Friday, 19 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-11

भाग-११

(मराठी) 

सत्य अनुभव 

रुपेशचे ओळखीचे एक रिटायर्ड पोलीस अधिकारी मुंबईला राहत होते. त्यांच्या पत्नी व मुलांची समस्या होती.  मला त्यांनी त्यांच्या घरी येण्याची विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन मी  त्यांच्या घरी गेलो. त्यांच्यावर असलेले संकट माझ्या लक्षात आले होते. मी त्यावर त्यांना नवनाथ याग करण्याचा सल्ला दिला. तो त्याने मान्य केला त्यावर त्यांना चांगलाच फरक पडला. मुलांची लग्न झाली व इतर समस्यांचे निराकारण झाले. 

विशेष म्हणजे त्या काळात त्यांच्या घरी दुपारी दोन वाजता एक सहा फुटी स्त्री-पुरुष बांधण्याची परंतु तृतीयपंथी नसलेली व्यक्ती आली. मी खूप लांबून आलोय काही आहे का?  तर पोलिस अधिकाऱ्याची पत्नी म्हणाली, काही नाही. हसत ती व्यक्ती म्हणाली, काही नाही कसं तुमच्याकडे तो भस्म आहे ना. भांबावलेल्या पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीने धाडकन दरवाजा लावून घेतला. आपण चुकलो म्हणून त्यांनी दरवाजा पुन्हा उघडला तर दारासमोर नव्हे तर पूर्ण इमारतीत ती व्यक्ती नव्हती. मला हा सर्व प्रकार नाथ परीक्षेचा वाटला. परंतु आंधळ्याला हिऱ्याची काय किंमत असे म्हणून मी त्या प्रकरणाकडे जाणून बुजून कानाडोळा केला.

रुपेश ने एका पठाणाकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती व त्यासाठी त्याने रुपेशकडे तगादा लावला होता. शेवटी रक्कम मिळत नसल्याने पठाणाने आपली तरा दाखवण्यास सुरुवात केली.  कहर म्हणजे तो आता रुपेशच्या तरुण बहिणीवर घसरला. तीच्या बद्दल तो नको ते बोलायला लागला. एका संध्याकाळी रुपेश माझ्याकडे आला. बोलता बोलता तो रडू लागला. पठाण माझ्या आई बहिणींना वाटेल तसे बोलतोय. त्यांनी मला उद्याची मुदत दिली आहे. जर उद्या रक्कम नाही दिली तर तुझ्या बहिणीला वापरून विकून टाकीन मी म्हटलं मी त्या पठाणाशी बोलू का? त्यावर रुपेश हो! असे म्हणाला, पठाणाला फोन लावला व मी त्या रुपेशच्या परिस्थितीबाबत काही सांगणार.  इतक्यात रुपेश हे नाव ऐकल्यावर तो खवळला व बेछूट शिव्यांचा भडीमार करु लागला.

Image by prettysleepy1 from Pixabay 

मलाही रहावेना, मीही त्याला आव्हान दिले. की तू एका बापाचा असशिल तर उद्या पैसे वसूल करून दाखव.  रुपेशचे धाबे दणाणले होते. कारण पठाण अधिकच खवळला होता. मी माझ्याकडून रुपेशला धीर दाखवला आणि काही काळजी करू नकोस, आपल्यासोबत  नाथ आहेत. मी रुपेशला त्याच्या घरी पाठवून देत सांगितले, की उद्या घराच्या बाहेर पडू नकोस व स्वतःजवळ सिद्ध विभूती ठेव. 

त्या रात्री त्या उर्मट व लिंगपिसाट पठाणाला धडा शिकवायचे ठरवले. रुपेशच्या आई, बहिणीबद्दल केलेली अपशब्द मला राहून राहून आठवत होते. त्यामुळे मन पेटून उठले होते व त्या रात्री मी नाथांचा आदेश घेऊन पठाणाला धडा शिकवला होता. पठाण पुढील 15 दिवस बिछान्यावर होता.  त्यानंतर तो रुपेशच्या घरी गेला .झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आईला वाकून नमस्कार केला.  बहिणीकडून रक्षाबंधन करून घेतली. व म्हणाला  मै उस रात किस आदमी से बात की? वो कोन है?  मुझे उनसे मिलना है?  मैं उस रात को कैसे बिमार पड गया कुछ मालूम नही !  वो मेरे रिश्तेदार लगते है,  रुपेश मिस्किलपणे पठाणाशी बोलत होता.  कारण,  पठाण पूर्ण मवाळ झाला होता.

Thursday, 18 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-10

भाग-१०

(मराठी) 

सत्य अनुभव 

भय्यू महाराज

महाराजांच्या प्रथम भेटीत त्यांची जीवनशैली व त्यांचे समाजकार्य मला ठाऊक नव्हते.  त्यांच्या सदिच्छा भेटीत त्यांचा शांत व प्रेमळ रुबाबदार स्वभाव दिसला. मधुर वाणी आणि आपुलकीच्या स्नेहाने त्यांनी आमची सगळ्यांचीच मने जिंकली.  जणू अनेक वर्ष आमची जुनी ओळख असावी. त्याप्रमाणे त्यांनी आमचे खूप प्रेमाने आदरातिथ्य केले.  त्या आधी माझ्या अध्यात्माची कारकीर्द सुरू झालेली होती. आम्ही दोघं एकमेकांना नाथपंथी म्हणून प्रेमाने आलिंगन देऊन भेटलो होतो.

