भाग-१०
(मराठी)
सत्य अनुभव
⚉ भय्यू महाराज
महाराजांच्या प्रथम भेटीत त्यांची जीवनशैली व त्यांचे समाजकार्य मला ठाऊक नव्हते. त्यांच्या सदिच्छा भेटीत त्यांचा शांत व प्रेमळ रुबाबदार स्वभाव दिसला. मधुर वाणी आणि आपुलकीच्या स्नेहाने त्यांनी आमची सगळ्यांचीच मने जिंकली. जणू अनेक वर्ष आमची जुनी ओळख असावी. त्याप्रमाणे त्यांनी आमचे खूप प्रेमाने आदरातिथ्य केले. त्या आधी माझ्या अध्यात्माची कारकीर्द सुरू झालेली होती. आम्ही दोघं एकमेकांना नाथपंथी म्हणून प्रेमाने आलिंगन देऊन भेटलो होतो.
तशीच पुन्हा 2009 मध्ये, माझ्या सहकुटुंब शिष्या समवेत त्यांची पुन्हा सदिच्छा भेट झाली. अध्यात्माच्या समाजकार्याचा त्यांनी मुक्तपणे आमच्याशी संवाद साधला, आणि सूर्योदय आश्रमात येण्यास निमंत्रण दिले. मी पाहिलेले भय्यू महाराज हे सिद्ध सात्विक साधक, समाजसेवक व जिव्हाळा जपणारे, तेजस्वी एक उत्तम माणूस व साधक म्हणून ओळखून होतो.
आपले सोहम भगवती व गृहशोभा मासिक ते नियमित वाचत होते . व त्याबद्दल ते आम्हा सर्वांची पाठराखण करून शाब्बासकीची दोन शब्दही बोलत असत. त्यांच्या विविध ठिकाणी असणाऱ्या बैठकी यांची माहिती एसएमएसद्वारे कळवीत असत. त्यांचे धर्मादित्य व सूर्योदय हे मासिक आम्हाला नियमित पाठवत असत. निरपेक्ष बुद्धीने आमची विचारांची देवाण-घेवाण वेळोवेळी झाली आहे.
त्यांच्या अशा आकस्मिक निधनाने मन केवळ हेलावूनच गेले नाही, तर मनात प्रश्नांचे काहुर माजले. जो इतरांना ज्ञान मार्गदर्शन करू शकतो, त्याने असा अनैसर्गिक विचार करावा, हे मनाला अजूनही पटलेले नाही. खरंतर नाथांचा कधीच अंत होऊ शकत नाही. ते सतत आपल्या अवतीभवती वावरत असतात तरीही त्यांच्या या प्रवासाला माझा साष्टांग नमस्कार.
ते गेल्यावर त्यांच्या गुरु बंधूंचे मिस्कील लिखाण सोशल मीडियावर चक्र रुपी फिरत होते . प्रत्येक जण अध्यात्माला हसू लागला, गुरु बंधूंनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या कारकीर्दीचा साक्षात्कार झाल्यानंतर आपण किती श्रेष्ठ आहोत. याची अनुभूती देत आहोत, असं लिखाणाद्वारे केलेल्या टीकेमुळे वाटत होते. गुरु ज्ञान देतो का तर स्व आत्मपरीक्षण जीव ब्रह्मसेवा व जिवा-शिवाची भेट हे त्यामधले रहस्य जाणून घेण्यासाठी. कोणी समाजसेवा करून कुणी पितृ श्राद्धाचे कार्य करून तर कोणी सहली काढून याची पूर्तता केली असे आहे का?
अनेक लोकांना शिष्यत्व देऊन विकास घडविण्याचा भय्यू महाराजांचा माणुस सप्शेल फोल ठरला. कारण गुरूला शिष्य काय करतो? याचे ज्ञान असते. तर शिष्य गुरूंच्या अंतर्मनाशी एकरूप झालेला असतो. दोघं कितीही दूर असले तरी त्यांच्या अंतर आत्म्यातून संपर्क असतो. असे असताना अनेक शिष्यांना तसेच मान्यवर मंडळींना मंत्रदीक्षा देऊन त्यातील एकाही शिष्याला आपल्या गुरुच्या अंतर्मनात वाकून बघता आले नाही का ? कोणालाही त्यांच्या मनाची झालेली घालमेल विखुरता जाणवली नाही का ?
