Wednesday, 27 May 2020

27-May-20

नमस्कार,

हवनाला जायचं असं ठरवून मी थोडाशा संभ्रमातच माझ्या गुरु-बाबांबरोबर बाजूच्या गावाला हवन करायला निघालो मी माझे गुरू आणि आमच्यापैकी थोडासा जाणकार अशी एक व्यक्ती की, ज्याला हवनाबद्दल माहिती होतं त्याला आम्ही सोबत घेऊन आमची मोहीम त्या हवन करण्याच्या ठिकाणी निघाली. 

आमच्या सोबत दुसरीची व्यक्ती होती ती थोडी लालची, कपटी, स्वार्थी आणि मतलबी या स्वरूपाची होती त्याला मी जी काही साधना केली होती ती बहुधा रुचली नव्हती. म्हणून त्या व्यक्तीने माझ्या आणि बाबांच्या मध्ये बरेचसे गैरसमज निर्माण करण्यास सुरुवात केली होती आणि त्याची चाहूल मला थोडीफार लागली होती. तरीसुद्धा आम्ही तिघे त्या यजमानांच्या घरी हवन करण्यास गेलो तिथे गेल्यावर मला बाबांनी बऱ्याच गोष्टींची ओळख करून दिली आणि हवन मांडणी कशी करायची हे शिकवलं. 

हवनाची पूर्ण तयारी झाली होती आणि इतक्यात मला बाबांनी माझ्या हातामध्ये एक कोहळा नावाचं फळ दिलं आणि सांगितलं की या घराला नजर लागली असल्यामुळे तुम्ही हे फळ घरातून फिरून घ्या आणि ते घराच्या उंबरठ्यावर कापुन टाका. 

बाबांचा आदेश म्हणून मी हातात ते फळ घेण्याअगोदर माझ्या गुरूंना नमस्कार केला आणि देवाचं स्मरण करून त्या विधीला सुरुवात केली. ही प्रक्रिया करताना एका घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यात मला एका म्हाताऱ्या माणसाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी फार कटाक्षाने त्या आवाजाच्या रोखीने पाहिले असता मला हे समजलं की त्या ठिकाणी त्या कोपर्‍यात एक म्हातारी व्यक्ती स्वतःला खूप आवळून झोपली होती. 

मी त्या आकृतीकडे नीट निरखून पाहिले असता माझ्या हे लक्षात आले की ती व्यक्ती वयोवृद्ध आणि खूप घाबरलेली होती. मी तिथेच थांबलेला पाहून गुरूंनी मला विचारले काय झाले? त्यावर त्यांना मी असे सांगितले की, बाबा इथे कुणीतरी आहे आणि ते कण्हतेय, मी काय करू?

तुम्ही त्याला त्या  फळात उतरायला सांगा आणि त्याला माझ्याकडे घेऊन या असे बाबांनी सांगितले, हे ऐकल्यावर मला अल्लाउद्दीन जादुई चिराग च्या गोष्टी आठवू  लागल्या आणि मी मनातच म्हटलं की हे कसं शक्य आहे? परंतु बाबा म्हणाले आहेत तर करून पाहूया!

बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या शक्तीला हुकूम करून मी त्याला त्या फळामध्ये येण्यास सांगितले तर मला असे दिसले की ती समोरची आकृती नाहीशी झाली होती. तेव्हा ते फळ घराच्या दाराच्या उंबरठ्यावर न कापता मला ते बाबांनी हवामानात पूर्णपणे टाकायला सांगितले.

हवन कार्य पूर्ण झाल्यानंतर यजमानांनी मला माझ्या गुरूंना आणि त्या तिसर्‍या व्यक्तीला वस्त्र-नारळ-दक्षिणा दिली. ते मी त्या तिसऱ्या माणसाच्या हातात देऊन परस्पर माझ्या घरी नेण्यास सांगितले आणि मी बँकेच्या कामासाठी बँकेत निघून गेलो. बँकेत गेल्यानंतर बँकेच्या माणसांनी नाक मुरडत मला कर्जाची पुनर्बांधणी करून देण्याची मान्यता दर्शवली. 