तशीच पुन्हा 2009 मध्ये, माझ्या सहकुटुंब शिष्या समवेत त्यांची पुन्हा सदिच्छा भेट झाली. अध्यात्माच्या समाजकार्याचा त्यांनी मुक्तपणे आमच्याशी संवाद साधला, आणि सूर्योदय आश्रमात येण्यास निमंत्रण दिले.  मी पाहिलेले भय्यू महाराज हे सिद्ध सात्विक साधक, समाजसेवक व जिव्हाळा जपणारे, तेजस्वी एक उत्तम माणूस व साधक म्हणून ओळखून होतो.



आपले सोहम भगवती व गृहशोभा मासिक ते नियमित वाचत होते . व त्याबद्दल ते आम्हा सर्वांची पाठराखण करून शाब्बासकीची दोन शब्दही बोलत असत. त्यांच्या विविध ठिकाणी असणाऱ्या बैठकी यांची माहिती एसएमएसद्वारे कळवीत असत. त्यांचे धर्मादित्य व सूर्योदय हे मासिक आम्हाला नियमित पाठवत असत.  निरपेक्ष बुद्धीने आमची विचारांची देवाण-घेवाण वेळोवेळी झाली आहे.

त्यांच्या अशा आकस्मिक निधनाने मन केवळ हेलावूनच गेले नाही, तर मनात प्रश्नांचे काहुर माजले. जो इतरांना ज्ञान मार्गदर्शन करू शकतो,  त्याने असा अनैसर्गिक विचार करावा, हे मनाला अजूनही पटलेले नाही. खरंतर नाथांचा कधीच अंत होऊ शकत नाही.  ते सतत आपल्या अवतीभवती वावरत असतात तरीही त्यांच्या या प्रवासाला माझा साष्टांग नमस्कार.

ते गेल्यावर त्यांच्या गुरु बंधूंचे मिस्कील लिखाण सोशल मीडियावर चक्र रुपी फिरत होते . प्रत्येक जण अध्यात्माला हसू लागला, गुरु बंधूंनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या  कारकीर्दीचा साक्षात्कार झाल्यानंतर आपण किती श्रेष्ठ आहोत.  याची अनुभूती देत आहोत, असं लिखाणाद्वारे केलेल्या टीकेमुळे वाटत होते. गुरु ज्ञान देतो का तर स्व आत्मपरीक्षण जीव ब्रह्मसेवा व जिवा-शिवाची भेट हे त्यामधले रहस्य जाणून घेण्यासाठी. कोणी समाजसेवा करून कुणी पितृ श्राद्धाचे कार्य करून तर कोणी सहली काढून याची पूर्तता केली असे आहे का?

अनेक लोकांना शिष्यत्व देऊन विकास घडविण्याचा भय्यू महाराजांचा माणुस सप्शेल फोल ठरला. कारण गुरूला शिष्य काय करतो? याचे ज्ञान असते. तर शिष्य गुरूंच्या अंतर्मनाशी एकरूप झालेला असतो. दोघं कितीही दूर असले तरी त्यांच्या अंतर आत्म्यातून संपर्क असतो. असे असताना अनेक शिष्यांना तसेच मान्यवर मंडळींना मंत्रदीक्षा देऊन त्यातील एकाही शिष्याला आपल्या गुरुच्या अंतर्मनात वाकून बघता आले नाही का ?  कोणालाही त्यांच्या मनाची झालेली घालमेल विखुरता जाणवली नाही का ?
 
भय्यू महाराजांचे गुरुबंधू शिष्य व त्यांचे गुरु यापैकी कोणालाही याचा थांगपत्ता लागू नये, याचे राहून राहून अचंबित व नवल वाटते. कोणी उंचावर जायचे कोणी लोकांची त्यांच्या राशीनुसार स्वभावाची चेष्टा करायची.  विनोदासाठी सहली काढायच्या, की पितृ श्रद्धा चे कार्य करायचे हे परमेश्वर ठरवितो,  की आपला स्वभाव ठरवितो एकाच गुरुच्या ज्ञानान त्यातून निघालेले शिष्य आपला वेगळा असा संसार थाटतात. यासाठी इतिहासातील सुद्धा खूप उदाहरणे देता येईल. तेव्हा ही देह समर्पण होतेच परंतु त्याचे आजचे मार्ग बदललेले आहे तरीही महाराजांनी केलेल्या या निर्णयाचे स्वागत निश्चितच करता येणार नाही या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही त्यांचे शिष्य आता काय लिला दाखवणार आहेत?  ते येणारा काळच ठरवेल.

जिथे अनुग्रह येतो,  तेथे ग्रह आपली दशा संपवितात असा साईनाथांच्या अधोरेखित ठेवा आहे.  तर मग एक नाथपंथी (अनुग्रहित) लोकांच्या राशी घेऊन त्यावर विनोदात्मक चेष्टा करून सिनेतारका व राजकारणी लोकांची वाहवाह मिळवण्यासाठी उंचावर जाऊन बसतो तेव्हा त्याला जमिनीची आठवण होत नाही का?

