नमस्कार
रात्री साडेतीन वाजता मी पूर्णपणे शुचिर्भूत होऊन तयार झालो. सोबत काही वस्त्र घेतली होती. बाबांनी सांगितलेले थोडं सामान तेही सोबत घेतलं. आणि ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी मी माझे गुरु आणि माझ्यासोबत 1-2 माझे स्नेही बरोबर आले. आम्ही एकत्र भेटलो आणि नाशिकला जायला निघालो.
मी आणि माझे गुरु सोबतच बसलो होतो आणि आमची गाडी ही त्या झाडाच्या जवळून जाणार होती जिथे मी रोज त्या शक्तीला भोग देत होतो आणि आमची गाडी त्या झाडाजवळ आली आणि इतक्यात मला असे जाणवले की तेथे त्या झाडाच्या जवळ जे छोटे पटांगण होतं त्या पटांगणात किमान शे-दोनशे भूतं किंवा तत्सम वायुरूप आकृत्या या पूर्णपणे गुडघ्यावर बसून डोकं जमिनीवर टेकून कुठल्यातरी शक्तीला नमस्कार करीत आहे. हे मी माझ्या डोळ्यांनी स्पष्ट पाहिलं आणि माझ्या गुरूंना आवर्जून दाखवलं की हे बघा बाबा तिथे काय दिसते आहे.
त्यावर जास्त भाष्य न करता माझ्या गुरुंनी नाशिककडे निघण्यासाठी हाताने इशारा केला आणि आम्ही सर्वजण नाशिकला कूच केली परंतु तेथील दिव्याचा प्रकाश बरेच काही सांगण्याचा प्रयन्त करीत होता.
पहाटे आठ-नऊ च्या दरम्यान आम्ही नाशिकला पोहोचलो तिथे गेल्यावर कुशावर्त कुंडावर मला बाबांनी आंघोळ करायला सांगितले.
खूपच थंडी होती तरीसुद्धा त्या थंडीत मी त्या थंडगार पाण्यात आंघोळ केली आणि त्या पाण्याचा दुर्गंध पाहून मला माझीच कीव आली तरीसुद्धा बाबांच्या आदेशानुसार मी तेथे आंघोळ करून ओल्यात्याने बाहेर आलो.
त्या ओल्या अंगावरती मी माझी सोवळ्याची वस्त्र नेसून ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या पायथ्याशी संत ज्ञानेश्वरांचे गुरु संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे तिथे आम्ही प्रथम नमस्कार केला आणि ब्रह्मगिरी पर्वत चढू लागलो.
पर्वताच्या मध्यावर आल्यावर मला बाबांनी सांगितले की हा छोटा जो पठार दिसतो आहे त्या पठारावर आपण थांबायचे आहे. मी आणि माझे सोबती त्या पठारावर आसन टाकून तिथे आम्ही बसलो.
मला पुन्हा त्याच वडाच्या झाडाकडे बसायला सांगून गुरूंनी पुन्हा त्या शक्तीचा मंत्रजप करायला सांगितला.
मंत्राचा जप पूर्ण झाल्यानंतर मला असा आदेश होता की कोहळा नावाचे फळ आहे त्या फळाचे दोन भाग करून त्या झाडाकडे ठेवावे त्याप्रमाणे मी माझ्याकडे कोणतेही शस्त्र नसताना धारदार दगडाच्या आधारे मी त्या फळाचे दोन तुकडे केले आणि झाडाजवळ ठेवले.
सर्व विधी पूर्ण झाल्यावर मला तिथे शांत बसून बाबांनी विचारले की तुम्हाला काही जाणवते आहे का? खरतर मला पायातील घुंगरूचा आवाज स्पष्टपणे ऐकायला आला होता तरीही बाबांना मी मला काहीही ऐकायला आलेले नाही असे खोटे सांगितले.