हा सोहळा पार पडल्यानंतर जेव्हा मी माझ्या घरी गेलो तेव्हा मला माझ्या आईने सर्व हकीकत विचारून घेतली आणि सांगितले की त्या एका व्यक्तीने काहीतरी पिशवी आणून दिलेली आहे. मी ती पिशवी उघडल्यावर मला त्यात एक सफेद वस्त्र, शंभर रुपयाची एक नोट आणि एक मधून उभा चिरलेला नारळ दिसला. 

मी ते वस्त्र-पैसे बाजूला ठेवून त्या नारळाला न्याहाळू लागलो मला त्या नारळाबद्दल इतकी उत्सुकता लागली की, हे कसे काय घडू शकते? हा एक चमत्कार असून अध्यात्म-विज्ञानाकडून याचे उत्तर काय असू शकते याची मला लालसा लागली. 

कारण तो नारळ उभ्या दिशेने दोन भागात पूर्णपणे विभागला होता आतील गाभा-पाणी मला चक्क  दिसत होते या नारळाच्या फटीत माझं हाताचे बोट जावं इतकी मोठे नारळाचे विभाजन झाले होते आणि तो खूप जड झाला होता. नारळ उलटा केला तरीसुद्धा त्यातून एकही थेंब सुध्दा पाणी खाली पडत नव्हतं. ही अचंबित गोष्ट मी आणि माझ्या कुटुंबाने प्रत्यक्ष पाहिली आणि मी हे सगळे प्रकार बाबांना सांगण्यासाठी लगेचच निघालो.... 

--------------------------------------------------------------------------

Hello,

Deciding to go to Havana, I went to the next village Havan with my Guru-Baba in a little confusion.

The other person with us was a bit greedy, insidious, selfish, and selfish. So that person had started to create a lot of misunderstandings between me and Baba and I was a little tired of him. Even so, when the three of us went to the host's house to perform the havan, Baba introduced me to many things and taught me how to arrange the havan.

Havana was fully prepared and just then Baba gave me a pumpkin fruit in my hand and told me to take this fruit out of the house and cut it on the threshold of the house.

As per Baba's order, I greeted my Guru before taking the fruit in my hand and started the ritual by remembering God. In the process, I heard an old man crying in a certain corner of the house. As I stared at the sound, I realized that an old man was lying in the corner.

As I looked closely at the figure, I noticed that the person was old and very scared. Seeing me standing there, Guru asked me what happened? I told them, "Dad, there's someone here, and they're saying, 'What can I do?'

Baba told me to tell him to come down to that fruit and bring him to me. When I heard this, I started remembering the story of Allauddin the magical lamp and I said to myself, how is this possible? But if Baba has said, let's do it!

By commanding that power as Baba said, I told him to come to that fruit, but I saw that the figure in front of him had disappeared. So without cutting the fruit on the doorstep of the house, Baba told me to throw it in the air completely.

After the Havan work was completed, the hosts gave me Vastra-Naral-Dakshina to my Guru and that third person. I handed it over to the third man and asked him to take me to my house and I went to the bank for bank work. After going to the bank, the bank men nodded and agreed to let me restructure the loan.

When I went to my house after the ceremony, my mother asked me all the facts and said that one of them had brought a bag of something. When I opened the bag, I saw a white robe, a hundred rupee note, and a chopped coconut.

I put the clothes and money aside and looked at the coconut. I was so curious about the coconut that how could this happen? It is a miracle and I longed for the answer from spiritual science.

Because the coconut was completely divided into two parts in the vertical direction, I could see the inner core-water. The coconut was split in such a way that my finger could go in the crack of the coconut and it became very heavy. Even when the coconut was inverted, not a single drop of water fell from it. My family and I saw this amazing thing and I immediately went to tell all this to Baba...

No comments:

Post a Comment