टीव्ही चॅनल्स हे स्वर्गीय भय्यू महाराजांना स्वयंघोषित म्हणून वारंवार उल्लेखित होते.  या चॅनलच्या मंडळींकडे असे कोणते मानपत्र आहे की, त्यामुळे ते एखाद्या साधकाला स्वयंघोषित म्हणून हिणवले जात नसावे. ऐकिवात असलेल्या माहितीप्रमाणे भय्यू महाराजांना भारत सरकारने युवा संत हे मानपत्र दिले होते. याचा चॅनल्सना सोईस्कररित्या विसर  पडलेला होता. काही ज्ञानपीठ आतून पदवी ज्योतिष तज्ञ, वास्तुतज्ञ,  ज्योतिष पंडित,  डॉक्टरेट अशा पदव्या विकल्या जातात. त्यासाठी ज्ञानाची नव्हे अर्थार्जनाची आवश्यकता असते. 

तर मग असा पदवीधारक तुमच्यामध्ये सिद्ध प्रमाणित अध्यात्मिक गुरु ठरविला पाहिजे का ? या मुर्खांच्या बाजारात साधनेचे महत्त्व केवळ भोंदूगिरी म्हणून उरलेली आहे. एका चष्माने ते सर्व साधकांकडे पाहत आहे. कोणी म्हणतं भय्यू महाराज साधना करत नव्हते. साधना न करता त्यांना गिफ्टडीड  म्हणजे अंतर शक्ती मिळाली होती का ? अन एकाकडून शिजवून आलेली खिचडी ही बाजारात विकायला बसली आहे.

लिहिण्यासारखे खूप आहे, पण सज्ञानी वाचक फार थोडा उरला आहे. आम्ही जीवब्रह्मसेवेचे व्रत घेतले आहे. ते कायम राखून आहोत माझ्या तमाम शिष्य तुल्य गणांकडून,  वाचकांकडून, स्नेह्याकडून भय्यू महाराजांना या दोन शब्द रूपाचा अखेरचा दंडवत आदेश!

सृजनहो या घटनेमुळे अध्यात्माचे वाभाडे काढू नका. अध्यात्माकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून त्याचा सुप्तपण ज्ञानी संदेश लोकांपर्यंत पोहचवा.  ही हात जोडून आपणा सर्वांना कळकळीची विनंती.

Wednesday, 17 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-9

भाग-९

(मराठी) 

सत्य अनुभव 

निकीने माझ्याकडून बीजमंत्र घेतल्यापासून त्याला प्रभावी व उपयुक्त असे अनुभव आले होते. त्यामुळे त्याचा माझ्यावरचा विश्वास द्विगुणित झाला होता.  त्याने मला त्याच्या मामेभावाच्या भेटीसाठी इंदोरला आपण एकत्र जाऊ या असे सांगितले.  त्याचा मामेभाऊ म्हणजे युवा संत कै. श्री भय्यू महाराज हे होय. आम्ही चौघे थोडेफार पैसे एकत्र करून त्यांच्या सदिच्छा भेटीला इंदोर येथे गेलो. भेटीसाठी व्याकूळ निकी आपल्या भावाला आम्हाला लवकर भेट दे, म्हणून फोनवरून विनवणी करीत होता. मेरे गुरु भी नाथपंथी है. 

काही वेळाने आम्हाला महाराजांकडून बोलावणे आले. मी निकीला म्हटलं,  महाराज आपल्याशी आता काही बोलणार नाही. ते आपल्याला संध्याकाळी भेटायला सांगतील. असं का?  निकी थोडा अचंबित झाला. कारण भय्यू महाराज असे कोणाबरोबर वागत नाही. पण माझे संकेत खरे ठरले .

श्री भय्यू महाराजांनी आम्हाला संध्याकाळी भेट घेण्यास बोलावले.  आराम करण्यासाठी जवळच लॉज होता. आम्ही त्यात महाराजांच्या आदेशाने विश्रांतीसाठी गेलो.  लॉजवर गेल्यावर माझ्यासोबतच्या मंडळींना झालेल्या प्रकाराबद्दल जाणून घ्यायचे होते . पण मी ते त्यांना सांगण्यास नकार दिला.  त्यावर आमचे प्रश्न तुम्ही सोडवा, असा आग्रह ते माझ्याजवळ करू लागले. मी म्हटलं ठीक आहे, मी एका शक्तीचे आवाहन करतो ती येईल. आल्यावर तुम्हाला त्याचे संकेत मिळतील. ज्याचे नाव घेईन, त्यांनी आपला प्रश्न मांडावा म्हणजे ती तुमच्या कानात तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. त्यावर सर्व खुश झाले व आपले डोळे बंद करून संकेताची वाट पाहू लागले. 