बाबांनी ठीक आहे असं म्हणत पुन्हा तो पर्वत आम्ही उतरु लागलो आणि आमच्या गाडीजवळ येऊन आम्ही थांबलो. आता परतीचा प्रवास करायचा होता.
बाबांना गाडी चालवण्याची आवड असल्याने त्यानी स्वतः ड्रायव्हिंग करायचे ठरवलं मी त्यांच्या मागच्या सीटवर बसलो होतो, तर त्यानी त्यांचा बॅक मिरर माझ्या दिशेने रोखून ते मला त्यातून न्याहाळत होते.
थोड्यावेळाने माझ्या अंगावरती गुदगुल्या होऊ लागल्या तसेच केसांचे पुंजके माझ्या चेहऱ्यावरती फिरू लागले कानाशी कोणीतरी खेळत आहे असं जाणवू लागलं त्यामुळे मी खूपच प्रस्त झालो होतो आणि माझा चेहरा मी वारंवार पुसू लागलो, डोक्यावरून हात फिरवू लागलो, कान साफ करू लागलो, हे सर्व माझे गुरु बाबा आरशातून मला पाहत होते.
बाबांनी मला विचारलं काय होतं तुम्हाला त्यावर मी होणारा प्रकार त्यांना सांगितला आणि त्यांनी एक गोड स्मित केलं आणी म्हणाले तुम्हाला नाही होणार तर कोणाला होणार? बघा पुढे काय चमत्कार होतो ते! असं म्हणून आम्ही आमचा तो सुखद अनुभवाचा प्रवास पूर्ण करून घरी आलो.
Hello
At three-thirty in the morning, I was completely cleansed and ready to go, along with some clothes. I also took some of the things that Baba told me and at the appointed time I came with my Guru and 1-2 of my friends. We met together and left for Nashik.
My guru and I were sitting together and our car was going to go near the tree where I was experiencing that power every day and our car came near that tree and all of a sudden I realized that there were at least one hundred and two hundred people in the small field near that tree. Ghosts or similar gaseous figures are sitting on their knees and bowing their heads to the ground to greet some force. I saw this clearly with my own eyes and reminded my guru to see what Baba looks like there.
Without further ado, my Guru gestured with his hand to leave for Nashik and we all marched to Nashik But the light of the lamp there was trying to say a lot.
When we reached Nashik between eight and nine in the morning, Baba asked me to take a bath at Kushavart Kunda.
Even though it was very cold, I bathed in that cold water and even though I felt bad because of the stench of that water, I took a bath and came out wet as per Baba's order.
On that wet body, I put on my sovlaya cloth and at the foot of Brahmagiri mountain, there is the Samadhi of Saint Dnyaneshwar's Guru Sant Nivruttinath Maharaj. We first greeted him and started climbing Brahmagiri mountain.
When I reached the middle of the mountain, Baba told me that we wanted to stop at this small plateau. My companions and I sat down on the plateau and sat down.
The Guru asked me to sit next to the same Vada tree again and chanted the mantra of that power again.
After chanting the mantra, I was ordered to cut the fruit into two pieces and place it near the tree, just as I did when I had no weapon. I cut the fruit into two pieces with a sharp stone and placed it near the tree.
When all the rituals were over, Baba sat me down and asked me if I could feel anything. In fact, even though I could clearly hear the sound of footsteps, I lied to Baba that I had not heard anything.
Saying that Baba was fine, we started descending the mountain again and came near our car and stopped. Now I wanted to travel back.
Baba was interested in driving so he decided to drive himself. I was sitting in his back seat, he was holding his back mirror towards me and he was looking at me through it.
After a while I started getting tickles on my body and bunches of hair started moving on my face. I felt like someone was playing with my ears so I was very relaxed and I started wiping my face frequently, moving my hands over my head, wiping my ears, all this from my Guru Baba mirror. Was watching me.
Baba asked me what was going on and I told him what would happen to him and he gave me a sweet smile and said if not you then who will? See what happens next! So we came home after completing our journey of that pleasant experience.
No comments:
Post a Comment