Saturday 23 May 2020

23-May-20

नमस्कार 
आज माझ्या सिद्दी साधनेचा शेवटचा दिवस होता म्हणून मी खूप खूष होतो बाबांच्या दर्शनासाठी मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो त्यांना नमस्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या पुढील आदेशासाठी थांबून राहिलो. 
त्यावर बाबा म्हणाले की तुमची सिद्धी साधना ही खूपच व्यवस्थित चाललेली आहे आणि चांगल्याप्रकारे तुम्ही साधना करत आहात. आपल्याला आज ही साधना पूर्ण झाल्यानंतर उद्या सकाळी नाशिकला जायचं आहे. 
नाशिकला आपल्याला या सिद्धी साधनेची पूर्णाहुती करायची आहे, त्यामुळे तुम्ही जाण्याची व्यवस्था करा या बाबांच्या आदेशावर माझा चेहरा प्रश्नांकित झाला आणि मी बाबांना म्हणालो... 
बाबा माझ्याकडे तर गाडी आणि गाडीमध्ये लागणारे पेट्रोल यासाठी पैसे नसून तिथे गेल्यानंतर जी काही सामग्री लागेल त्यासाठी जो काही खर्च येईल याबाबत माझ्याकडे कोणतेही आर्थिक व्यवस्था नाही.
त्यावर बाबांनी सांगितलं की तुम्ही कुठूनही व्यवस्था करा पण आपल्याला जाणे गरजेचे आहे, गेल्यानंतर आपल्याला योग्य तो मार्ग मिळेल तुम्ही निश्चिंत व्हा आणि प्रयत्न करा बाबांचा आदेश गोड मानून मी त्यांना नमस्कार करून तेथून निघालो. 
साधनेसाठी सामग्री गोळा करताना माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न पडू लागले की हा शेवटचा दिवस आहे परंतु जाण्यासाठी जो काही खर्च लागतोय किंवा ति जी काही विधी आहे या विधीसाठी मी पैसे कुठून आणायचे? कसे आणायचे?
शेवटी माझे एक मित्र आहेत डिसोजा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून गाडी आणली आणि मी माझ्या वडिलांकडून थोडेफार पैसे उसने घेऊन नाशिकला जाण्याची व्यवस्था करून ठेवली. 
आज माझ्या सिद्धी साधने चा शेवटचा दिवस होता म्हणून मी मी खूप उत्साहात होतो ठरल्याप्रमाणे रात्री मी माझ्या ऑफिसवर पोहोचलो तिथे गेल्यानंतर एक वेगळा सुगंध आधीपासूनच त्या वास्तूमध्ये दरवळत होता. 
साधनेला सुरुवात केल्यानंतर मला खूप छानशी सितारवादक वाजल्यासारखे नाद कानामध्ये घुमू लागले सर्व शरीरावर रोमांच होतं कोणीतरी किणकिण आवाजामध्ये गाणं गुणगुणावे तसे स्वर माझ्या कानावर पडत होते. 
सिद्धी साधनेची सातवी जपमाळ असावी आणि  मला पावलांची चाहूल लागली मी अंतर्मनाने त्या पावलांवर नीट लक्ष केंद्रित करुन त्या दिशेचा मागोवा घेतला तर ती दिशा माझ्या ऑफिसच्या मुख्य दाराजवळची होती. 
साधना पूर्ण झाल्यावर शेवटची जपमाळ आणि शेवटचा मेरुमणी या दोन्हींचा समन्वय साधून त्याक्षणी माझ्यासमोर एखादं मोठं बोचकं पडावं तसं काहीतरी पडलं आणि मोठ्याने आवाज आला, धपकन !
मी थोडाफार दचकलो मनामध्ये भीती होती की समोर काय आहे? काहीच कळेना पण ज्या वेळेस  मी माझे डोळे उघडले आणि समोर पाहिलं तेव्हा तिथे काहीही नव्हतं पूर्णपणे शांतता होती मी माझी संपूर्ण सामग्री गोळा केली एका पिशवीत ठेवून दिली आणि झाडाकडे शक्तीला भोग द्यायला निघालो. 
आज शक्तीला भोग देताना मला बाबांनी झाडाकडे मातीचा दिवा लावायला सांगितला होता तो लावण्यासाठी मी पूर्ण तयारी करून होतो झाडाकडे गेल्यानंतर मी प्रथम शक्तीला भोग दिला आणि तेथे दिवा लावण्यासाठी सुरुवात केली. 
त्या झाडाकडे दिवा लावल्यानंतर त्या प्रकाशामध्ये त्या अंधकार वातावरणात तो चिमुकला दिवा खूप काही प्रकाश आणि खूप काही सांगून गेला मी नमस्कार करत झाडाकडे उभा राहिलो. 
इतक्यात मला हे जाणवलं की माझ्यामागे अंदाजे साडेसहा फूट उंच अशी भारदस्त शक्ती उभी आहे आणि जणू काय मी तिच्या बाहुपाशातच आहे, असं मला पूर्णपणे जाणवलं होते. 
पिवळ्या साडीमध्ये दिसलेली ती सुंदर नारी याचा अर्थ समजून मी माझ्याबरोबर पिवळ्या रंगाची आणलेली फुलं झाडावरती उधळली आणि त्या भयग्रस्त वातावरणात सुद्धा मी माझा प्रश्‍न, माझे अभिवादन त्या शक्तीला आवर्जून सांगितले आणि विनंती केली की या संकटातून मला मुक्ती दे !
घरी परतताना मला माझे शरीर पूर्णपणे जड झाल्याचे जाणवलं, एकेक पाऊल टाकताना खूप  वजन शरीरावरती असावं या पद्धतीने मी चालत होतो तरीसुद्धा मी माझं घर गाठलं आणि घरी आलो. 
घरी माझी आई- वडील व माझी पत्नी माझी वाट बघत होते की, आज माझी साधना पूर्ण होणार होती त्यामुळे तेही त्याबाबत उत्सुक होते. 
केवळ एक दोन तासाच्या फरकाने मला सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजेच साधनेच्या अकराव्या दिवशी नाशिकला निघायचे  होते आणि सकाळी चार वाजता माझे गुरु हे माझ्या घरापाशी येऊन आम्ही तिथून नाशिकला जाण्यास निघणार होतो. 