Photo by fauxels from Pexels

मी नाथांच्या आदेशाने शक्तीचे आव्हान केले आणि काही काळातच ती शक्ती आपल्या अविर्भावात अदृश्य स्वरूपात प्रकट झाली. शक्तीच्या विशिष्ट आवाजामुळे लॉज मधल्या व्यक्ती आमच्या खोलीत डोकावून पाहत होत्या. माझ्यासोबतच्या मंडळींना त्या शक्तीची चाहूल बऱ्यापैकी लागली आणि प्रत्येक जण स्तब्ध झाले होते शक्तीशी माझे गुप्त संभाषण झाल्यावर मी माझ्या सोबतीना प्रत्येकाचे नाव विचारल्यावर त्यांनी आपला प्रश्न मनात शक्तीला विचारावा असे सांगितले आणि मी ठरल्याप्रमाणे प्रत्येकाचे नाव घेण्यास सुरुवात केली . त्यातील पहिली व्यक्ती पूर्णपणे स्तंभित झाली. दुसरी चक्क झोपली. तिसरी थरथरायला लागली. माझी मेहनत पाण्यात गेली. मला कपाळाला हात लावण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

मी शक्तीचे आभार मानून तिची माफी मागितली आणि वरील सर्व मंडळींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. पुढे त्या सर्वांना त्याचा मनःस्ताप झाला. काही काळ आराम केल्यावर आम्ही सर्व महाराजांना भेटायला गेलो. तिथे सर्वजण आपली गाऱ्हाणी मांडत होते त्यावर महाराजांनी त्यांना योग्य तो सल्ला देऊन उपकृत केले.

खरंतर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने भेटणार होतो. परंतु या नीकीने मला त्रास दिला.  भय्यू महाराजांनी मला आलिंगन देऊन वरील खेद व्यक्त केला. आपल्यासारखे साधक लोकांच्या जीव ब्रह्म सेवेसाठी हवे आहे. आपण आपले कार्य असेच पुढे सुरू ठेवा. माझी गरज लागली तर मी सदैव मदत करीन.  भय्यू महाराज फार आपुलकीने माझ्याशी बोलत होते. नंतर त्यांनी आमचा चांगला पाहुणचार केला व आम्ही सर्व परतीच्या मार्गावर लागलो काही सुखद अनुभव घेऊन......

Tuesday, 16 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-8

भाग-८

(मराठी) 


सत्य अनुभव 


एका चंद्रग्रहणात मी व माझे सहकारी एका अज्ञात स्थळी ध्यान धारणेला बसण्याचा विचार करीत होतो. एका गुफेत शिवाची प्राचीन पिंडी होती, त्यासमोर बारीक मिणमिणती समई लावली होती. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता. गुफेच्या अंगणात किमान आठ ते दहा माणसं तोंडावर पांघरून घेऊन झोपली होती. मी आदेश म्हणत शिव मंदिरात प्रवेश केला. शिवपिंडीसमोर गुरूंच्या आदेशावरून शिवाची संमती घेतल्यानंतर शिवमंदिरात मी व माझे सहकारी साधनेला बसलो, आणि काही क्षणातच माझ्यासमोर एक अज्ञात शक्ती येऊन बसली, तीने मला चल उठ! असा हुकूम केला. त्यावर मी तर इथून उठणार नाहीच व माझे सहकारी ही उठणार नाही. जर मला व माझ्या सहकाऱ्यांना कोणतीही इजा झाली तर गाठ माझ्याशी आहे, कारण या ठिकाणी मी नाथांचा आदेश घेऊन बसलो होतो असे मी सांगितले व माझ्या समोरील अज्ञात शक्ती गायब झाली या सर्व गोष्टीचा ठामपत्ता माझ्या सहकाऱ्यांना नव्हता. कारण त्यांनी जप साधनेला सुरुवात केली होती. साधारण दोनच्या सुमारास अंदाजे एक वयोवृद्ध व्यक्ती (स्त्री) शिवमंदिरात झाडू घेऊन उभ्याने झाडू मारत होती हा आवाज मी व माझ्या सहकार्यांनी ऐकला.


खरं तर 2 वाजता तिथे झाडू मारण्याचा प्रश्नच नव्हता. झाडू मारुन झाल्यावर त्या शक्तीने शिवपिंडीसमोर नमस्कार केला व क्षणात गायब झाली. या सर्व गोष्टींची चाहूल आम्हा सर्वांना जाणवत होती. अशाप्रकारे अनेक अनुभव आम्ही सर्वजण घेत होतो. आमची साधना उत्तम प्रकारे झाली व एकेकजण साधनेवरून उठू लागले. सुमारे सव्वातीन वाजता आम्ही सर्वांनी किमान अडीच तास साधना केली. गुहेच्या बाहेर अंगणात आल्यावर डोक्यावरून पांघरूण घेतलेली व्यक्ती? तिथे नव्हती.  रात्री बाराची वेळ - शिवमंदिर - गुहेच्यावर - ग्रेव यार्ड - चंद्रग्रहण - पौर्णिमा गुहेच्या मागच्या बाजूला डाव्या हाताला स्मशान असा उत्तम अनन्य योग साधून आला होता. साडेतीन वाजता आम्ही ती गुफा सोडली व परतीचा प्रवास केला. सोबत गोड आठवणी घेऊन......


