नमस्कार,
संध्याकाळी चारच्या सुमारास अनिकेत अगदी टापटीपपणे माझ्या घरी आला सोबत माझ्यासाठी सर्वप्रथम तो स्वतः बनवत असलेल्या परफ्युमची एक बॉटल मला त्यांनी भेट म्हणून आणली होती. बरीचशी चर्चा झाल्यानंतर त्याने मला त्याचा मित्र जो आम्हाला कोकणात भेटला होता प्रसाद नामक, तोही तुम्हाला भेटायला येणार आहे त्याच्या काही वैयक्तिक समस्या आहेत तर तुमच्या भेटीसाठी आतुर आहे तो लवकरात लवकर तुमची भेट घेईल असे त्यांनी सांगून माझा निरोप घेतला.
काही दिवसांनी प्रसाद हादेखील माझ्याकडे भेटीला आला तो उच्चशिक्षित होता परंतु त्याच्या कौटुंबिक आणि आर्थिक समस्या खूप असल्याने तो त्रस्त होता त्यामुळे त्याला पुढचे मार्गदर्शन माझ्याकडून हवे होते तसेच त्यांनी मला अनिकेतचा निरोप दिला होता की, मला अनिकेतच्या गुरुंकडे त्यांच्या भेटीसाठी बोलावले आहे. वेळ ठरवून मी, राजेंद्र, अनिकेत, प्रसाद असे चौघेजण मुंबईला एका ठिकाणी भेटलो जिथे आम्हाला जायचे होते तेथे अनिकेत आम्हाला घेऊन गेला.
अनिकेतच्या गुरूंचे नाव दादामहाराज असे होते, ते कोकणातले साधक व दत्त उपासक होते त्यांच्याकडे लोकांची बरीचशी वर्दळ असायची ते ब्रह्मचारी होते. जेव्हा आम्ही अनिकेतच्या गुरूजवळ गेलो त्यावेळी त्यांच्या देवळाच्या बाहेर एक पाण्याने भरलेले मोठे पिंप होते तिथे आम्हाला हातपाय धुण्यास सांगितले. इतक्यात तिथे एक व्यक्ती आली आणि ती माझ्या डोक्याला काहीतरी लावण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी त्या व्यक्तीचा हात झिडकारून लावला. ( काही दिवसांनी मला हे समजले तो दादांचा लहान भाऊ असून तो येणाऱ्या व्यक्तीवर आपली तांत्रिक विद्या आजमावत असे.)
मी अनिकेत आम्ही सर्वजण जेव्हा त्यांच्या दादा महाराजांच्या दत्त मंदिरात गेलो त्यावेळेस मला तिथे बसण्यासाठी एक आसन दिले गेले आणि अनिकेत आपल्या कमरेचा पट्टा काढून लगबगीने त्या मंदिराची जागा पुसाण्यास सुरुवात केली, माझ्यासमोर हा अनिकेत वेगळाच होता कारण अशा पद्धतीने तो कधीही वावरताना मला दिसला नव्हता थोड्यावेळाने दादा महाराज अंदाजे वयवर्षे पन्नास असावे, एका छोट्याशा पॅन्ट-गंजीमध्ये ते माझ्या समोर आले खरंतर मला त्या मंदिराचा तो एक कामगार वाटला परंतु अनिकेतने माझी ओळख करून दिली की माझे हे गुरु दादा महाराज. मला या भेटीचे खरोखरीच आश्चर्य वाटले.
दादा महाराज आणि त्यांचे मंदिर अस्वच्छ होते परंतु त्यांच्याकडे बरीच लोक प्रश्न घेऊन यायची आणि त्या प्रश्नाचे समाधान ते करण्यास प्रयत्न करायचे.
