Thursday 4 June 2020

04-Jun-20

नमस्कार,

सन 2000 मध्ये मी राजेंद्र यांच्याबरोबर कोकणात त्यांच्या कामानिमित्त सोबतीला गेलो होतो ते एक उत्तम गायक असूनही ते त्रस्त आणि खूप दबावाखाली होते त्यांना प्रसिद्धी आणि धनप्राप्ती या दोन्हींमध्ये यश मिळालेले नव्हते. एका विजय नावाच्या गृहस्थाच्या सांगण्यानुसार आम्ही दोघे कोकणात एका विशिष्ट गावी गेलो होतो ते गाव भूतखरेदी करण्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे त्याठिकाणी जमिनीपासून किमान हजार-दोन हजार फूट खोल उतरणीवर असे एका नागादेवीचे मंदिर आहे.

मंदिरातल्या देवीचा रक्षक म्हणून तो वांगीभूत या नावाने प्रसिद्ध असून ते खरेदी करण्यासाठी लांबलांबून लोकं तिथे येत असतात. तुमच्या प्रॉब्लेम्सनुसार जर देवीचा कौल मिळाला तर तिची शक्ती म्हणजेच तिचा रक्षक उदा. वांगीभूत हे आपल्याला एका विशिष्ट नारळात बसवून दिले जाते. तो आपली इच्छा पूर्ण करतो असा त्यांचा समज असून तो काही अंशी सत्य असल्याचा पुरावा (स्व अनुभवातून) अनेक लोकांनी दिलेला आहे. 

प्रसिद्धी आणि धनप्राप्ती या लालसेपोटी राजेंद्र पण त्या देवीच्या गाभाऱ्यामध्ये आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी गेले असता त्यांना तिथे देवीकडून नकार मिळाला त्यामुळे ते खूपच क्रोधी झाले आणि तिथे अस्ताव्यस्त आपले विचार मांडून पुजारी / ग्रामस्थ लोकांशी भांडू लागले. त्यांचा तो अवतार पाहून मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने, ते मला आता तूच काय ते बघ आणि मला कसेही करून हे वांगीभूत मिळवून दे नाहीतर मी माझ्या जीवाचे काही तरी बरेवाईट करून घेईन. अशी त्यांनी मला सरळ सरळ धमकी दिली. आमच्यातल्या स्नेहापोटी मी त्यांना मदत करायचे ठरविले. 

मी देवीकडे एक टकने पाहिले आणि आकाशात पाहून नाथांकडे आदेश केला की मी ही क्रिया करण्यास योग्य आहे का? मी देवीला आदेश देऊ शकतो का? परंतु अशा कोणत्याही प्रकारचा आदेश मला तिथे न मिळाल्याने मी प्रॅक्टिकल करण्याचे ठरवले आणि बाबांचे स्मरण करून त्या देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या एका कोपऱ्यातल्या खांबाकडे टेकून बसलो आणि देवीकडे एक टक नजर रोखून आदेश देऊ लागलो की, तुझ्यादारी आलेला हा पीडित व्यक्ती हा जाचक ह्यावर तू कृपादृष्टी कर आणि तुझा होकारार्थी कौल देऊन त्याचे मनोरथ पूर्ण कर, असा आदेश देताच काही मिनिटातच देवीने माझ्या आदेशाला कौल दिला. 

त्या गाभार्‍यात तिथे एकूण 18 पुजारी सर्व उपस्थित होते. माझा  हा प्रकार पाहून ते माझ्याकडे संशयाने व थोडेफार अचंबित होऊन पाहू लागले हे घडल्यानंतर त्यांनी मला बाजूला घेऊन तुम्ही नक्की काय केले? याबद्दल विचारणा माझ्याकडे केली. परंतु मी केवळ देवीला नमस्कार करून विनंती केली की या राजेंद्राचे गाऱ्हाणे तू ऐक आणि त्यांना मार्ग दे आणि माझी हाक त्या देवीने ऐकली. 

