Tuesday 26 May 2020

26-May-20

नमस्कार मित्रांनो 

थरारक प्रसंग 
बारा दिवस पूर्ण होऊन मी तेराव्या दिवसांमध्ये पदार्पण केलं होतं माझ्याकडे आता फक्त 3 दिवस बाकी होते त्यानंतर बँकेची जप्ती माझ्याकडे येणार होती आणि माझ्या जागेचा निकाल लागणार होता ज्या ऑफिसमध्ये मी साधना केली त्याच ऑफिस वर टाच आली होती. 
मी लगबगीने बाबांच्या घरी गेलो, झालेला रात्रीचा अनुभव त्यांना सांगीतला आणि बाबा आता यापुढे कसे काय करायचे? माझ्या बँकेचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा काय दुरुस्त होऊ शकेल? तो प्रश्न कसा सुटेल याबद्दल मी त्यांच्याकडे चर्चा करू लागलो. 
त्यावर बाबांनी मला सांगितलं की तुम्ही कोणतीही चिंता करू नका, काही होणार नाही! बँकेची माणसे आली तरी सुद्धा तुमच्या केसाला धक्का लागणार नाही हा माझा शब्द आहे आणि मी तो पार पाडिनचं माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. 
पण माझ्यापुढे प्रश्न होता की बँकेचे पैसे द्यायचे कसे? जर ते दिले नाही तर बँकवाले काही ऐकणार नव्हते अशा परिस्थितीत मी सुरक्षित कसा राहू शकतो? बाबा मला कसे सुरक्षित करू शकतात? याबद्दल मनामध्ये अनेक प्रश्न होते. या विचारत साधनेचे संमिश्र प्रतिसादात दोन दिवस निघून गेले. 
शेवटी तो दिवस आलाच आणि बँकेची माणसं माझ्याकडे कुलूप घेऊन माझ्या ऑफिसला आले. तो क्षण माझ्या आयुष्यातला फार मोठा थरारक क्षण होता. मन आणि तन दोन्हीही कापत होते. 
ज्या वास्तूत मी माझा व्यवसाय वाढवला मी अद्भुत साधना शिकलो ती वास्तू आज माझ्या हातून जाणार, याचा विचार करून मी मनात खूप निराश व दुःखी झालो. मनातल्या मनात आसवे फुटून हुंदके येऊ लागले.
माझ्यासमोर बँकेची पूर्ण टीम होती आणि मी व  माझी पत्नी त्या ऑफिसमध्ये थांबलो होतो. बँकेने संपूर्ण कागदपत्र तसेच लॉक करण्यासाठी आणलेले संपूर्ण सामग्री सोबत होती. 

बँक यांच्या माणसांची चर्चा करताना त्यातील एक अधिकारी मला खूप वाईट वाईट बोलत होता खरंतर त्याची काही गरज नव्हती पण तो विनाकारण मला अनावश्यक गोष्टी बोलत होता. 
त्यावर मी त्यांच्याकडे न बघता बाजूला मान फिरवून माझ्या सिद्धीला शक्तीला आवाहन केलं की तू कुठे आहेस ?आणि हे काय चाललंय? हे कधी थांबणार आहे? मी या लोकांकडून अजुन किती दिवस वाईट गोष्टी ऐकणार आहे? तू काहीच का करत नाहीस? मार्ग का देत नाही? असे अनेक प्रश्न मी शक्तीला रागाच्या भरात मनातल्यामनात बोलून टाकले. 
तसेच अजून त्यातला दुसरा अधिकारी माझं काही ऐकायचं नाही हे ठरवून आला होता. माझ्या ऑफिसला त्यांचे टाळं लावून त्याच्यावरती सील लावावे ही त्याची खूप प्रबळ अशी त्याची इच्छा होती आणि त्यामुळे तो आतून धुमसत होता. 
इतक्यात त्या अधिकाऱ्यांना मोठ्या साहेबांचा फोन आला आणि त्यांनी तुर्तास कागदोपत्री उपचार करून सिल न लावण्याचे आदेश दिले आणि ते सर्व अधिकारी अचंबित झाले. 
दोन दिवसांनी मला बँकेमध्ये हजर होण्यास सांगितले पुढचे रीशेड्यूल करून देण्यासाठी, हा एक चमत्कार म्हणावा लागेल. 
माझ्या ऑफिसवर आलेली बँकेची टाच ही माझ्या मानेवरती असणाऱ्या तलवारी प्रमाणे हलकीशी चाटून गेली होती पण यातून मला शारीरिक नव्हे पण मानसिक इजा झाल्या आणि आणि मी माझ्या सर्व प्रयत्नांवर नाखूष झालो होतो, कदाचित माझ्यातच काहीतरी कमी राहिली असावी ह्या भावनेनं. 
शेवटी बँकेची माणसं तरातरा करून निघून गेली आणि मी माझ्या बाबांच्या घरचा रस्ता पकडला बाबांकडे गेलो तर बाबा माझी वाट बघत होते माझ्यासोबत माझ्या पत्नीला पाहून त्यांनी आमच्या दोघांचे स्वागत करून आम्हाला बसण्यासाठी इशारा केला. 
बाबांनी मला विचारलं, काय स्थगिती मिळाली का? मनासारखे झाले का? त्यावर मी त्यांना सांगितलं बाबा स्थगिती तर मिळाली पण मनासारखे नाही झाले कारण मला या कर्जातून मुक्ती हवी ती मला लवकरात लवकर मिळावी ही माझी इच्छा आहे. 
त्यावर बाबांनी सांगितलं दोन दिवसांनी एका ठिकाणी आपल्याला हवनाला जायचे आहे आणि तुम्ही मला सोबत करणार आहात तुमची मदत मला हवी आहे तुम्ही माझे सोबती म्हणून माझ्यासोबत काम करा. 
पण बाबा दोन दिवसांनी मला बँकेमध्ये हजर होण्यास सांगितले आहेत तर मी कसा काय तुमच्या बरोबर येऊ शकतो? हा माझा प्रश्न ऐकून बाबांनी सांगितलं की आधी हवन करा आणि मग तिथून बँकेत जाऊन या. सर्व ठीक होईल. शंका नको. 
बाबांचे हे अजब आदेश ऐकून खरं तर मला ते मनातून पटले नव्हते परंतु त्यांना नकार देण्याचा प्रश्नच येत नव्हता म्हणून मी दोन दिवसांनी त्यांना ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी भेट देण्याचे ठरवले. 
ठरलेल्या ठिकाणी आम्ही भेटल्यानंतर बाबांना सर्वप्रथम मी हा प्रश्न केला की, बाबा मला हवनाचे काहीही माहित नाही मी कुठलाही विधी करण्यास असमर्थ आहे अशा वेळेला मी तुम्हाला काय म्हणून मदत करू शकतो? त्यावेळी बाबांनी फक्त हसून मला सांगितलं काय सांगावं हाच तुमचा पुढचा मार्ग असेल चला माझ्यासोबत.... 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Hello friends