Photo by Artem Beliaikin from Pexels

निशाने त्यावेळी माझ्याकडे एक असं प्रकरण आणलं की, त्यावेळी श्री. अबक पालक मंत्री होते. ते व त्यांची पत्नी नियमित सद्गुरु गगनगिरी महाराजांकडे जात असे. परंतु श्रीमान यांच्या मोठ्या मुलाची तब्येत अचानक ढासळली व तो बिछान्यावर तो खीळला. अनेक डॉक्टरी उपाय करूनही गुण येत नव्हता. बहुदा हे प्रकरण बाहेरच्या बाधेचे असावे असा त्यांना दाट संशय होता. म्हणून त्यांनी मंत्री फेम श्रीयुत दिनकर या पुरोहिताकडून आपल्या मुलाबद्दलचे असे गार्‍हाणे मांडले.


श्री दिनकर यांनी तुमच्या मुलाला करणी बाधा झाली आहे असे सांगितले, त्यावर खर्च म्हणून मंत्री महोदयाकडून सव्वा लाखाची रक्कम घेतली. (आताचे सव्वा कोटी)  तुम्ही निश्चिंत रहा तुमचा मुलगा ठीक होईल. अशी हमी दिली व विशिष्ट दिवस ठरवून मंत्र्याच्या घरी नवचंडी याग सुरू झाला. एका बाजूला मंत्री महोदय यांचा मुलगा बिछान्यावरून 3 फूट उंच उडू लागला त्यावर घरचे सर्व घाबरले. महाराज,  हे काय चालले आहे? असा सवाल केल्यानंतर पुरोहित यांनी त्यांच्या अंगातील शक्ती निघते आहे. अशी स्वयंघोषित घोषणा केली. सर्व सोहळा पार पाडून तुमचा मुलगा आता ठीक आहे काळजी करू नका. असा आधार देऊन ते आपल्या घरी परतले.


ही सर्व हकीकत निशाने जशीच्या तशी मला सांगितली. मी श्री दिनकर यांना चांगला ओळखत होतो. कारण ते एक उत्तम दशग्रंथी ब्राह्मण होते.  परंतु करणी बाधा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का ? असा सवाल मला पडला,  म्हणून मी निशा यांना श्री दिनकर यांनी चुकीची केले आहे असे सांगितले.


काही दिवसांनी निशाकडून मला निरोप आला की, तुम्हाला मंत्रीमहोदयांनी व श्री दिनकर यांनी विनंती करून बोलावले. त्यावर मी का असा प्रश्न केला?  त्यावेळेस निशा म्हणाली श्री दिनकर हे गेल्या महिनाभर  अंथरुणाला खिळून आहे आणि मंत्री महोदय यांचा मुलगा आहे तसाच आहे . त्यात कोणतेही सुधारणा नाही असे सांगितले.

मला इतर कामामुळे कोणाकडे जाणे शक्य नव्हते व तीन दिवसांनी निरोप आला की श्री दिनकर यांचा मृत्यू झाला आणि काही कालावधीतच मंत्रीमहोदयाच्या मुलाचाही मृत्यू झाला.


माझ्या साधना काळात अनेक समस्या व अध्यात्मिक चमत्कार एकमेकांच्या हातात हात घालून चालत होत्या.  कधीतरी मरणापेक्षा ही अनंत यातना होत होत्या.  तर कधी परमेश्वराचे माझ्यावर असलेल्या प्रेमाने मी भारावून जात असे नियमित साधना हीच माझी जमेची बाजू होती. माझ्या सोबत असणाऱ्या मंडळीबरोबर अध्यात्म या विषयावर तासनतास चर्चा होत असे.

Monday, 15 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-7

भाग-७

(मराठी) 

सत्य अनुभव 


Photo by Josh Hild from Pexels


बोईसरला मी एकाकडे वास्तू परीक्षणासाठी गेलो होतो. त्यावेळेस तिथे सुर्वे यांची ओळख झाली. आपल्या घरगुती प्रश्नांमुळे ते त्रस्त झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात सोन्याच्या अलंकाराची डाय बनविणारा उत्तम कारागीर म्हणून सुर्वे प्रख्यात होते. परंतु गेली काही वर्षे त्यांना काम मिळत नव्हते. सुर्वे व त्यांच्या पत्नीला सौ. लताच्या  घरी नवनाथांच्या यागाच्यावेळी बोलाविले त्यांच्याकडून यज्ञात आहुती देऊन त्यांना उपकृत केले. त्यानंतरच्या भेटीमध्ये श्री व सौ सुर्वे यांच्या चूका निदर्शनास आणून दिल्या. एक दिवस ठरवून त्यांच्याकडे वास्तुपरीक्षणास गेलो. समुद्रकिनारी असलेला त्यांचा उत्तम बंगला होता. त्यांच्या घरी वास्तुपरीक्षणाला आल्यानंतर मला तेथील ठळक मुद्दे कळले.


श्री. सुर्वे यांच्या बेडरुमच्या खिडकीतून रात्री बारा  नंतर एका अज्ञात शक्तीचे श्री सुर्वे यांना बोलावणे येत असे. त्यांच्या नावाने ती शक्ती त्यांना हाका मारत असे. सुरुवातीला आपली कुणीतरी थट्टा करीत आहे. असे सुर्वेना  वाटत होते. परंतु अनेक दिवसापासून त्यांची खात्री झाली. हा भयानक प्रकार असून आपण यासाठी असमर्थ आहोत हे कळल्यावर त्या दिवसापासून सुर्वे व त्यांचे कुटुंबीय बेडरूममध्ये झोपत नसे.