देवीचा कौल मिळताच राजेंद्र मोठमोठ्याने हसू लागले, आनंदी झाले त्यांना या जगातलं सर्वोत्तम पारितोषिक मिळाल्यासारखे त्यांचा अविर्भाव होता. गुरव यांनी म्हणजेच तिकडच्या देवीच्या पुजाऱ्यांनी राजेंद्र यांना शक्तीचा भोग देण्यास सांगून त्यांच्या हाती एक नारळ देऊन अनेक गोष्टींच्या वाटाघाटी केल्या गेल्या. कोकणात या प्रकाराला उठवणी  भागवणी  असे म्हणतात. 

देवीच्या देवळात आम्हाला एक रात्र काढायला लागली कारण दुसऱ्या दिवशी उठवणी भागवणी याचा सोहळा होणार होता परंतु त्या देवळात अनेक खिडक्या होत्या त्यातून थंडगार वारा आत शिरत होता आणि तेथे रात्र काढणं अशक्यप्राय अशी गोष्ट असल्याने आम्ही देवळातच एक छोटीशी शेकोटी करून त्या आधारे तिथे वास्तव्य करण्याचे ठरवले मंदिर जमिनीच्या सपाटीपासून किमान वीस फूट उंचीवर होते. 

रात्री दोनच्या सुमारास मला देवीच्या गाभाऱ्यातून गुलाबी रंगाच्या साडीचा पदर सरकताना दिसला आणि मी देवीला मनोमन नमस्कार केला.  हलकीशी झोप लागल्यानंतर रात्री माझ्या हे लक्षात आलं की कुणीतरी आपल्याला न्याहाळत आहे आपल्यावर नजर आहे मी त्या खिडकीत पाहिले असता एक टक्कल असलेली जाड बांध्याची शक्ती मला खिडकीतून पाहत होती. खरंतर त्या खिडकीतून डोकावून पाहणे अशक्य अशी गोष्ट होती कारण ती खिडकी जमिनीपासून किमान 10 ते 12 फूट उंच होती त्यामुळे त्या खिडकीतून लटकून मला कोणीतरी न्याहाळणे अशक्य असं होतं परंतु ती बहुदा तो देवीचा रक्षक आहे असे समजून मी माझ्या गुरु मंत्राच्या नामस्मरणात गाढ झोपून गेलो.

देवळात जेव्हा हा प्रकार घडला त्या वेळेस तिथे उपस्थित असलेल्या अनिकेत आणि प्रसाद या नावाच्या दोन व्यक्तींनी माझे खूप निरीक्षण केले आणि संपूर्ण विधी पार पडल्यावर ते माझ्याशी संपर्क साधू लागले. मुंबई दरम्यानच्या प्रवासात अनिकेत आणि प्रसाद ह्या दोन व्यक्ती माझ्याशी आळीपाळीने अध्यात्मिक सल्लामसलत करीत राहिले पूर्ण रात्र जागवत आम्ही मुंबई गाठली.

कोकणातून मुंबईत येईपर्यंत तो नारळ जमिनीवर ठेवायचा नाही असे त्या पुजाऱ्यांनी राजेंद्रला आवर्जून सांगितले होते त्यानुसार ते तो नारळ आपल्या जीवापाड सांभाळत मुंबईपर्यंत घेऊन आले आणि आपल्या घरातल्या एका कोपऱ्यात त्या वांगीभुताला स्थान देऊन त्याची रोज यथाशक्ति अर्चना करून स्तुती करू लागले. 

अनेक दिवस झाले परंतु त्यांचे काम काही होईना शेवटी त्यांनी त्याला म्हणजेच नारळातल्या वांगीभुताला जो अदृश्य रुपात होता त्यास शिव्या घालण्यास, वाईट बडबडण्यास सुरुवात केली व ते दिवसेंदिवस नशेच्या आहारी जाऊ लागले. दिवसेंदिवस त्यांची बिघडलेली अवस्था पाहून मला खरोखरच दया आली आणि मी त्यांना आपल्या पद्धतीने सहकार्य करण्याचे ठरविले. त्यानुसार मी रात्री ठरल्याप्रमाणे बारा वाजता तेथे शक्तीला आव्हान करून तिला भोग देण्याचे ठरवून राजेंद्रचे मनोरथ पूर्ण करावे यासाठी संपूर्ण सोहळा योजला होता ठरल्याप्रमाणे सर्व सोहळा पार पाडून मी सकाळी त्यांच्या घरून निघून गेलो.

