Monday, 11 May 2020

11/05/2020-2


प्रिय जनहो मागील ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझ्या बालपणात घेऊन गेलो होतो. त्यावेळी संमोहनाच्या प्रेमात मी पडलो होतो. मुंबईच्या एका महाराजा कडून मी पोस्टाने संमोहनाचे यंत्र मागवले. ते जेव्हा पोस्टाने माझ्याकडे आले त्यावेळी माझ्या छोट्याश्या हाताच्या ओंजळीत तो आनंद भरभरून वाहत होता. मी एकांतात जाऊन ते पाकीट उघडून त्या यंत्राकडे खूप वेळ बघतच राहिलो. 
त्यावर कुठेही ते यंत्र कसे वापरावे याचा उल्लेख न्हवता. तरी हि मी ते माझ्या पॅंटीच्या चोर कप्प्यात लपवून ठेवले. व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर याचा काही परिणाम होतो का ते पाहू लागलो. देवा कोणीतरी मला वश होऊ दे अशी माझी हाक देवाने त्यावेळी ऐकली नाही. पण मी जिद्दी आणि चिकाटी होतो, मला याचा कोणत्याही परीस्तीतीत निकाल लावायचा होता. त्यानंतर मी मुंबई वरून मोहिनी विद्या हे पुस्तक घेऊन आलो, त्या पुस्तकावरचे लाल डोळे कदाचित प्रकाशकाने सुप्रसिद्ध कलाकार श्री अमिताभ बच्चन याचे छापले होते. 
वाचून वाचून मी त्या पुस्तकाचा नुसता किस काढला होता. त्यासोबत मी  शाळेचा अभ्यास प्रामाणिकपणे करत होतो. 
शेवटी कृती करायचे ठरवून मी त्या पुस्तकातल्या लेखकाच्या ज्ञानाचे अनुकरण करू लागलो. त्यातले अनुभव मी पुढच्या वेळी प्रकाशित करिन...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Dear people, I took you to my childhood in the previous blog. At the time, I was in love with hypnosis. I ordered a hypnotic device by post from a Maharaja of Mumbai. When he came to me by post, he was full of joy in the palm of my little hand. I went into solitude, opened my wallet, and stared at the machine for a long time.
Nowhere did it mention how to use the device. However, I hid it in the thief's pocket of my panties. And we started to see if it had any effect on the people coming and going. At that time God did not hear my cry for help. But I was stubborn and stubborn, I wanted to get rid of it under any circumstances. Then I brought the book Mohini Vidya from Mumbai, the red eyes on the book were probably printed by the publisher, the well-known artist Mr. Amitabh Bachchan.
After reading it, I just Fourth the book. In addition, I was honestly studying school.
Eventually deciding to take action, I began to imitate the knowledge of the author of that book. I will publish the experience next time ...












No comments:

Post a Comment