Monday 13 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-29

सुवर्णकाळ

माझ्या गुरूंच्या सोबत मी अहमदनगर येथे देवराई गावी वृद्धेश्वर येथे दर्शनाला गेलो. अशी शिवपिंड मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिली नव्हती. गावकऱ्यांच्या आणि पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या शिवपिंडीवर दरवर्षी एक छोटी नवी शिवपिंड तयार होते. त्याचा आकार आणि रूप हे इतर शिवपिंडी पेक्षा वेगळे आहे. वाचकांना माझा आग्रह आहे ,आपण या स्थानावर एकदा तरी जरूर भेट द्यावी. 

वृद्धेश्वर शिवपिंडी

आमावस्येची रात्र, लाईट नाही, माझ्या डोक्यावर पाचशे ते हजार वटवाघुळ फिरत होती व मी माझ्या मुल मंत्राचा जप करीत होतो. माझ्या काही हाताच्या अंतरावरती असलेले पिंपळाचे झाड सळसळत होते. माझ्या उजव्या बाजूने कोणीतरी काठीला घुंगरू बांधलेले परंतु वयस्कर असे चालत येत होते. अंधारात काहीच दिसत नव्हते. फक्त अंदाजाचे वेध घेता येत होते. परंतु सोबत गुरु असल्यामुळे मला तशी भीती नव्हती. 

सकाळच्या साडे पाच वाजेपर्यंत मी साधना केली. (आज मितीस तेथे कोणालाही साधना करण्याची परवानगी नाही.) ज्या ठिकाणी नाथांनी पूर्ण ब्रम्हांड स्थायी शक्तींना धरून गावजेवण घातलं, आपली सर्व शस्त्र, अस्त्र जेथे सोडली व महायाग केला. जिथे साक्षात आदीनाथांनी (शिव) म्हातार देवाच्या स्वरूपात वास्तव्य करीत आहे अशा परमपूजनीय भूमीवर त्या स्थानावर माझ्या गुरूंच्या कृपेमुळे माझी साधना व्हावी ही माझ्यासाठी गौरवाची बाब होती.
Shri Vriddheshwar Temple

सकाळी मी व माझे गुरु, शिवपिंडीसमोर ध्यानाला बसलो. आमच्या सोबत एक लोखंडी ट्रंक होती. शिवमंदिरात पुजाऱ्यांची दहा वर्षाची मुलगी प्रसाद द्यायला बसली. लोखंडी ट्रंक ही गुरूंच्या बाजूला होती. ध्यान करीत असताना मी माझ्या शक्तीचा परीक्षणार्थ नाथांना आदेश केला आणि त्या शांत वातावरणात त्या लोखंडी ट्रंकेवर तीन वेळा ठण ठण... असा आवाज झाला. (तिथे माझ्या शक्तीचे आगमन झाले होते.)

ती लहान मुलगी व गुरु दोघेही त्या ट्रंकेकडे पाहू लागले. पण मला माझी खूण मिळाली होती. पण झालेला प्रकार पाहून माझे गुरु माझ्यावर काहीसे चिडले होते. यापुढे अशा स्थानावर स्वतःसाठी आदेश देत जाऊ नका. असे मला बजावून सांगितले.  मी ही त्यांचा मान राखत हो म्हटले.

आज माझ्या शिष्यांना जेव्हा तेथे घेऊन जातो. तेव्हा तो माझा अनुभव माझ्यासमोर उभा राहतो. परंतु शिवमंदिर व त्यांच्या आवारात साधना करण्याची कोणालाही परवानगी नाही. पण खेदाची बाब अशी की, स्थानावर मी माझ्या शिष्यांना साधनेला बसवू शकत नाही. रात्रीच्या वेळेस  तिकडच्या पुजाऱ्यांच्या नियमाप्रमाणे (रात्री साधनेस) वर्जित आहे. वृद्धेश्वराचे दर्शन घेऊन मी व माझे गुरु तेथे जवळच असलेल्या मायंबा या स्थानावरती पोहोचलो. साधारण दुपारचे बारा वाजले होते. 

