Monday 1 June 2020

01-Jun-20

नमस्कार,

बाबांनी दिलेल्या गुरु मंत्राचे  मी त्याच दिवशी संध्याकाळी अनुष्ठान करण्यास सुरुवात केली.  बाबांचा असा आदेश होता की तुम्हाला मी जी रात्रीची साधना दिलेली आहे ती थोडी कमी करून हा जो गुरुमंत्र दिलेला आहे याची साधना तुम्ही जास्तीत जास्त करावी.

मी रात्री बारा वाजता सिद्धी साधनेचा  जप करण्यासाठी बसायचो रात्रीचे मला तो विधी संपेपर्यंत अडीच वाजायचे आणि एक दीड तास झोपून चार वाजता ब्राह्ममुहूर्तावर उठून शुचिर्भूत होऊन पुन्हा गुरुमंत्राच्या जपासाठी बसण्यास सुरुवात केली होती. उत्पन्नाचे काहीही साधन नसताना मी केवळ साधनेच्याच आहारी गेलो होतो आणि केवळ साधना हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे असे मला वाटायला लागले होते.  माझा जन्म केवळ या साधनेसाठी झालेला आहे असं मी समजून होतो. 

माझ्या सिद्धी साधना आणि गुरु मंत्राच्या जपाचा प्रभाव माझ्या घराच्या वास्तूत इतका झाला होता की, माझ्या घरी आणि ऑफिसमध्ये सर्व लोकांना त्या शक्तीचा वेगवेगळा प्रभाव दररोज जाणवत होतात आणि त्याने ते खूपच प्रभावित झाले होते. 

बाबांच्या आदेशानुसार मी गुरु मंत्राचे अनुष्ठानास सुरुवात केली आणि त्याच्या पूर्ततेसाठी हवन सोहळा स्वतः स्वतःच्या घरात  गुरु मंत्राचे अनुष्ठानपूर्ती हवन करावे असे बाबांनी सांगितले होते त्याप्रमाणे मी हवन कार्य पूर्ण करून त्याची मांडणी केलेल्या वस्तू सर्वपणे आवरु लागलो.  असे करताना हवन कुंडाच्या विटा उचलण्यास गेल्यानंतर मला हे समजले की त्या प्रत्येक विटेचे वजन वाढलेले असून ते मला उचलणे अशक्य आहे म्हणून मी लगेचच त्या परिस्थितीत बाबांकडे आदेश घेण्यासाठी गेलो. 


बाबांना झालेल्या हवनातला प्रकार सांगितल्यानंतर ते गोड स्मित करून म्हणाले की, श्री गोरक्षनाथांना तुमची साधना तुमचे अनुष्ठान खूप आवडले असल्याने त्यांनी तिथेच वास करण्याचा, थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला काही मंतरलेले तांदूळ देत आहे ते आपण त्या विटेवर टाकून तीन वेळा आदेश म्हणून त्या विटा उचलाव्या. आदेशानुसार मी त्या विटेवर आणलेले तांदूळ सर्वत्र टाकले आणि तीन वेळा आदेश आदेश आदेश असे म्हणून नमस्कार केला आणि काही चुकले असल्यास मला क्षमा करावी अशी विनंती केली परंतु त्या विटेचे वजन अजूनच अनेक पटीने वाढले आणि ती वीट जागेवरची हलण्यास तयार नव्हती म्हणून मी माझ्या घरच्यांचा आधार घेऊन त्या विटा माझ्याच घरात एका कोपऱ्यात सांभाळून ठेवल्या. 

माझ्या घरच्या वास्तूचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि चैतन्यपूर्ण असे झाले होते.  मी समाजापासून या जगापासून हळूहळू अलिप्त होत चाललो होतो आणि मी एकांतवास गाठू लागलो होतो मला कोणत्याही गोष्टीत रस-आवड राहिली नव्हती. मी माझ्या छोट्याश्या एका जागी बसून एकाच ठिकाणी तासन-तास बघत असे, माझी अवस्था एखाद्या संन्यास्याप्रमाणे झाली होती मला केवळ परमेश्वराची कास लागली होती माझे  व्यवसाय उत्पन्न आणि संसार याचा मला विसर पडू लागला होता..

ठरवून एके दिवशी सकाळी पाच वाजता बाबानी मला माझ्या घराबाहेर भेटण्यास बोलावून, म्हणाले की, मी काही महिन्यासाठी बाहेरगावी चाललेलो आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि दिलेले  मंत्र जप हे संपूर्ण सुरू ठेवा. बाबा म्हणाले मी माझ्या गुरूंशी शप्पथ घेऊन सांगतो की माझ्या हातचं काहीही न राखता मी तुम्हाला सर्वस्व दिलेले  आहे तरी तुम्ही यापुढे तुमचे शिष्य स्वतः बनवू शकता, लोकांचे प्रश्न सोडवू शकता आणि या जग कल्याण्यासाठी स्वतःला समर्पित करून तुमचा जन्म घेण्याचा हेतू पूर्ण करा. आपला संसार नेटाचा करुन  व्यवसायामध्ये ज्या पद्धतीने जितकं शक्य आहे तेव्हढे लक्ष घालून स्वतःचा उदरनिर्वाह करावा. मी काही महिन्यातच परत येईन. सकाळच्या या मुहूर्तावर गुरूंनी दिलेला आशीर्वाद घेऊन मी माझ्या घरी माघारी परतलो एका वेगळ्या उद्दिष्टाकडे नजर रोखीत... 
Hello

I started performing the Guru Mantra given by Baba on the evening of the same day. Baba's order was that you should reduce the night sadhana that I have given you a little and do as much sadhana as you have given the Guru Mantra.

I used to sit at twelve o'clock at night to chant Siddhi Sadhana. At night I used to sit for one and a half hours till the end of the ritual. When there was no means of income, I had gone on a diet of means only and I was beginning to feel that only means is the goal of my life. I understood that I was born only for this tool.

My Siddhi Sadhana and chanting of Guru Mantra had such an effect on the architecture of my home that all the people in my home and office were feeling the different effects of that power every day and he was very impressed by it.

As per Baba's order, I started the ritual of Guru Mantra and for its fulfillment, the Havan ceremony was to be performed in my own house for the ritual Havan of Guru Mantra. While doing so, after going to pick up the bricks of Havan Kunda, I realized that the weight of each of those bricks has increased and it is impossible for me to pick them up, so I immediately went to Baba to take orders in that situation.

After telling Baba about the Havana, he smiled sweetly and said, "Shri Gorakshanatha loves your sadhana and your ritual. He has decided to stay there and stay there. To pick up As per the order I threw the rice brought on that brick everywhere and greeted me three times as order and asked me to forgive if anything went wrong but the weight of that brick still increased many times and she was not ready to move the brick place so I relied on my house The bricks were kept in a corner of my house.

The atmosphere at my house was very pleasant and vibrant. I was slowly becoming detached from society and from this world, and I was becoming more and more isolated. I was not interested in anything. I used to sit in one of my small places and watch for hours in one place, I was like a hermit, I was only interested in God, I was forgetting my business income and the world.

One day at five o'clock in the morning, Baba called me to meet him outside my house and said that I had been out of town for a few months. Take care of yourself and keep chanting the given mantra throughout. Baba said I swear to my Guru that even though I have given you everything without holding anything in my hand, you can no longer be your disciple, solve people's problems and fulfill your purpose of being born by dedicating yourself to the welfare of this world. Make your world a net and focus on business as much as possible to make a living. I'll be back in a few months. At this moment in the morning, with the blessings given by the Guru, I returned to my home, looking at a different goal ...

No comments:

Post a Comment