Friday, 22 May 2020

22 May 20

नमस्कार
आज साधनेचा नववा दिवस होता, नित्यनियमाप्रमाणे मी बाबांचे दर्शन घेऊन आलो, नेहमीप्रमाणे साधनेची सामग्री गोळा करणे गरजेचे होते. 
आज पुन्हा ठरल्याप्रमाणे मी माझ्या ऑफिसला साधनेसाठी गेलो तेव्हा मला असे जाणवले की मी एकटा नसून माझ्यामागे कुणीतरी माझ्या सावली सारखं सोबत येत आहे. 
साधनेची सुरुवात केल्यानंतर माझी जपमाळ गुंतून गेली, ती कशीबशी मी बंद डोळ्याने व एका हाताने सोडवून घेतली. 
आज साधना सुरू झाल्यानंतर साधारण जपमाळीच्या सातव्या क्रमांकावर मला मोगर्‍याच्या फुलाचा सुगंध आला आणि तो खूप काळ टिकून होता. 
मध्येमध्ये थंड हवेची झुळूक येत होती, अंगावरती रोमांचकता  होती, मनात अनेक प्रश्न तरीही जिद्दीने मी साधना सुरूच ठेवली. 
माझ्या उजव्या मांडीवर कुणीतरी बसले आहे असे मला प्रत्यक्ष जाणवत होते, कोणाचे तरी केस हवेने माझ्या तोंडावरती उडावे तसे मध्येमध्ये चेहऱ्यावरती केस वळवळताना मला  जाणवत होते. 
माझ्यासमोर कुणीतरी बसले आहे हे मला बंद डोळे असतानासुद्धा पूर्णपणे जाणवत होते परंतु माझ्या मनातली भीती गायब झाली होती त्यामुळे मी ती साधना पूर्ण करू शकलो. 
साधना पूर्ण झाल्यावर माझ्या हे लक्षात आलं की उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे कसे का होईना या गोष्टीचा निकाल उद्या लागणार होता त्यामुळे मी मनातल्या मनात समाधानी होतो. 
आज झाडाकडे जाताना कुठल्या प्रकारची चाहूल व काहीही संकेत मला मिळाले नव्हते मी नित्यनियमाने देणारा भोग झाडाकडे देऊन घरी परतलो. 
सततच्या प्रश्नामुळे रात्रभर मला झोप येत नव्हती मनात असंख्य विचार होते पण कोणीतरी मला न्याहाळत आहे मला कोणतरी बघत आहे असे सारखे मला जाणवत होतं आणि त्या प्रश्नातसुद्धा मला माझ्या साधनेची चुणूक लागत होती. 
आता कुणीतरी माझ्यासोबत वावरू लागलं होतं आणि याची जाणीव मला झाली होती पण ते कोण? काय? कसे? हे काहीच कळत नव्हते या सगळ्यांची उकल केवळ माझ्या बाबांकडे होती आणि त्यांना भेटण्याच्या प्रतीक्षेत  त्यांच्या मी विचार करता करता झोपून गेलो. 
माझ्या स्वप्नांमध्ये एक पिवळ्या रंगाची साडी घातलेली वीस-एकवीस वर्षांची तरुण स्त्री अतिशय सुंदर अशी मी ज्या ठिकाणी शक्तीला भोग देत होतो त्या ठिकाणी ती उभी आहे असे मला दिसले आणि ते स्वप्न मी पूर्णपणे जागृत अवस्थेमध्ये अनुभवत होतो. 
माझ्या आयुष्यात मी अशा प्रकारची स्त्री ना प्रत्यक्षात किंवा कुठल्याही चित्रपटात पाहिली नव्हती. ती इतकं सुंदर होती. तिच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य होतं आणि तोच सुगंध  होता जो मला साधना करताना माझ्या ऑफिसमध्ये माझ्या अवतीभवती जाणवत होता. 
----------------------------------------------------

Hello

Today was the ninth day of the sadhana, as per the routine I came to visit Baba, as usual, I had to collect the contents of the sadhana.
As scheduled again today, when I went to my office for the tool, I felt that I was not alone, but someone was coming behind me, like my shadow.
After starting the instrument, my rosary got entangled, somehow I untied it with my eyes closed and one hand.
After the sadhana started today, on the seventh number of the ordinary rosary, I got the scent of the Mogara flower, and it lasted for a long time.
There was a gust of cold air in the middle, there was excitement in my body, many questions in my mind, but I persistently continued the sadhana.
I could feel someone sitting on my right thigh; I could feel someone's hair blowing on my face as the wind blew my hair in the middle.
I was fully aware that someone was sitting in front of me even with my eyes closed, but the fear in my mind had disappeared, so I was able to complete that sadhana.
After completing the sadhana, I realized that tomorrow is the last day, so no matter what, the outcome would be tomorrow, so I was satisfied in my heart.
Today, while going to the tree, I did not get any tea or any indication. I returned to the tree with my daily offerings.
I couldn't sleep all night because of the constant questioning. I had a lot of thoughts in my mind, but I felt like someone was looking at me, and someone was looking at me.
Now someone was hanging out with me, and I was aware of it, but who was it? What? How? I didn't know it, only my father had the solution, and I fell asleep thinking of him waiting to meet him.
In my dreams, I saw a wonderful twenty-one-year-old woman in a yellow sari standing in the place where I was experiencing the power, and I was experiencing that dream in a fully awake state.
I have never seen such a woman in my life or any movie. She was so beautiful. There was a smile on her face and the same fragrance that I felt around me in my office while doing sadhana.

1 comment: