadhana that one does, one requires perseverance, perseverance, nothing can be achieved by mere ghokampatti.
No comments:
Post a Comment