दादांनी आम्हा सर्वांना मिठाई खाण्यास दिली आणि ते आमच्याकडे पाहू लागले परंतु ती मिठाई मी न खाता अनिकेतच्या हातात दिली आणि मी हे खाणार नसल्याचे त्याला आवर्जून सांगितले. दादा महाराजांच्या हे लक्षात आलं आणि त्यानी मला तू ही मिठाई का खात नाहीस? असे विचारले तेव्हा मी त्यांना त्या मिठाईवर आपण वशीकरणाचा प्रयोग केला आहे हे माझ्या लक्षात आलेले आहे, म्हणून मी ती मिठाई न करण्याचा निर्णय घेतला असे ऐकल्यावर दादामहाराज जोरात हसू लागले.
मी इतकी वर्ष तुझीच वाट बघत होतो, कारण मला हे माहीत होतं की माझ्या सोबतीला कोणीतरी एक नाथपंथी येईल आणि माझ्यासोबत लोकांची सेवा करण्यास समर्थ राहील. तुला या वास्तूबद्दल काही जाणवत आहे का? असे मला दादा महाराजांनी विचारताच मी त्यांना असे सांगितले की, तुम्ही या मंदिराच्या फरशी-लादीखाली बोटीतले खिळे मारल्याचे मला जाणवत आहे. असे ऐकताच दादा महाराजांनी माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले तू खरा साधक आहेस अगदी अचूक ओळखले आहेस की माझ्या या मंदिराच्या वास्तूत मी काय करून ठेवले आहे. हे फक्त तूच इतक्या वर्षात जाणू शकलास शाब्बास बेटा!
अनिकेतला या सर्व गोष्टी अपरिचित असल्याने तो खूपच आश्चर्यकारकरित्या माझ्याकडे पाहू लागला आणि ज्या गोष्टी नजरेने दिसत नाही त्या गोष्टी यांना समजतात म्हणून तो माझ्याशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. राजेंद्र हे उत्तम गायक असल्याने त्याने तिथे एक आपले देवाचे गाणे सादर करून सर्वांची मने जिंकली आणि वाह वाहा मिळवत आम्ही त्या मंदिराचा आणि दादा महाराजांचा निरोप घेतला.
रोज सकाळी दादा महाराजांचा न चुकता मला त्यांच्या समस्येसाठी फोन येत असे, हळूहळू अनिकेत आणि प्रसाद या जोडीने माझ्याकडे रोज येण्यास सुरुवात केली. रोज त्यांचे नवे नवे प्रश्न त्यांच्या समस्या या सर्व गोष्टींमध्ये मी स्वतःला अडकून घेतल्यासारखे मला वाटत होते काही दिवसांनी राजेंद्र सुद्धा या पंगतीत बसून या तिघांनी माझ्यावर अनेक गोष्टींच्या प्रश्नांचा भडिमार करून मला सतत गुंतवून ठेवू लागले. एक समस्या संपली कि ते लगेच दुसरी समस्या घेऊन उभे असायचे. या सर्वांच्या समस्येमुळे मला निद्रानाशाचा त्रास होऊ लागला परंतु पुन्हा एकदा मला माझ्या ध्यानधारणेचा (मेडिटेशन) आणि आयुर्वेदाचा खूप फायदा झाला.
मी अनेक लोकांशी तासन तास ज्ञानाच्या गोष्टी वाटत असून त्यांची अचूक प्रश्न जाणून त्यांना अचूक उत्तर देत असे हे माझ्या आईच्या पूर्णपणे लक्षात आलं की, हा याची मेहनत खूप घेत आहे परंतु या मोबदल्यात याला कोणीही काहीही मोबदला देत नाही तेव्हा तिने मला, तू देखील संसारी आहेस. तुझे ही इन्कम बंद आहे तेव्हा विनामूल्य सेवा देण्यास बंद कर आणि स्वतःचे खच्चीकरण आणि त्रास कमी कर!
माझ्या घरच्यांनी माझी बरीचशी उजळणी घेऊन मी करत असलेल्या या सर्व सेवेबद्दल आक्षेप घ्यायला सुरुवात करून त्यांनी त्याचा मोबदला घेण्याचे मला सांगितले आणि आपला उदरनिर्वाह बाबांनी सांगितल्याप्रमाणे सुरू करावा असे त्यांनी मला अधिकाराने समजावून सांगितले.