हॉलच्या एका कोपऱ्यात सोफा होता व त्या सोफ्यावरती बसलेल्या माणसाला आपले कुणीतरी पाय खेचते आहे. अशी सत्य जाणीव होत असे त्यामुळे रात्रीचे जागरण व सकाळची झोप असा त्यांचा दिनक्रम झाला होता.

सुर्वेंची मुलं बिथरली होती. परंतु पत्नी मात्र खंबीर असल्यामुळे या सर्व समस्येला तोंड द्यायचे तिने ठरविले. मी माझ्या शिष्याला त्या सोफ्यावर बसण्यास सांगितले,  तेव्हा त्याला आपले कुणीतरी पाय खेचते आहे असे जाणवले.


वास्तूचे पूर्ण परिक्षण करून मी त्या सोफ्यावर जाऊन बसलो.  मलाही तो अनुभव घ्यायचा होता, परंतु काही क्षणातच कोणी अज्ञात शक्तीने माझ्या पायाला पकडून नमस्कार केल्याचे मला जाणवले. आणि मी तो नमस्कार माझ्या सद्गुरू पर्यंत पोहोचवला . आता मला सर्व चित्र स्पष्ट दिसत होते.  यातून तुम्हाला 100% बाहेर काढीन असे आश्वासन मी सुर्वे यांना दिले.


सुर्वेला वास्तुबंधन व दरमहा नवनाथ हवन असे सहा महिने करावे लागेल असे सांगितले. परंतु एवढा खर्च कसा करावा असा प्रश्न होता? त्यावर आपले पहिले हवन झाल्यावर पुढची पाच महिन्याची हवने आपोआप होतील. असा मी त्यांना शब्द दिला वास्तु बंधन व तांत्रिक क्रिया केल्यावर श्रीयुत सुर्वे याना त्याच्या दुसऱ्या दिवशी नेपाळहून एक पहिली ऑर्डर आली सुर्वे यांनी मला तात्काळ फोन करून ही खुशखबर सांगितली. अनेक वर्ष दुश्मनाप्रमाणे वागणारा त्यांचा सख्खा मेव्हणा तिसऱ्या दिवशी नवीन ऑर्डर घेऊन आला व सुर्वेकडे माफी मागितली.  माझ्याकडून आज पर्यंत जे काही चुकले आहे त्याबद्दल मला माफ करा असा दिनक्रम महिनाभर सुरू होता .  महिन्याभराने मी दुसरे नवनाथ हवन करण्यास सुर्वेन कडे गेलो.  लांबचा प्रवास असल्याने  सुर्वेच्या  घरीच  विश्रांती केली.


रात्री मला दोन वाजता नाथांचा आदेश आला व मी माझ्या  शिष्याला सुर्वे यांना बोलावण्यास सांगितले. त्यावर सुर्वे धावत माझ्याकडे आले व म्हणाले महाराज काय झाले एवढ्या रात्री का बोलावले?  त्यावर मी त्यांना सांगितले की पुढील एक महिनाभर तुमच्या पत्नीला घराच्या बाहेर पाठवू नका. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. मी पुन्हा पुन्हा सांगून सतर्कतेचा इशारा दिला. मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही मी माझ्या पत्नीची योग्य काळजी घेईन. असे सांगितले. सकाळी सुर्वेना मी पुन्हा दक्षतेचा इशारा दिला त्यांनी त्यावर होकार दर्शविला.


दुसर्‍या दिवशी आम्ही आमच्या घरी निघालो. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सौ. सुर्वे यांनी मला फोन केला,  महाराज मला तुम्हाला भेटायचे आहे . त्यावर त्यांना येऊ नका, असे मी सांगितले व त्याच दुपारी चार वाजता मला नाथांचा पुन्हा आदेश आला व माझ्या घराचा दरवाजा ठोठावला गेला.


मी सुर्वे यांना फोन केला की वहिनी कशा आहेत? त्यावर त्यांनी सांगितले की त्या निघून गेल्या, मला प्रथम नवरा बायकोमध्ये भांडण झाले असे वाटले म्हणून मी त्यांना म्हटले तुम्ही पुन्हा भांडलात का ?


यावर त्यांनी मला सांगितले की वहिनी या जगात नाही कारण मी नको सांगूनही सौ सुर्वे हट्टाने घराबाहेर आपल्या मैत्रिणीला भेटायला गेली आणि त्यात तिचा दुर्दैवी रेल्वे अपघात झाला. मी सतर्कतेचा इशारा देऊनही, काळाने त्यांच्या संसारावर दगा आणली होती. आज मितीस श्री सुर्वे व त्यांची दोन मुलांसोबत वास्तव्य करीत आहेत.

Sunday, 14 June 2020

Ayurveda-Tips-1

आरोग्य विषयक नियम

Image by Fathima Shanas from Pixabay


1) आपल्या शरीररूपी देवळाचे मुख्य चार आधार स्तंभ आहे व ते म्हणजे आहार निद्रा ब्रह्मचर्य व शारीरिक व्यायाम हे होत.  आपला आहार पचनास उपयुक्त आणि सात्विक असा असावा. मसालेदार चमचमीत तेलकट पदार्थ अतिशय तिखट असे आंबट पदार्थ दैनंदिन वापरात कमीत कमी असावेत.

