नमस्कार,
काही महिन्यांनी माझ्याजवळ येणारे अनिकेतची चांडाळचौकडी तसेच माझे गुरु ज्यांना मी बाबा म्हणून हाक मारतो ते येईनासे आणि माझ्याशी बोलेनासे झाले तेव्हा आमच्यात फारकत आली आहे असे मला निदर्शनास आल्याने माझी सर्व गोष्टी वरची वासना उडून गेली आणि पुन्हा एकदा मी परमेश्वराचे स्मरण करत त्याच्याकडे याचना करण्यास सुरुवात केली.
मला इतर माध्यमातून नंतर असे समजले की काही महिन्यांनी माझे गुरु अनिकेतच्या संपूर्ण चौकडीला सोडून ते स्वतःच्या गावी गेले आहेत तेव्हा त्यांना भेटण्यासाठी मी स्वतः त्यांच्या गावी गेलो परंतु तेथे मला त्यांची भेट झाली नाही कारण ते गावी जाऊन परत दुसर्या कुठेतरी अज्ञातस्थळी निघून गेले असल्याचे मला त्यांच्या घरच्यांकडून कळले.
माझ्याकडे कुठल्याही व्यक्तीला घेऊन येऊ नका! असे वारंवार मला गुरूंनी सांगितलेले असतानाही मी इतर लोकांच्या समस्येने व्याकूळ होऊन त्यांना मार्गदर्शन मिळावे न्याय मिळावा म्हणून मी प्रत्येक वेळी अनेक लोकांना माझ्या गुरूंची भेट करून देत गेलो परंतु त्याचा विपर्यास झाल्याचा मला हा पूर्णपणे आलेला सखोल अनुभव होता.
निराश होऊन मी बाबांच्या गावावरून पुन्हा माझ्या घरी आलो मी माझी पत्नी आम्ही दोघेही विचार करू लागलो की आता यापुढे आपण कसे आणि काय करावे हे ठरवावे लागेल म्हणून त्या विषयाचा आम्ही विचार करू लागलो.
छपाई बाबत मला चांगल्या प्रकारे ज्ञान असल्याने तसेच अध्यात्मामध्ये मिळालेली ज्ञानाची शिदोरी. याप्रमाणे मी दोघांची सांगड घालत सन 2002 मध्ये सोहम भगवती या नावाने अध्यात्मिक मासिक सुरू केले.
जेव्हा हे मासिक प्रकाशित झाले तेव्हा त्या काळात केवळ पंधरा दिवसातच मासिकाच्या संपूर्ण आवृत्या संपल्या होत्या आणि वितरकांची माझ्याकडे जोरदार मागणी वाढली होती सर्व लोकांनी तो विषय-अनुभव-ज्ञान या सर्व गोष्टींना उचलून धरून मला न्याय दिला होता.
सोहम भगवती मासिकाने मला वाचक तर दिलेच शिवाय मला सुप्रसिद्धी देत माझे ज्ञान हे इतर दैनिक पेपरमध्ये तसेच TV चॅनेल च्या माध्यमातून प्रकाशित होण्यास सुरुवात झाली.
तेव्हापासून अनेक देशातून-राज्यातून विविध धर्माचे-जातीचे-वयाचे व्यक्ती माझ्याकडे अनेक समस्या घेऊन आजतागायत येत आहेत. त्यांच्या समस्या व समस्यांचे निवारण हे मी माझ्या मासिकात सत्य अनुभव या नावाने प्रकाशित करीत आलो आहे. हेच दालन मी आज या व्यासपीठावर सुरू करून मी माझ्या अध्यात्मिक प्रवासात लोकांची कशी सेवा केली व त्याचे आलेले अनुभव हे मी आपणाशी शेअर करणार आहे तरी कृपया आपण या सत्य अनुभव ब्लॉगचा आस्वाद घ्यावा.
मला बाबा गुरूंनी दिलेले अध्यात्मिक ज्ञान वनस्पतीशास्त्र ,अग्निशास्त्र तसेच विविध विद्या शिकवून माझ्यात पारंगतता आणून दिली व जे मला ज्ञान प्राप्त झाले त्याबाबत मी आपणाकडे माझे ज्ञान वाटून आपल्यालाही ही आपल्या ज्ञानातही भर पाडण्याचे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.
आजवर माझे आपण अनेक ब्लॉग वाचले आहेत. ज्या वाचकांनी माझे निरंतर ब्लॉग वाचले असतील त्यांना माझ्या सुरुवातीच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल कल्पना आली असेलच परंतु जे मी मधल्या काळात ( 21 वर्षाच्या काळात) अनुभव घेतले त्याबाबत आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे.
माझ्या आगामी ब्लॉग मध्ये आपल्याला विविधता जाणवेल उदाहरणार्थ अध्यात्मिक-मनःशांती-आयुर्वेद-तोडगे स्वरूपात आपणाकडे सादर केले जाईल यापैकी आपल्याला जे ज्ञान व आवश्यकता असेल ते जोपासून त्याबाबत काही शंका/सल्ला मसलत असेल तर माझ्याशी कृपया ई-मेलद्वारे संपर्क साधावा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Hello,
A few months later, when I noticed that Aniket's Chandalchaukadi, who was approaching me, as well as my guru, whom I call Baba, did not come and talk to me, I realized that we had parted ways.
I later learned through other means that a few months later, my guru Aniket had left the entire quartet and gone to his village. I went to his community to meet him, but I did not meet him there as I heard from his family that he had gone to the village and gone back to another unknown place.
Don't bring anyone to me! Despite being told so many times by my guru, I was disturbed by other people's problems, and I used to visit my guru many times each time to seek guidance and justice so that I could get justice.
Disappointed, I returned to my hometown from Baba's village. My wife and I both began to think about how and what to do next, so we started thinking about it.
I have a good knowledge of printing as well as a wealth of experience in spirituality. In this way, I started a spiritual magazine called Soham Bhagwati in the year 2002.
By the time this magazine was published, the whole issue of the magazine had run out in just fifteen days, and the distributors were in high demand of me.
Soham Bhagwati magazine not only gave me readers but also made me well known, and my knowledge started to be published in other daily papers as well as through TV channels.
Since then, people of different religions, castes, and ages from many countries and states have come to me with many problems. I have been publishing their problems and solutions in my magazine under the title Satya Anubhav. This is the gallery I started on this platform today, and I will share with you how I have served people in my spiritual journey and the experiences I have had, but please enjoy this experience blog.
The spiritual knowledge given to me by Baba Guru brought me expertise by teaching botany, fire science, as well as various sciences and I, am sincerely trying to share my knowledge with you about what I have gained.
You have read many of my blogs to date. Readers who have read my regular blog may have an idea about my new spiritual journey. Still, I am trying to communicate with you about what I experienced in the middle period (for 21 years).
In my upcoming blog, you will find diversity, for example, in the form of spiritual-peace of mind-Ayurveda-solutions.
No comments:
Post a Comment