Thursday 21 May 2020

21 May 20

नमस्कार 
बाबांनी सांगितल्याप्रमाणे सात दिवसाची साधना पूर्ण झाली म्हणून मी खूप आनंदी होतो आणि त्या आनंदाच्या भरात मी माझ्या बाबांचं घर गाठले... 
त्यांच्या घरी गेल्यावर पाहिले असता  बाबा एका आसनावर शांतचित्ताने बसलेले मला दिसले, माझ्या जीवात जीव आला कारण दोन दिवस मी त्यांना पाहिलं नव्हतं. 
जणू ते माझीच वाट बघत होते. मी गेल्यानंतर ते म्हणाले, या या मी तुमचीच वाट बघत होतो. 
काय? कशी काय झाली साधना? सगळं व्यवस्थित पूर्ण झालं का? असे  प्रश्न त्यानी मला केले. 
मी झालेले दोन दिवसाचे संपूर्ण अनुभव त्यांना सांगितला आणि आता यापुढे काय करायचे? कसे होणार? याबद्दल मी त्यांना प्रश्न विचारू लागलो. 
त्यावर ते मला म्हणाले कि मी याबाबत आज सकाळीच परमेश्वराजवळ तुमच्या  साधनेबाबत सद्याची अवस्था जाणून घेतली आहे. 
तुम्हाला अजून तीन दिवस साधना सातत्याने पुढे ठेवावी लागेल. असे बाबानी मला सांगताच माझ्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. 
बाबा माझं काय चुकलंय का? काही कमी राहिले का? काय कळत नकळत पणे काही चूक झाली आहे का? असे प्रश्न विविध प्रश्न मी बाबांना विचारू लागलो. 
माझ्यासमोर प्रश्न होता तो सिद्धीचा किंवा साधनेचा नाही तर बँकेची कर्ज वसुलीसाठी जप्तीचा आहे ती कशी थांबवली जाईल? ती कशी संपवता येईल याबाबत माझ्या डोक्यात प्रश्न सुरू होते. 
माझी चलबिचलता पाहून बाबा म्हणाले, तुमच्या मनात जे प्रश्न घोळत आहेत त्याबद्दलचा विचार सोडा आणि आपल्या साधनेकडे लक्ष केंद्रित करा मी सांगितल्याप्रमाणे अजून तीन दिवस साधना पुढे सुरू ठेवा. 
अखेर बाबांचा आदेश योग्यमानून मी माझ्या आठव्या दिवसाच्या साधनेची सामग्री गोळा करण्यासाठी बाजारात निघालो. 
ठरल्याप्रमाणे मी पुन्हा ऑफिसला आठव्या दिवशीच्या साधनेसाठी गेलो पण मन अस्थिर होत, निराश होतं,
साधना सुरू करताच माझे सर्व लक्ष माझ्या प्रश्नांवर  केंद्रित व्हायला लागले आणि मंत्रजप फक्त मुखाने होता पण लक्ष माझे माझ्या प्रश्नांवर होते. 
हाच फरक संसारी आणि संन्यासी साधकांमध्ये असतो कारण संसारी माणसाला अनेक प्रश्न असतात आणि संन्यासाला फक्त आत्मचिंतन असते. क्षणभर मी संसारी असल्याचा पच्छाताप झाला  परंतु परमेश्वराने आधीच सांगितलेले आहे कि संन्यासापेक्षा  संसारी श्रेष्ठ आहे कारण तो त्याच्या सर्व  प्रपंचातून वेळ काढून माझी आठवण करतो माझी भक्ती करतो माझी साधना करतो म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. 
आठव्या दिवशीच्या साधनेमध्ये मला संमिश्र असे सगळे अनुभव आले या अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन मी झाडाच्या दिशेने निघालो. 
झाडाकडे गेल्यानंतर मी त्या शक्तीला भोग ठेवला आणि नमस्कार करू लागलो आणि इतक्यात माझे दोन्ही कान बंद झाले. 
मला बाहेरचे काही ऐकू येत नव्हते आणि माझा जो श्वास होता त्याचाच आवाज फक्त मला ऐकू येत  होता
एक प्रकारचे ते माझे स्तंभन झाले होते पण भानावर येत मी तिथून नमस्कार करून माझे घर गाठले. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------

Hello

I was very happy as the seven days of sadhana was completed as Baba told me and I reached my father's house full of that joy ...
When I went to their house, I saw Baba sitting quietly on a seat, my life came alive because I had not seen him for two days.
It was as if they were waiting for me. When I left, he said, "Here I am waiting for you."
What? How did the sadhana happen? Did everything go well? He asked me such questions.
I told them the whole experience of the last two days and what to do now? How will it be I started asking them questions about it.
He told me that I had learned about your condition from the Lord this morning.
You will have to continue the sadhana continuously for three more days. As soon as Babani told me this, a question mark appeared on my face.
The question before me was not about the achievement or the means, but about the forfeiture of the bank's debt. The question starts in my head about how to end it.
Seeing my restlessness, Baba said, "Think about the questions that are lingering in your mind and focus on your sadhana. Continue the sadhana for three more days as I said."
Finally, following Baba's orders, I went to the market to collect the contents of my eighth day tool.
As planned I went back to the office for the eighth day tool but my mind was restless, frustrated,
As soon as I started the sadhana, all my attention was focused on my questions and the chanting was only with my mouth but my attention was on my questions.
This is the difference between worldly and ascetic seekers because the worldly man has many questions and the ascetic has only introspection. For a moment I regretted being worldly, but the Lord has already said that the world is superior to the ascetic because he takes time out of all his worlds to remember me, worships me, practices me, so he is the best.
On the eighth day's sadhana, I had all these mixed experiences. With these experiences, I walked towards the tree.
After walking towards the tree, I felt the power and started saluting and in the meantime both my ears were closed.
I could not hear anything outside and I could only hear the sound of my breathing
It was a kind of paralysis for me but coming to my senses, I greeted him and reached my house.

No comments:

Post a Comment