भय्यू महाराजांचे गुरुबंधू शिष्य व त्यांचे गुरु यापैकी कोणालाही याचा थांगपत्ता लागू नये, याचे राहून राहून अचंबित व नवल वाटते. कोणी उंचावर जायचे कोणी लोकांची त्यांच्या राशीनुसार स्वभावाची चेष्टा करायची. विनोदासाठी सहली काढायच्या, की पितृ श्रद्धा चे कार्य करायचे हे परमेश्वर ठरवितो, की आपला स्वभाव ठरवितो एकाच गुरुच्या ज्ञानान त्यातून निघालेले शिष्य आपला वेगळा असा संसार थाटतात. यासाठी इतिहासातील सुद्धा खूप उदाहरणे देता येईल. तेव्हा ही देह समर्पण होतेच परंतु त्याचे आजचे मार्ग बदललेले आहे तरीही महाराजांनी केलेल्या या निर्णयाचे स्वागत निश्चितच करता येणार नाही या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही त्यांचे शिष्य आता काय लिला दाखवणार आहेत? ते येणारा काळच ठरवेल.
जिथे अनुग्रह येतो, तेथे ग्रह आपली दशा संपवितात असा साईनाथांच्या अधोरेखित ठेवा आहे. तर मग एक नाथपंथी (अनुग्रहित) लोकांच्या राशी घेऊन त्यावर विनोदात्मक चेष्टा करून सिनेतारका व राजकारणी लोकांची वाहवाह मिळवण्यासाठी उंचावर जाऊन बसतो तेव्हा त्याला जमिनीची आठवण होत नाही का?
टीव्ही चॅनल्स हे स्वर्गीय भय्यू महाराजांना स्वयंघोषित म्हणून वारंवार उल्लेखित होते. या चॅनलच्या मंडळींकडे असे कोणते मानपत्र आहे की, त्यामुळे ते एखाद्या साधकाला स्वयंघोषित म्हणून हिणवले जात नसावे. ऐकिवात असलेल्या माहितीप्रमाणे भय्यू महाराजांना भारत सरकारने युवा संत हे मानपत्र दिले होते. याचा चॅनल्सना सोईस्कररित्या विसर पडलेला होता. काही ज्ञानपीठ आतून पदवी ज्योतिष तज्ञ, वास्तुतज्ञ, ज्योतिष पंडित, डॉक्टरेट अशा पदव्या विकल्या जातात. त्यासाठी ज्ञानाची नव्हे अर्थार्जनाची आवश्यकता असते.
तर मग असा पदवीधारक तुमच्यामध्ये सिद्ध प्रमाणित अध्यात्मिक गुरु ठरविला पाहिजे का ? या मुर्खांच्या बाजारात साधनेचे महत्त्व केवळ भोंदूगिरी म्हणून उरलेली आहे. एका चष्माने ते सर्व साधकांकडे पाहत आहे. कोणी म्हणतं भय्यू महाराज साधना करत नव्हते. साधना न करता त्यांना गिफ्टडीड म्हणजे अंतर शक्ती मिळाली होती का ? अन एकाकडून शिजवून आलेली खिचडी ही बाजारात विकायला बसली आहे.
लिहिण्यासारखे खूप आहे, पण सज्ञानी वाचक फार थोडा उरला आहे. आम्ही जीवब्रह्मसेवेचे व्रत घेतले आहे. ते कायम राखून आहोत माझ्या तमाम शिष्य तुल्य गणांकडून, वाचकांकडून, स्नेह्याकडून भय्यू महाराजांना या दोन शब्द रूपाचा अखेरचा दंडवत आदेश!
