Tuesday, 12 May 2020

12-05-2020-1

प्रिय मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग वर स्वागत आहे. 
मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितले होते कि मी कृतीला सुरवात केली होती, लेखकाच्या लिखाणा नुसार मी त्राटक साधना करण्याचा विचार केला व सूर्यावर नजर रोखून त्राटक साधना करायला लागलो. सुरवातीला ते अशक्य वाटत होते पण डोळे लाल होऊन पाणी येणे डोळ्याला सूज व खाज येणे असे दुष्परिणाम दिसू लागले पण मी सातत्याने प्रयत्न करतच होतो. काही का असेना पण एक आत्मविश्वास निर्माण झाला होता. 
लेखकाने प्रयोगासाठी समोरच्या व्यक्तीवर त्याच्या मानेवर नजर रोखायला सांगितले होते त्याप्रमाणे मी सातत्याने प्रयोग करीत होतो. शेवटी एके दिवशी माझा प्रयोग यशस्वी झाला असे मला वाटले पण ते सत्य नव्हते. माझ्या पदरी केवळ निराशा आली होती मार्ग मिळत नव्हता मन खूप बैचैन झाले होते. सारे काही खोटे आहे असे मनाने ठरवून टाकले होते. 
प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी एक आयचींगचे पुस्तक घेऊन आलो, त्यात सांगितलेल्या विधीप्रमाणे मी माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागलो काही अंशी त्यात तथ्य होते मी हौस म्हणून शेजारी-मित्र यांच्या प्रश्नांची उत्तरे सांगू लागलो. माझ्या गल्लीत माझा भाव वधारला होता, पण मन सातत्याने एक अज्ञाताचा शोध घेत होते. 
त्यावेळी वडिलांबरोबर मी अनेक प्रकांड ज्योतिषांकडे जाऊन आलो होतो त्यांची भाकिते ऐकली कि मी खूप भारावून जायचो पण ते असत्य ठरल्याने माझा त्या शास्त्रावरचा विश्वास १०० टक्क्यावरून २५ टक्क्यावर आला होता. भूतकाळ व भविष्यकाळ यातील सीमा म्हणजे वर्तमानकाळ पण हा काळ फारच अंशतः असतो त्यामुळे माझ्या अधीर मनाचा शोध सुरूच होता.... 




Dear friends welcome back to my blog.

In a previous blog I told you that I had started the action, according to the author's writing, I thought of doing Tratak Sadhana and started doing Tratak Sadhana with my eyes fixed on the sun. At first, it seemed impossible, but the redness of the eyes, the watery eyes, the swelling and the itching of the eyes began to show side effects, but I kept trying. For some reason, but confidence was built.

I was continually experimenting, just as the author told the person in front of me to keep an eye on his neck for the experiment. Finally, one day I thought my research was successful, but it was not valid. I was just frustrated; I couldn't find a way; my mind was very restless. The thought had decided that everything was a lie.

To find the answers to the questions, I brought an icing book, and as per the method described in it, I started looking for the answers to my questions. To some extent, it contained facts. I started answering the questions of my neighbors and friends. My mood had risen in my alley, but the mind was always searching for an unknown.

At that time, I had visited many great astrologers with my father and heard their predictions that I would be overwhelmed, but as it turned out to be untrue, my faith in that science had gone from 100 % to 25%. The boundary between the past and the future is present, but this time is very partial, so my troubled mind was still searching

No comments:

Post a Comment