Wednesday, 20 May 2020

20 May 20

नमस्कार 
आज खरोखरच मी खूप खुश होतो कारण माझ्या साधनेचा शेवटचा दिवस होता. बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी 7 दिवसाची साधना पूर्ण करणार होतो, त्यामुळे एक वेगळंच चैतन्य मनात भरलं होतं, आणखीन दुसरी गोष्ट की मला लवकरात लवकर कर्ज मुक्ती मिळणार होती त्यामुळे मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. 
नित्यनियमाप्रमाणे आजही मी बाबांचे दर्शन घ्यायला त्यांच्या घरी गेलो पण बाबा आले नव्हते ते अजून घरी पोहोचले नव्हते ते संध्याकाळपर्यंत पोहोचणार होते पण मला पुन्हा त्यांच्या घरी येणं शक्य नव्हतं कारण मला संध्याकाळी साधनेला बसायचं होतं. 
तरीसुद्धा मी त्यांच्या घराच्या उंबरठ्याला नमस्कार केला आणि माझ्या साधनेच्या माझ्या सिद्धीच्या शेवटचं चरणाच्या दिवसाला साधना करण्यासाठी मी माझ्या साधनेची सामग्री गोळा करण्यासाठी निघालो. 
अगदी ठरल्याप्रमाणे आज मी माझ्या ऑफिसला पोहोचलो अगदी शांतता होती कोणीतीही कसलीही काही मला चाहूल लागत नव्हती. 
अगदी बाराच्या ठोक्याला मी साधनेला सुरुवात केली जशी साधना सुरू झाली तशी माझी जपमाळ जपताना ती खूप जड झाली व ती पुढे चालेच ना!
मी म्हटलं नक्की काय झालंय? माझ्या या सगळ्या जपमाळा कधी पूर्ण होणार? मी अगदी  ताकदिने ती जपमाळ ओढायला लागलो. 
माझ्या लक्षात आलं की कोणी तरी माझी जपमाळ पकडून ठेवलेली आहे आणि ती पूर्ण होऊ नये अशी त्या शक्तीची इच्छा आहे. 
परंतु पुन्हा एकदा माझी जिद्द कामी आली आणि मी साधना करण्याच्या पक्या इराद्याने जपमाळ ओढत ओढत पूर्ण केली. 
त्यावेळेला मला हे असं जाणवलं की, मी खूपशा खोल अंधाऱ्या दरीत चाललेला आहे आणि ज्याला अंत नाही असे ठिकाण होतं. हा अनुभव मला आधी आला होता आणि तो आजही आला पण या अंधारात जाताना मी माझ्या स्वतःच्या शरीराला स्वतःच्या मनाला एखाद्या विशिष्ट पातळीवर रोखू शकलो. 
आणि अचानकपणे माझे शरीर हलके झाले व मी आकाशाच्या दिशेने झेप घ्यायला सुरुवात केली. शरीर खूप हलकं झाल्यासारखं पिसासारखं मला वाटत होतं. 
शरीर जसं काय माझे चंद्रावर गेले असेल, मी हवेत तरंगत होतो आणि मी उडण्याच्या तयारीत होतो हा अनुभव मला आजचा नवीन होता आणि खुपच सुखद होता. 
आज माझे ध्यान अतिशय सुंदर पद्धतीने लागले होते, मला बाहेरच्या वातावरणाची कुठल्याही प्रकारची चाहूल बिलकुल जाणवत नव्हती. क्षणभर मी कुठे आहे हेच कळत नव्हते. 
परंतु आज साधना करायला थोडा उशीर झाला होता, जपमाळ ओढून ओढून जपल्यामुळे माझा हात हि दुखत होता तरी माझी सातव्या दिवसाची साधना मी पूर्ण केली हा आनंद मनात होता. 
शेवटी साधना पूर्ण केल्यावर मी पुन्हा एकदा झाडाच्या दिशेने निघालो हातामध्ये शक्तीचा भोग होता आणि माझ्या मागे कमीत कमी वीस-पंचवीस कुत्रे झुंबड करत येत होते. 
परंतु आता मला त्या कुत्र्याची किंवा इतर प्राण्यांची कसलीही भीती मनात राहिली नव्हती, त्यामुळे मी थेट झाड गाठले आणि तिथे माझ्या शक्तीचा भोग देऊन तिला विनम्र अभिवादन केले. 
काही कळत-नकळतपणे जर काय माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा कर माझ्यावर आलेलं संकट दूर कर असे मी त्या शक्तीकडे विनम्रपणे आवाहन केलं. 
आणि माझ्या घराच्या दिशेने मी कूच केली घरी आलो, निवांतपणे शांत झोपलो सुप्रभात होण्याच्या प्रतीक्षेत.... 

-----------------------------------------------------------
Hello

Today I was really happy because it was the last day of my instrument. As Baba said, I was going to complete 7 days of sadhana, so I had a different consciousness, another thing was that I was going to get rid of debt as soon as possible, so I was looking forward to this day.
As usual, I went to Baba's house today but Baba had not come. He had not reached home yet. He was going to reach his house in the evening but I could not come to his house again because I had to sit in the evening.
Nevertheless, I saluted the threshold of their house and set out to collect the contents of my instrument to perform sadhana on the last day of my accomplishment of my instrument.
I reached my office today as planned. It was very quiet. No one was bothering me.
At the stroke of twelve, I started the sadhana. As soon as the sadhana started, while holding my rosary, it became very heavy and it didn't move!
I said what exactly happened? When will all my rosary be completed? I started pulling the rosary with all my might.
I realized that someone was holding my rosary and that the power wanted it not to be fulfilled.
But once again my perseverance paid off and I finished pulling the rosary with the firm intention of doing sadhana.
At that time, I realized that I was walking in a very deep dark valley and there was a place that had no end. This experience had come to me before and it still comes today but going into this darkness I was able to restrain my own body and my own mind to a certain level.
And suddenly my body became lighter and I started leaping towards the sky. I felt like my body was getting very light.
As if the body had gone to my moon, I was floating in the air and I was getting ready to fly, this experience was new to me today and very pleasant.
Today my meditation was very beautiful, I did not feel any kind of taste of the outside environment at all. For a moment I had no idea where I was.
But today it was a little late to do the sadhana, my hand was hurting due to pulling the rosary, but I was happy that I completed my seventh day of sadhana.
At the end of the sadhana, I once again walked towards the tree. I had strength in my hands and at least twenty-five dogs were barking behind me.
But now I had no fear of that dog or any other animal, so I reached the tree directly and greeted her politely by sacrificing my strength there.
I humbly appealed to that power to forgive me if I had made a mistake without knowing it.
And I marched towards my house, came home, slept peacefully, waiting for good morning ....

No comments:

Post a Comment