माझ्या पुढे येणाऱ्या सत्य अनुभव या ब्लॉगमध्ये तुम्हाला अनिकेत आणि प्रसाद यांच्या (अनेकांविषयी) घडलेल्या घडामोडी निदर्शनास येथील त्यामुळे मी इथे जास्त त्याबद्दल चर्चा न करता पुढचा ब्लॉग लिहिण्यासाठी आपला वेळ देत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Hello
At around 4 in the evening, Aniket came to my house very nicely and brought me a bottle of perfume, which he was making for himself. After much discussion, he said goodbye to me by telling me that his friend Prasad, who had met us in Konkan, was also coming to see you.
A few days later, Prasad Hade also came to visit me. He was highly educated, but he was suffering due to his family and financial problems, so he wanted further guidance from me. After arranging the time, Rajendra, Aniket, Prasad, and I met at a place in Mumbai where Aniket took us to where we wanted to go.
Aniket's guru's name was Dada Maharaj; he was a seeker from Konkan and a devotee of Datta. He had a lot of people, and he was a celibate. When we went to Aniket's guru, he told us to wash our hands and feet where there was a big pump filled with water outside his temple. Just then, a man came, and she was trying to put something on my head, but I shook the man's hand. (A few days later, I realized that he was Dada's younger brother, and he was trying his technical knowledge on the person coming.)
When I Aniket, and I all went to Dada Maharaj's Datta temple, I was given a seat to sit there, and Aniket took off his belt and hurriedly started wiping the place of that temple. He must have been about fifty years old; he came in front of me in a small pant-Ganji. I thought he was a worker of that temple, but Aniket introduced me that this is my Guru Dada Maharaj. I was surprised by this visit.
Dada Maharaj and his temple were unclean, but many people used to come to him with questions and try to solve them.
Grandpa gave us all sweets, and they started looking at us, but I gave the sweets to Aniket without eating and told him that I would not eat it. Dada Maharaj noticed this, and he told me why don't you eat this sweet? When I asked them, I noticed that they had experimented with the dessert, so when they heard that I had decided not to do it, Dada Maharaj started laughing out loud.
I have been waiting for you for so many years because I knew that someone would come to me with a Nathpanthi and be able to serve people with me. Do you feel anything about this building? When Dada Maharaj asked me this, I told him that I thought that you had nailed the boat under the floor of this temple. Hearing this, Dada Maharaj folded his hands in front of me and said that you are a sincere seeker, you know exactly what I have done in the architecture of this temple. Only you, as the parent, can know for sure.
Since Aniket was unfamiliar with all these things, he started looking at me in amazement, and he tried to get closer to me as he understood something that is not visible to the naked eye. As Rajendra is a great singer, he won the hearts of everyone by performing a song of his God there, and we said goodbye to the temple and Dada Maharaj.
Every morning I used to get calls from Dada Maharaj for his problem without fail, slowly Aniket and Prasad started coming to me every day. Every day I felt like I was getting entangled in all these new questions and their problems. A few days later, Rajendra also sat in this row, and these three started bombarding me with any questions. When one problem was over, he would immediately take up another issue. All these problems made me suffer from Insomnia, but once again, I benefited a lot from my Meditation and Ayurveda.
Every morning without missing Dada Maharaj, I used to get calls for his problem. My mother realized that it takes a lot of hard work, but when no one pays for it, she told me, you are also worldly. Stop providing free services when your income is off and reduce your hassle and hassle!
My family members started criticizing me for all these services and asked me to pay for it. They told me to start my livelihood, as Baba had told me.
In my forthcoming Satya Anubhav blog, I would like to give you an overview of what happened to Aniket and Prasad (about many), so I am giving your time to write the next blog without discussing it much here.
No comments:
Post a Comment