2) जेवणाच्या साधारणत:  अर्ध्या तासापूर्वी अर्धा ग्लास पाणी पिणे योग्य आहे.  जेवणाची क्रिया करत असताना मधून मधून पाणी पिणे वर्ज्य आहे. जेवण हे नेहमी चावून-चावून घशाखाली उतरवले पाहिजे जेणे करून योग्य असा पाचक रस तयार होतो.  प्रसंगानुरूप जेवण झाल्यावर एक दोन घोट पाणी पिणे हितावह आहे.  जास्त प्रमाणात गोड आंबट चमचमीत जेवण केल्याने कृत्रिम तहान लागत असते. जेवण झाल्यानंतर चूळ भरून अन्ननलिका स्वच्छ करून घेण्याकरिता एक दोन घोट पाणी पिणे चांगले कृत्रिम तहान लागल्यावर जेव्हा नैसर्गिक तहान लागते,
 त्यावेळेस दातखीळी बंद करून पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.

3) कम खाना खूप चबाना हाच आहे तंदुरुस्तीचा खजाना पोटाचे दोन कप्पे जेवणासाठी एक कप्पा पाहण्याकरिता व एक कप्पा हवे करिता मोकळा ठेवावा.

रात्रीचे जेवण नेहमी हलकेफुलके असावे पोट जर जड नसेल तर तो अभ्यास सुखकारी असे दाबून जेवणे म्हणजे दुसऱ्या शब्दात आळस आणि सुस्ती आमंत्रण असे  होय. 

4) रात्री साधारणता दहा वाजता शयन करून पहाटे पाच वाजता उठले पाहिजे . सर्वसाधारणपणे सात तासाची झोप पुरे होत असते.

5) रात्रीच्या जेवणात आंबट पदार्थ नसावेत त्याचप्रमाणे जेवणानंतर लगेच झोपू नये. नेहमी डाव्या कुशीवर झोपणे आरोग्याप्रत आहे. जेणेकरून सूर्य नाडीचा प्रवाह सुरळीत होऊन जेवण पचन क्रिया सहजता उपलब्ध होते. अधून मधून उजव्या कुशीवर होण्यास हरकत नाही.

६) झोपण्यापूर्वी थंड पाण्याने डोळे धुणे. हात पाय गुडघ्यापासून बोटांपर्यंत व तोंड धुवून शांत झोप घ्यावी.

७) पाठीवर उताणे झोपल्याने नाना प्रकारची बरी वाईट स्वप्ने पडतात.  तोंड उघडे राहून नाक बंद होते श्वसननलिका दाबली जाते व स्वास्थ्य बिघडते तपकीर हुंगण्याची सवय अतिशय वाईट आहे. कधी कधी तपकिरीची मात्रा वाढल्याने मनुष्य प्रलंबित निद्रेत कोमात सरकला जातो अशी अनेक उदाहरणे आहेत.

) रात्रीच्यावेळी नियमितरित्या झोप घेणाऱ्या व्यक्तींनी दिवसा शक्यतो झोपू नये. अशाप्रकारे झोप घेणे म्हणजे आळशाला सामोरे जाण्यासाठी आहे . दिवसाच्या जेवणानंतर आपण वाम कुशी करू शकता परंतु झोप नाही.

९) जेवण घेत असताना चांगले विचार करावेत कारण चांगल्या विचारासह घेतलेले अन्न उत्कृष्ट अन्नरस व रस रक्त तयार करतात व त्यामुळे मन सदोदित प्रफुल्ल उत्साहित राहते जसे खावे अन्न तसे राही मन.

१०) आपण जगण्यासाठी जेवतो, जेवणासाठी जगत नाही हे सर्वश्रुत आहेच. हा सिद्धांत डोळ्यापुढे ठेवून काळजी घ्यावयास हवी. तामसी आहार घेतल्याने शरीरातील रक्त गरम होऊन रक्तप्रवाह पातळ होतो आणि फलस्वरूप माणूस तापट होत जातो.

११) जेवण करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा स्वच्छता पाळून शुद्ध विचारांसह अन्न शिजवणे जरुरीचे आहे. त्याच प्रमाणे तयार झालेले अन्न शुद्ध पवित्र विचारांनी युक्त असे वाढले गेले पाहिजे.

१२)  संत म्हणतात साधू अच्छी भिख से रहते सदा प्रसन्न. बुद्धी भ्रष्ट कर देता है अन्याय का अन्न. 
योगाच्या शुद्धीकरणाचा अभ्यास करणाऱ्या साधक गटांनी या प्रकारे सातत्याने नियमाचे पालन करणे प्रयत्नांची पराकाष्टा व्हायला हवी. परिश्रम हे एक प्रकारचे तपच आहे आपले शरीर हे आपली शारीरिक व अध्यात्मिक शक्ती द्विगुणित करणारे एक माध्यम आहे. याच माध्यमास केंद्रस्थानी ठेवून शास्त्रांमध्ये उल्लेख आहे की,
देहो  देवालयंम्  प्रोक्तम आत्मा देव : सनातन:
 त्याचे दज्ञान निर्माल्य. सोहम भावें न पूजयेत..  व्यास... 
अथर्ववेदामध्ये या शरीराचा अयोध्यानगरी, स्वर्ग, अलकापुरी सारख्या नावांनी उल्लेख केला गेला आहे.