Thrilling event
Twelve days had elapsed and I had made my debut in the thirteenth day. I now had only 3 days left.
I hurried to Baba's house, told him about the night's experience, and how Baba could do it now. How can my bank's problem be fixed? I started talking to them about how to solve that problem.
Baba told me not to worry, nothing will happen! My word is that even if the bankers come, your hair will not be hurt and trust me completely that I will carry it out.
But the question before me was how to pay the bank? How can I be safe in a situation where the bankers wouldn't listen if I didn't pay? How can Dad protect me? There were many questions in mind about this. Two days went by in the composite response of this asking tool.
Finally, that day came and the bank man came to my office with the lock. That moment was the biggest thrilling moment of my life. Both the mind and the body were trembling.
I was very disappointed and saddened at the thought that the Vastu in which I had grown my business, the Vastu in which I had learned wonderful sadhana, would be lost to me today. Tears welled up in my mind.
I had the whole bank team in front of me and my wife and I was standing in that office. The bank was accompanied by all the documents as well as all the materials brought for locking.
While discussing the men of the bank, one of the officers was talking very badly to me. In fact, he did not need anything but he was talking to me unnecessarily.
Without looking at them, I turned my head and appealed to Shakti for my achievement. Where are you? And what is going on? When will this stop? How many more days will I hear bad things from these people? Why don't you do anything Why not give way? Many such questions I asked Shakti in my heart full of anger.
Also, another officer had decided not to listen to me. He wanted my office to be locked and sealed, and he was smoky from the inside.
All of a sudden, the officers got a call from the big boss and he immediately ordered not to seal the paperwork and all the officers were shocked.
Two days later I was asked to show up at the bank to reschedule the next one, this would have to be called a miracle.
The heel of the bank that came to my office was licked lightly like a sword on my neck, but it hurt me not physically but mentally, and I was unhappy with all my efforts, perhaps feeling that something was missing in me.
At last, the bank man hurried away and I took the road to my father's house. I went to Baba's house. Baba was waiting for me. Seeing my wife with me, he welcomed us both and motioned for us to sit down.
Baba asked me, did you get a postponement? Did you like it I told him that I got a deferment, but I did not like it because I want to get rid of this debt as soon as possible?
Baba said, "I want to go to Havana in two days and you are going to accompany me. I need your help. You work with me as my companion."
But if Baba has asked me to come to the bank in two days, how can I come with you? After hearing my question, Baba told me to do Havan first and then go to the bank. All will be well. No doubt
Hearing this strange order from Baba, in fact, I did not agree with it, but there was no question of refusing it, so I decided to visit him at the appointed place in two days.
After we met at the appointed place, the first thing I asked Baba was, Baba, I don't know anything about Havana, what can I do to help you at a time when I am unable to perform any rituals? At that time, Baba just smiled and told me, what will be your next step, come with me...

No comments:

Post a Comment