अमावस्येला मायंबा म्हणजे मच्छिंद्रनाथाची समाधी येथे जत्रा भरते. गावातील सर्व मंडळी व दूरवरून येणारे सर्व लोक तेथे जमतात. इतक्या उंच स्थानावरती तो सुंदरसा पठार पाहून मी मोहित झालो. मनाला झरा फुटावा तसा अनुभव आला. माझ्या गुरूंनी राहण्याच्या व्यवस्थेसाठी तिकडच्या संस्थापक मंडळींना भेटायला सांगितले. 

श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाची समाधी

त्याप्रमाणे मी बाबांचा आदेश घेऊन निघालो, तर वाटेत येणाऱ्या समाध्या यांनी माझे लक्ष वेधले. त्यापैकी एक समाधी माझ्याशी चक्क बोलू लागली, "क्या कैसे हो ! आखिर तुम्हे यहा आना ही पडा !"  मी इकडे तिकडे पाहू लागलो तर आजूबाजूला कोणीच नव्हते. आता या समाधीशी बोलावं, की गुरूंच्या आदेशाचे पालन करावं. या द्विधा मनस्थितीत मी माझ्या गुरूंच्या आदेशाचे पालन केले. तेथे एक जुनी कोठडी आम्हाला राहण्यास मिळाली.  बर्फासारखे थंडगार लादि उन्हामध्ये आमचा आधार बनली.

समाधीचा प्रकार मी  गुरूंच्या  कानी टाकला.  ते म्हणाले, येथे सर्व चमत्कारिक आहे. रात्रीच्या साधनेमुळे मला झोप येत होती. तेव्हा गुरुनी मला सांगितले तुम्ही थोडे झोपा.  मी एक चक्कर मारून येतो. म्हणून त्या थंड लादीवर मी झोपलो. काही क्षणाने मी ज्या स्थितीत पहूडलो होतो.  त्या स्थितीत डोळे उघडून पाहिले असता माझ्या समोरच्या चौथऱ्यावर झोपलेले श्री ठाकूर महाराज मला रागाने पाहत होते. त्यांचे ते चॉकलेटी डोळे पाहून, मी चक्रावून गेलो होतो. माझी झोप क्षणात गायब झाली. मी उठून बसलो व माझ्या गुरूंचा शोध घेऊ लागलो. 

समाधी मंदिराला व पठाराला दोन तीन प्रदक्षिणा घालून देखील माझे गुरु मला सापडत नव्हते.  म्हणून मी माझ्या ठिकाणी आलो. इतक्यात माझे गुरु आले व म्हणाले झोप झाली का?  त्यावर मी घडलेला प्रकार सांगितला,  गुरु म्हणाले श्री ठाकूर तुमच्याकडे पाहत नसून त्यांच्यावर जी केलेली क्रिया आहे तिला तुमचा त्रास होतो . श्रीयुत ठाकूर आता जास्त काळ जगणार नाही. कारण त्यांचा अंत जवळ आला आहे. असे बाबानी मला सांगितले. 

नाथांचे आशीर्वाद घेऊन त्या सुंदर मनमोहक वातावरणाने आम्ही चालतच समोरच्या गडावर म्हणजे जेथे मढी आहे,  तेथे कानिफनाथांची समाधी आहे. तेथे दर्शनासाठी निघालो. मायंबाचा गड उतरून आम्ही खाली परतताना मध्ये एका कपारीत देवीचे मंदिर लागते, आज अनेक वर्ष या मंदिरातून सुगंधी धूप द्रव्य बाहेर पडत असतो. गडाच्या पायथ्याशी गोरक्षनाथांची गुफा आहे. काही अवधी चालल्यावर मढी मायंबा यांच्या मध्यभागी एका पवित्र ठिकाणी जिथे कानिफनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट झाली तिथे एक पणती तेवत ठेवलेली असते.

