Friday 15 May 2020

15-May-20

नमस्कार
सकाळी लवकर उठलो आणि घरातल्या सदस्यांना मी रात्रीचा घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यावर आश्चर्यकारक बाब माझ्यासमोर आली ती अशी की, मी रात्री बारा वाजता ज्या वेळेला साधनेला सुरुवात केली व ओम नमः शिवाय चा जप सुरू केला त्यावेळेस अगदी त्या वेळेस माझ्या घराच्या दारासमोर मोठ्या भारदस्त आवाजात कोणीतरी  ओम नमः शिवाय असा जप करतो आहे असे माझ्या कुटुंबांना ऐकायला आले त्यावर घरातल्या काही सदस्यांनी दरवाजा उघडून बघण्याचे धाडस करण्याचे ठरविले परंतु माझ्या आईने त्या गोष्टीला नकार दिला व हे जे मी साधना करतो आहे त्याबाबत ही घटना घडत असावी असे माझ्या आईनी माझ्या सर्व कुटुंब सदस्याना पटवून दिले.
ठरल्याप्रमाणे मी बाबांच्या घरचा रस्ता धरला व त्यांच्या घरी गेलो झालेली सर्व हकीकत मी त्यांच्या लक्षात आणून दिली त्यावर त्यांनी केवळ स्मित करून मला आहे तशी साधना पुढे सुरु ठेवण्याचे आदेश दिला, मी नमस्कार करून परत माझ्या दुसऱ्या दिवसाच्या साधनेला सुरुवात करण्यासाठी निघालो.
लागणारे सर्व साहित्य माझ्याकडे होतेच केवळ यक्षणीसाठी लागणारा भोग आहे तो मी पुन्हा गोळा केला व दुसऱ्या दिवशी परत साधनेला माझ्या ऑफिसच्या ठिकाणी गेलो.
आज मनामध्ये थोडा वेगळा विश्वास, आनंद होता एक नवा श्वास मी रोखून होतो आणि वातावरणामध्ये एक वेगळाच असा सुगंध पसरला होता मी माझ्यासमोर धूप बत्ती करून साधनेला सुरुवात केली. आजच्या साधनेमध्ये मला माझ्या भ्रूमध्यावर खूप छान असा किलबिल सफेद रंगाचा प्रकाश जाणवत होता.
माझ्या अंगावरती एखादी बारीक मुंगी फिरावी त्याप्रमाणे काहीतरी वळवळत होते, कळत नव्हतं मी त्या गोष्टीने खूपच संतप्त झालो होतो, मला त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता कारण माझं लक्ष विचलित होण्यासाठी ही गोष्ट कारणीभूत ठरू शकली असती. परंतु मी मन एकाग्र करून माझ्या मंत्रावर लक्ष केंद्रित केले आणि तो जप पूर्णपणे पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. 
नेहमीप्रमाणे आजही माझे शरीर सुन्न-बधीर झाले व कानाकडे अगदी एखाद्याने नखाने टिकटिक करावे असा बारीकसा आवाज मला सातत्याने जाणवत होता.
साधना झाल्यावर मी सिद्धीचा भोग घेऊन झाडाकडे निघालो तर रस्त्यात बरेच कुत्रे जमा झाले होते (इतके कुठुन जमा झाले हा प्रश्न होताच) जे मला पाहून खूप भुंकायला लागले. जसजसा मी झाडाकडे जात गेलो तसे ते कुत्रे माझ्याकडे एक नजरेने पाहू लागले मला त्या कुत्र्यांची खूपच भीती वाटत होती जर यां सर्वांनीच माझ्यावरती हल्ला केला तर खूप खूप समस्या होईल.
परंतु ते सर्व कुत्रे आहे त्याच जागी जमिनीवरची स्थिर बसले व मला न्याहाळू लागले मला काही समजण्याच्या आतच मी तेथून लवकर निघण्याचा निर्णय घेतला व आपला रस्ता गाठला, घरी आल्यानंतर माझ्या घरातील आमची लाडकी स्वीटी नावाची कुत्रीसुद्धा मला काहीसे कण्हल्यासारखे ओरडत न्याहाळत ती माझ्यात काहीतरी शोधत होती. रात्रभर मला झोपच येईना शेवटी एकदाची झोप लागली, पुन्हा उद्या सकाळी मला गुरूंच्या घरी बाबांकडे जायचे होते. त्यांच्याकडे जाण्याची उत्सुकता मला खूप असायची... 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Hello

I woke up early in the morning and told my family all about what had happened that night. I started the sadhana at twelve o'clock at night and started chanting Om Namah Shivaya At that very moment, in front of the door of my house, someone is chanting Om Namah Shivaya in a loud voice. When my family heard this, some members of the family decided to open the door But my mother denied that, and my mother convinced all my family members that this must be happening because of what I was doing.
As planned, I took the road to Baba's house and reminded him of all the facts that I had gone to his house. He just smiled and ordered me to continue the sadhana as I have. I greeted him and went back to start my next day's sadhana.
I had all the materials I needed, only for the moment. I collected yakshini bhog again and went back to my office the next day.
Today I had a little different faith in my mind, happiness, a new breath I was holding and a different scent was spreading in the atmosphere. I started the instrument by lighting an incense lamp in front of me. In today’s instrument I could feel a very nice chirping white light on my eyebrows.
Something was spinning like a tiny ant hovering over my body, I didn't know I was so angry about it, I was so annoyed by it because it could have distracted me. But I concentrated my mind on my mantra and sincerely tried to carry it out completely.
Even today, as usual, my body became numb and I could feel the faint sound of someone tickling my ear.
After the sadhana, I went to the tree with a sense of accomplishment. There were a lot of dogs on the road (the question was where did they come from?) Which made me bark a lot. As I was walking towards the tree, the dogs started looking at me with one glance. I was very scared of those dogs. If all of them attacked me, there would be a lot of problems.
But they are all dogs. They sat still on the ground and stared at me. As soon as I understood something, I decided to get out of there early and reach my way. When I got home, our pet dog named Sweetie was also looking at me screaming like she was looking for something in me. I couldn't sleep all night and finally fell asleep once again, again tomorrow morning I wanted to go to Baba's house. I used to be very eager to go to them ...

No comments:

Post a Comment