----------------------------------------------------------------------------------------

Hello

Today was the last day of my Siddhi Sadhana so I was very happy. When I went to Baba's house to visit him, I greeted him and blessed him and waited for his next order.
On that Baba said that your Siddhi Sadhana is going very well and you are doing the sadhana well. We want to go to Nashik tomorrow morning after completing this sadhana today.
Nashik wants you to complete this achievement, so you arrange to go. My face was questioned on Baba's order and I told Baba ...
Baba, I don't have the money for the car and the petrol in the car, but I don't have any financial arrangements for whatever it will cost to get there.
Baba told him that you can make arrangements from anywhere but you have to go, after you go you will find the right way. You can rest assured and try. I accepted Baba's order as sweet and left.
While collecting materials for the tool, many questions started to come to my mind that this is the last day, but whatever it costs to go or whatever the ritual is, where do I get the money for this ritual? How to bring?
Finally, a friend of mine, D'Souza, brought a car from his relatives and I borrowed some money from my father and arranged to go to Nashik.
Today was the last day of my accomplishments so I was very excited as I arrived at my office at night as planned. After going there, a different scent was already wafting through the building.
After I started playing the instrument, I started to hear the sound of a very good sitar player ringing in my ears. The whole body was thrilled.
It should be the seventh rosary of Siddhi Sadhana and I felt the footsteps. I focused on those steps intently and followed that direction, but that direction was near the main door of my office.
At the end of the sadhana, the last rosary and the last merumani were coordinated and at that moment, something like a big bochak fell in front of me and a loud noise came, Dham!
I hesitated a bit. I was scared. What is in front of me? Nothing but by the time I opened my eyes and looked in front there was nothing there was complete silence I collected all my stuff and put it in a bag and went to the tree to enjoy the power.
Today, while sacrificing Shakti, Baba had asked me to light a clay lamp for the tree. I was fully prepared to light it. After going to the tree, I first sacrificed Shakti and started lighting the lamp there.
After lighting the lamp in that tree, in that light, in that dark atmosphere, that flickering lamp said a lot of light and a lot. I greeted and stood by the tree.
All of a sudden, I realized that there was a huge force behind me, about six and a half feet high, and I felt as if I was in her arms.
Understanding the meaning of that beautiful woman in a yellow sari, I scatter the yellow flowers that I had brought with me on the tree and even in that terrifying atmosphere, I conveyed my question, my greetings to that power and begged me to save me from this crisis!
On my way home, I felt that my body was completely heavy, even though I was walking in such a way that I had to carry a lot of weight on my body with each step, I reached my house and came home.
At home my parents and my wife were waiting for me, my sadhana was going to be completed today so they were also curious about it.
With only an hour or two difference, I had to leave for Nashik on the second day in the morning, on the eleventh day of Sadhana, and at four in the morning, my Guru would come to my house and we would leave for Nashik.

No comments:

Post a Comment