Shri Kanifnath Temple

हा प्रवास करताना माझ्यासोबत असलेल्या लोखंडी ट्रंकने माझे पाय सोलून मला रक्त बंबाळ केले होते, पायातली चप्पल सुद्धा निरोप घेण्याच्या तयारी होती. अशा परिस्तितीत मढीच्या मायंबाच्या दिशेने असणार्‍या पायर्‍यांवरुन आम्ही मढी गडावर प्रवेश केला. तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. प्रथम आम्ही हात पाय धुवून नाथांच्या समाधीचे, नंतर इतर देवस्थानांचे दर्शन घेतले.  त्या भारलेल्या स्थानावर अनेक जण पिंगा घालत होती.  नाचत होती , असंगत बोलत होती. खरंच हा प्रकार मायंबाच्या गडा प्रमाणे होता.

श्री चैतन्य कानिफनाथांची समाधी

परंतु त्यातील काही मला ढोंगी वाटले व त्या प्रकाराकडे मी दुर्लक्ष केले. रात्र होती गडावर काही मोजकेच लोक राहिले होते. अमावस्येच्या भररात्री अशा स्थानावर राहण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. मी एका ठिकाणी भिंतीला टेकून थोडी विश्रांती करायला गेलो. तर मला काही वेळ झोपच लागली. 

मी डोळे उघडले तर माझ्यासमोर एक विक्षिप्त तरुण उभा राहून हसत माझ्याकडे पाहत होता. मी त्याला विचारले काय काम आहे.  तोच त्यावर एखाद्याला झपाटल्यासारखं  हसत, असं काही नाही म्हणाला व माझ्या दिशेने जवळ येऊ लागला. इतक्यात माझे गुरु तिथे आले आणि त्यांनी त्याला मज्जाव केला.

मी बाबांना विचारले की, हा काय प्रकार आहे ? ते म्हणाले की तो तुमच्या शक्तीला आकर्षित झाला. वाईट शक्तींना नेहमी चांगल्या शक्तीचे कुतूहल हे असतेस. ती रात्र आम्ही नाथांच्या साक्षीने जागवत पार केली. ब्राह्मी मुहूर्तावर ढोल, नगारा, ताशांच्या गजरात नाथांची पूजा सुरू झाली. तो सारा प्रसंग कसा रोमांचकारी होता. आम्ही नाथांचा आदेश घेऊन तेथून घराचा रस्ता धरला.

हा सर्व प्रवास मी माझ्या गुरूंसोबत अल्प खर्चात पण यशस्वी स्वरूपात पार पडला. गुरूंसोबत अशा दैवी शक्तीने भारलेल्या ठिकाणी जाण्याचा मला खूपदा योग्य आला. मी माझ्या आयुष्यातील ह्या योगांना सुवर्णकाळ असे संबोधितो. 
--------------------------------------------------------------------
The golden moment

With my Guru, I went to Darshan at Vriddheshwar in Devrai village in Ahmednagar. I had never seen such a Shivpind in my vertical life. According to the villagers and priests, a small new Shivpind is built on that Shivpindi every year. Its shape and form are different from other Shivpindi. I urge readers to visit this place at least once.

On the night of the new moon, there was no light, five hundred to a thousand bats were circling over my head, and I was chanting my child mantra. The pimple tree was a few feet away from me. Someone on my right was walking with a stick tied up but an older man. Nothing was visible in the darkness. I was guessing. But being a Guru with me, I was not so afraid.

I did sadhana till half-past five in the morning. (Today no one is allowed to do sadhana there.) The place where Nathan held the whole universe containing the permanent forces, where he left all his weapons, weapons, and did Mahayag. It was a matter of pride for me to have my sadhana by the grace of my Guru at that place on the most revered land wherein reality Adinath (Shiva) is living in the form of Old God.

In the morning, my Guru and I sat in meditation in front of Shivpindis. We had an iron trunk with us. The ten-year-old daughter of the priest sat in the Shiva temple to offer prasad. The iron trunk was next to the Guru. While meditating, I ordered Nathan to test my strength, and in that quiet atmosphere, there was a thud three times on that iron trunk. (My strength had arrived there.)

The little girl and Jupiter both started looking at the trunk. But I had got my mark. But seeing what had happened, my Guru was a bit angry with me. Don't go for less than your full potential. He warned me. I said yes, out of respect for them.

When I take my disciples there today, then my experience stands before me. But no one is allowed to do sadhana in Shiva temple and its premises. But sadly, I can't put my disciples in the position. At night, according to the rules of the priests of Tikkad (night instrument) is forbidden. After taking darshan of Vriddheshwar, my Guru and I reached the nearby place of Mayamba. It was about noon.

Mayamba on the new moon is the fair at Machhindranath's Samadhi. All the congregations in the village and all the people from far away gather there. I was fascinated to see that beautiful plateau at such a high place. The mind felt like a spring. My Guru asked me to meet the founding congregations of Tikkad for accommodation.

So I took Baba's order and left, but Samadhya, on the way, caught my attention. One of the samadhis started talking to me, "How are you! After all, you have to come here!" As I looked around, there was no one approximately. Now let's talk about this Samadhi, or follow the Guru's order. In this dilemma, I obeyed the orders of my Guru. We got to live in an old closet there. The ice-cold floor became our base in the sun.

The type of Samadhi I put in the ears of the Guru. That said, it's all miraculous here. I was falling asleep because of the night device. Then the Guru told me to sleep a little. I feel dizzy. So I slept on that cold bed. For a moment, I was in the position I was in. When I opened my eyes in that position, Shri Thakur Maharaj, who was sleeping on the fourth floor in front of me, was looking at me angrily. Seeing those chocolate eyes of theirs, I was dizzy. My sleep disappeared in a moment. I sat up and started searching for my Guru.

I could not find my Guru even after walking around the Samadhi temple and the plateau for two or three days. So I came to my place. Just then, my Guru came and said, did you fall asleep? I told him what had happened. Guru said, "Shri Thakur is not looking at you, but the action taken against him is bothering you." Mr. Thakur will not live long now because their end is near. That is what Babani told me.

With the blessings of Nath, we walk in that beautiful and charming environment. On the front fort, where Madhi is, there is Kanifnath's Samadhi. We went there for darshan. On our way back down from Mayamba fort, we come across a temple of Goddess in Kapari. Today, fragrant incense comes out of this temple for many years. At the foot of the fort is the cave of Gorakshanatha. After a while, a lamp is kept in a sacred place in the middle of Madhi Mayamba, where Kanifnath and Machhindranath met.

The iron trunk that was with me during this journey had peeled off my legs and made me bleed; the slippers on my feet were also ready to say goodbye. In such a situation, we entered Madhi fort from the steps leading towards Madhi Mayamba. It was six o'clock in the evening. First, we washed our hands and feet and visited Nath's Samadhi, then other temples. Many people were putting ping on that loaded place. Was dancing, talking inconsistently. Indeed this type was like a fort of Mayamba.

But some of it I thought was hypocritical, and I ignored it. It was night, and only a few people stayed on the fort. It was my first time living in such a place on the night of the new moon. I leaned against a wall and went to rest. So I fell asleep for a while.

When I opened my eyes, a wacky young man was standing in front of me, smiling and looking at me. I asked him what work is. He laughed as if he was slapping someone on it, said nothing, and started approaching me. Just then, my Guru came there, and he forbade him.

Did I ask Baba what type is this? He said he was attracted to your power. The evil forces are always curious about the sound effects. We woke up that night with Nathan's witness. At the Brahmi moment, the worship of Nath started with the sound of drums, nagara, and Tasha. How thrilling that whole event was. We took Nathan's orders and headed home from there.

I went through all this journey with my Guru at a low cost but successfully. It was very appropriate for me to go with the Guru to such a place loaded with divine power. I call these yogas of my life The golden moment.

No comments:

Post a Comment