सृजनहो या घटनेमुळे अध्यात्माचे वाभाडे काढू नका. अध्यात्माकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून त्याचा सुप्तपण ज्ञानी संदेश लोकांपर्यंत पोहचवा. ही हात जोडून आपणा सर्वांना कळकळीची विनंती.
अध्याय-१०
( हिन्दी )
सत्य अनुभव
⚉ भय्यू महाराज
महाराजा की पहली यात्रा में, मैं उनकी जीवन शैली और उनके सामाजिक कार्यों को नहीं जानता था। उनकी सद्भावना यात्रा ने उनके शांत और प्रेमपूर्ण स्वभाव को दिखाया। उन्होंने अपनी मधुर आवाज और स्नेह से हम सभी का दिल जीत लिया। ऐसा लगता है जैसे हम सालों से स्नेही रहे हैं। इस तरह उन्होंने हमारे साथ बहुत प्यार से पेश आए। इससे पहले, मेरा आध्यात्मिक कैरियर शुरू हो चुका था। हम दोनों नाथजी के रूप में एक दूसरे से प्यार से गले मिले।
2009 में भी, वे मेरे परिवार के शिष्यों के साथ अच्छे विश्वास में मिले। उन्होंने आध्यात्मिकता के सामाजिक कार्य पर हमारे साथ स्वतंत्र रूप से बातचीत की, और हमें सूर्योदय आश्रम में आने के लिए आमंत्रित किया। भय्यू महाराज, जिन्हें मैंने देखा था, एक सिद्ध सात्विक साधक, एक सामाजिक कार्यकर्ता और एक देखभाल करने वाले, प्रतिभाशाली, महान व्यक्ति और साधक के रूप में जाने जाते थे।
वे अपनी सोहम भगवती और गृहशोभा पत्रिकाओं को नियमित रूप से पढ़ते थे। और वह हम सभी का अनुसरण करता थे और शबाबस्की के दो शब्द कहता थे। वह एसएमएस के माध्यम से अपने विभिन्न स्थानों पर आयोजित बैठकों के बारे में सूचित करता थे। उनकी पत्रिकाएँ धर्मादित्य और सूर्योदय हमें नियमित रूप से भेजते थे। हमारे विचारों का समय-समय पर पूर्ण बुद्धि के साथ आदान-प्रदान किया गया है।
उनके असामयिक निधन ने न केवल दिमाग हिला दिया, बल्कि कइ सवाल भी खड़े किए। मन अभी भी आश्वस्त नहीं है कि जो दूसरों को ज्ञान के लिए मार्गदर्शन कर सकता है, उसे अस्वाभाविक रूप से सोचना चाहिए। वास्तव में, नाथन कभी भी समाप्त नहीं हो सकते है। वे लगातार हमारे आसपास हैं, मैं उनकी यात्रा को सलाम करता हूं।
जब उनका निधन हो गया, तो उनके गुरु भाइयों के शरारती लेख सोशल मीडिया पर घूम रहे थे। सभी लोग आध्यात्मिकता पर हँसने लगे, कि गुरु भाईयों को अपनी पुरानी यादों के कैरियर का एहसास होने के बाद हम कितने महान हैं। हम यह अनुभव कर रहे हैं, यह लेखन द्वारा की गई आलोचना से प्रतीत होता है। यदि गुरु ज्ञान देता है, तो आत्म-परीक्षण उनके बीच के रहस्य को जानने के लिए जीव ब्रह्मसेवा और जीव-शिव का उपहार है। क्या यह सच है कि किसी ने सामाजिक कार्य करके यह किया है, किसी ने पितृ श्राद्ध का काम किया है और किसी ने इसे पूरा करने के लिए यात्रा निकाली है?