Saturday, 13 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-6

भाग-६

(मराठी) 

सत्य अनुभव 


नमस्कार,


त्यावेळी माझ्याकडे  श्री कुलकर्णी नामक एक चित्रकार यायचे. मुळचे जळगावचे रहिवासी होते. खूप चांगल्या प्रकारचे चित्रकार असूनही त्यांच्या चित्रांना योग्य ती मागणी येत नसे. आर्थिक बाजू ठीक नसल्याने मी त्यांना इतरांच्या यज्ञ सोहळ्यात आहुती देण्यास बोलवत असे त्यांना व त्यांच्या पत्नीला बीजमंत्र देऊन मी सक्षम केले होते बिजमंत्र साधनेच्या काळात त्यांना अफाट असे अनुभव आले, पण काही केल्या त्यांना धनप्राप्ती होईल त्यासाठी वेगळा मार्ग वापरला व लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांचे चित्र त्यावेळी (सन २००२) रुपये 90 हजार विकले गेले आणि ते माझ्याकडे पेढ्यांचा बॉक्स घेऊन पत्नीसह आले त्यांच्याप्रमाणे मलाही आनंद झालाच होता त्यांच्या इच्छापूर्ती नंतर त्यांनी नवनाथ याग केला. 

त्याचप्रमाणे त्यांना माझ्याकडे घेऊन येणारी व्यक्ती निशा ही अनेक पीडित लोकांना माझ्याकडे त्यावेळेस आणत असे मी माझ्या परीने त्यांचा प्रश्न सोडविण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीत होतो शेवटी यश अपयश हे परमेश्वराच्या हाती होते तो आपल्या कर्माप्रमाणे फळ देत असतो.

त्यापैकी लता माझ्याकडे आपल्या नवऱ्याबद्दलचे दुःख घेऊन आल्या. तिचा नवरा परदेशात कामाला होता. तो बाहेरख्याली असल्यामुळे तेथे गैरसंबंधात अडकला होता.  त्यामुळे लता व तिची दोन मुले याकडे तो दुर्लक्ष करीत होता. लताला लंकेची पार्वती करून तिचे  सर्व दागिने  तो  परदेशात घेऊन गेला होता.  

Photo by Alexander Dummer from Pexels

अन्नान दशा झालेली लता माझ्याकडे या सर्व गोष्टी केविलवाणे सांगत होती. महाराज तुमच्याकडे शेवटचा प्रयत्न करणार अन्यथा मला आत्महत्या करावी लागेल. कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही . मी नाथांच्या आदेशाप्रमाणे लताला हवन करून महावशीकरण तावीज धारण करण्यास सांगितले परंतु तिच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस ती म्हणाली माझ्याकडे केवळ मंगळसूत्र आहे ते गहाण ठेवून मी पैसे आणून देते. मला ते पटत नव्हते त्यावर मी नकार दिला तर तिने आपल्या मंगळसूत्रप्रमाणे खोटे मंगळसूत्र धारण करून खरे मंगळसूत्र गहाण ठेवून मला पैसे आणून दिले.

मी  तिच्या समस्येसाठी नाथांच्या आदेशाने व गुरूंच्या आशीर्वादाने हवन कार्य केले आणि महिन्याभरात तिचे गेलेले सर्व दागिने नवऱ्याने परत पाठविले व दर महा वीस हजार रुपये तुला पाठवीन असे सौ लताला सांगितले. या यशामुळे लताचा विश्वास दृढ झाला होता. ती रोज माझ्याकडे येत असे. परंतु तिच्या नवऱ्याची मैत्रीण परदेशात होती ती लतावर तिच्या मुलांवर प्रयोग करू लागली. त्यामुळे लताच्या घरात विघ्न आजार वाढू लागले. यावर उपाय म्हणून लताच्या मुलीला बीज  मंत्र देऊन साधना शिकवली व जास्तीत जास्त साधना करून तुझा व तुझ्या घरच्यांचा सांभाळ करावा. असे मी तिला सांगितले. त्यावर त्या मुलीने खूप मेहनत घेऊन साधना केली व यशप्राप्ती केली. दरवर्षी माझ्या घरी नवनाथांचा याग व्हावा यासाठी लतानी संकल्प सोडला.

प्रत्येक अडचणीला ती माझा सल्ला घेत असे, तिची मुलगी हुशार होती पण स्वैराचारी होती. जेव्हा हि बाब माझ्या लक्षात आली तेव्हा मी याबाबत आक्षेप घेतला पण तिने नानाप्रकारे बहाणे करून माझ्याकडे येण्याचे टाळू लागली. तिला स्वमर्जीने वागायचे होते. शेवटी तिने एका परजातीय मुलाशी परस्पर विवाह केला. शेवटी मीही त्यांच्या वयैक्तिक बाबतीत दखल न घेण्याचे ठरविले.