एके दिवशी राजेंद्र माझ्या घरी आले आणि त्यांनी मला असे सांगितले की तुझ्याकडे आज अनिकेत भेटीला येणार आहे तेव्हा मी त्यांना हे विचारले की माझा पत्ता त्यांना कोणी दिला आणि तुम्हाला कसे कळले त्यावर त्यांनी मला असे सांगितले की मला त्याचा कॉल आला होता आणि तो तुझ्या भेटीसाठी आतुर आहे... 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Hello,

In the year 2000, I went with Rajendra to Konkan for his work. Although he was a great singer, he was suffering and under a lot of pressure. He did not have success in both fame and fortune. According to a householder named Vijay, the two of us had gone to a particular village in Konkan, which is famous for ghost shopping.

He is known as Wangibhut as the protector of the Goddess in the temple, and people come from far and wide to buy it. According to your problems, if Goddess Kaul is found, then her power is her protector, e.g., Eggplant is given to you in a unique coconut. They believe that he fulfills their desires, and many people have given proof (from self-experience) that it is right to some extent.

When Rajendra went to the temple of the Goddess to express his grievances for the sake of fame and fortune, he was rejected by the Goddess, so he became furious and started arguing with the priests/villagers. Seeing his incarnation, I tried to calm him down, but he was not in the mood to listen to anyone. That's how they directly threatened me. Out of our love, I decided to help them.

I looked at the Goddess with one glance and looking up at the sky, commanded Nathan, "Am I right to do this action?" Can I order the Goddess? But since I did not receive any such order, I decided to put it into practice. Within a few minutes, the Goddess agreed to my request.

A total of 18 priests were present in that shrine. What exactly did you do when they took me aside and started looking at me with suspicion and a little bit of amazement? Asked me about it. But I only greeted the Goddess and requested her to listen to Rajendra's groans and give way to them, and the Goddess heard my call.

Rajendra started laughing loudly as soon as he got the word of Goddess, he was happy, he looked like he got the best award in this world. Gurav, the priest of the Goddess Tikad, asked Rajendra to give him power, and coconut was given to him, and many things were negotiated. In Konkan, this type is called Uthavani Bhagwani.

We had to spend one night in the temple of the Goddess because the next day was to be the Uthvani Bhagwani ceremony. Still, there were many windows in the temple through which cold wind was blowing in, and it was almost impossible to spend the night there, so we decided to build a small fire in the temple. Was at least twenty feet above the surface.

Around two in the morning, I saw a pink sari slipping from the Goddess's womb, and I saluted the Goddess. After a light night's sleep, I noticed that someone was watching me. I was looking out of the window. It was impossible to peek through the window because it was at least 10 to 12 feet high from the ground, so no one could hang out of the window and look at me, but I fell asleep in remembrance of my Guru Mantra.

Aniket and Prasad, who were present at the temple when the incident took place, observed me a lot, and after the whole ritual was over, they started contacting me. During the journey between Mumbai, Aniket and Prasad took turns in spiritual consultation with me. We reached Mumbai waking up all night.

The priests had told Rajendra that he did not want to keep the coconut on the ground till he came to Mumbai from Konkan.

Many days passed, but their work was not done, and finally, they started cursing him, that is, the invisible form of coconut eggplant, cursing, and he started getting drunk day by day. Seeing their deteriorating condition day by day, I felt sorry for them and decided to cooperate with them in my way. Accordingly, the whole ceremony was planned to fulfill Rajendra's wish by challenging Shakti there at noon as scheduled at night. After completing all the services as planned, I left his house in the morning.

One day Rajendra came to my house and told me that he was going to visit Aniket today. I asked him who gave him my address, and how did you know?

No comments:

Post a Comment