भय्यू महाराजने कई लोगों को शिष्यत्व देकर उनके विकास के लिए अंतर्मुख बनाया था। क्योंकि शिष्य गुरु के साथ क्या करता है? इसका ज्ञान है। तो गुरु के अंतर्ज्ञान से शिष्य एक है। कोई फर्क नहीं पड़ता कि दोनों कितने अलग हैं, उनकी दूरी आत्मा से है। ऐसी स्थिति में, कई शिष्यों के साथ-साथ गणमान्य व्यक्तियों को मंत्र देने से, क्या उनमें से कोई भी अपने गुरु की ओर देखने में सक्षम नहीं हो सकता है? क्या किसी ने उनके मन के विघटन को महसूस नहीं किया?
भय्यू महाराज के गुरुबंधु शिष्य और उनके गुरु को उनमें से किसी का पता नहीं लगाना चाहिए। कुछ ऊंचे चले जाते, कुछ राशिपर लोगो के स्वभाव अनुसार लोगों का मजाक बनाते। यह भगवान पर निर्भर है कि वे हास्य के लिए यात्रा करें, या पितृ श्राद्ध का कार्य करें, या हमारे स्वयं के स्वभाव को तय करें। इसके लिए इतिहास में कई उदाहरण हैं। भले ही यह निकाय आत्मसमर्पण कर दिया गया था, लेकिन इसका मार्ग आज बदल गया है, महाराज द्वारा किए गए इस निर्णय का स्वागत नहीं किया जा सकता है। इसका समर्थन नहीं किया जा सकता है। उनके शिष्य अब क्या करने जा रहे हैं? केवल समय ही बताएगा।
साईनाथ के सत्यवचन यह है कि जहां अनुग्रह है, वहां ग्रह अपनी स्थिति समाप्त कर देते हैं। इसलिए जब कोई नाथपंथी (कृपापात्र) व्यक्ति लोगों कि राशी स्वभावको ले के उसका मजाक बनाया जाता है और लोगों की वाहवाही पाने के लिए स्वयं को उचाई पर बैठता है, तो क्या उसे जमीन की याद नहीं आती?
टीवी चैनलों ने अक्सर दिवंगत भय्यू महाराज को स्वघोषित बताया। इस चैनल की मंडलियों में क्या प्रमाण हैं, ताकि किसी साधक को स्व-घोषित होने का ब्रांड न बनाया जाए? खबरों के अनुसार, भय्यू महाराज को भारत सरकार द्वारा युवा संत की उपाधि दी गई थी। चैनलों द्वारा इसे आसानी से भुला दिया गया। ज्योतिष, वास्तुकार, ज्योतिषी, डॉक्टरेट जैसे डिग्री कुछ ज्ञानपीठ से बेचे जाते हैं। इसके लिए धन की आवश्यकता होती है, ज्ञान की नहीं।
तो क्या ऐसे स्नातक को आपके बीच एक सिद्ध आध्यात्मिक गुरु होना चाहिए? इन बेवकूफों के बाजार में उपकरण का महत्व केवल एक धोखा के रूप में रहता है। वह एक तमाशे के माध्यम से सभी साधकों को देख रहा है। कुछ कहते हैं कि भय्यू महाराज साधना नहीं कर रहे थे। क्या उन्हें बिना तपस्या के गिफ्ट डीड मिली? एक द्वारा पकाई गई खिचड़ी बाजार में बिक्री के लिए है।
लिखने के लिए बहुत कुछ है, लेकिन समझदार पाठक बहुत कम बचा है। हमने जीवब्रह्मसेवा का व्रत लिया है। हम इसे बनाए रख रहे हैं। मेरे सभी शिष्यों से, पाठकों से, स्नेहा से, भय्यू महाराज से, इन दो शब्दों का अंतिम प्रणाम!
इस घटना के कारण आध्यात्मिकता को मालिन मत करो। आध्यात्मिकता के बारे में सकारात्मक दृष्टिकोण अपनाएँ और लोगों को इसके अव्यक्त ज्ञान से अवगत कराएँ। हाथ जोड़कर आप सभी से हार्दिक अनुरोध है ।
Episode-10
(English)
True Experience
No comments:
Post a Comment