आंधळ्या बहिर्यांची गाठ
एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्या दोन माणसांची गाठ पडणे.
⚉ माझ्याकडे कुशल नावाचा 22 वर्षीय मुलगा आला त्याला त्याच्या आयुष्यात फार मोठं व्हायचं होतं. त्याला कोणतेही व्यसन नव्हते, पण त्याचे मनोबल खूपच दुर्बल होते. त्यांनी नुकतेच लग्न केले होते. लग्न एका मानलेल्या बहिणीबरोबरच पळून जाऊन झाले होते. उत्पन्नाचे साधन काहीच नव्हते आणि अध्यात्मात प्रगती करायची होती. तो आपल्या वडिलांच्या पुर्ण अधिन होता. तो स्वतःचे निर्णय घेण्यास असमर्थ होता.
मी माझ्या परीने त्याला खूप समजावले. परंतु तो मला अध्यात्मात प्रगती करायची म्हणून माझ्या घरी आपल्या पत्नीला घेऊन आला. तो व त्याची पत्नी त्यांच्या परीने कामात मदत करीत असे. त्या मोबदल्यात मी त्यांना पगार देत असे कारण तो संसारी होता. त्याला त्याच्या बरोबर त्याच्या पत्नीच्याही गरजा भागवायच्या होत्या. साधना-नोकरी-सत्संग-शांती असा त्याचा दिनक्रम होता.
अचानक त्याच्या वडिलांना जाग आली की, आपल्या मुलाला कोणीतरी आपल्यापासून हिरावून घेत आहे. त्यांनी बंड पुकारला व आपल्या मुलांवर मानसिक अत्याचार सुरू केले. आपल्या वडिलांच्या धाकापुढे तो आमच्याकडे येईनासा झाला. पुढे तो व त्याचे नशीब.....?
⚉ घाटकोपर येथून श्री.सुहास नावाचे गृहस्थ सोहम कार्यालयात आले. त्यांच्या पत्नीची तब्येत फार बिकट होती. त्यांच्या पत्नीचे पूर्ण शरीर थरथर कापायचे, पाय लटपटायचे. त्यांना कुणीतरी घेऊन चालले आहे, असा भास व्हायचा. श्री. सुहास यांनी प्रयत्नांची खूप शिकस्त केली होती. परंतु त्यांना यश मिळाले नाही, म्हणून शेवटचा प्रयत्न आपण सोहम कार्यालयामध्ये जाऊन करावा, असा त्यांनी विचार केला व ते माझ्या भेटीसाठी आले.
त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी नाथांचा आदेश घेतला. तेव्हा मला त्यांच्यावर झालेल्या काळी जादू क्रियांचा खुलासा झाला. नातेवाईक व शेजारचे अशा दोघांनी वेगवेगळ्या क्रिया त्यांच्या पत्नीवर करून ठेवल्या होत्या. मला जे समजले, ते मी श्री सुहास यांना सांगितले. वास्तु बंधन, नवनाथ हवन, नजर दोष, सिद्ध कवच व इतर काही वनस्पती इत्यादींचा आपल्याला वापर करावा लागेल. व त्यानंतर तुमची पत्नी पूर्ववत होईल.
त्यांची पत्नी एका मोठ्या शाळेत शिक्षिका होती. त्यावर सुहास यांनी मला प्रश्न केला की, आपण एवढा खर्च करून सर्व ठीक होईल ना ? कामाची गॅरेंटी देता? मी म्हटलं, मी काही देव नाही, की बँक नाही, गॅरंटी द्यायला. मला जे नाथानकडून कळले, ते मी तुम्हाला सांगितले. यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करणार पण यश हे केवळ नांथच देणार व त्यासाठी श्रद्धा-सबुरी हवी.
सुहास यांनी वरील प्रयोग करण्याचे ठरविले, व मला हा प्रयोग करण्याची विनंती केली. ठरल्याप्रमाणे मी माझ्या शिष्यांना घेऊन त्यांच्या घरी गेलो. तर त्यांच्या दारात एक काळी मांजर रडत बसली होती. आम्हाला बघताच ती तिचे दात विचकारून पळून गेली. मी शाबर मंत्र यांनी त्यांच्याकडे वरील सर्व प्रयोग केले व मला माझ्या कामाचे संकेत मिळाले. मी सुहास यांना सांगितले, तुमच्या पत्नीचा त्रास गेला आहे. त्यांना दिलेले कवच नीट सांभाळून ठेवायला सांगा.....
कारण हे कवच त्यांचे घराबाहेर रक्षण करेल आम्ही सर्व आटपून घरी आलो. तोच मला माझ्या वडिलांचा फोन आला, तू असशील तसा निघून ये. तुझ्या आईच्या छातीत दुखत आहे. त्या दिवसापासून पुढील पाच दिवसात माझ्या आईची प्राणज्योत मालवली. माझे फार मोठं नुकसान झाले होते. जे मी कधीच भरून काढू शकणार नव्हतो.
वरील बातमी सुहास यांना समजताच, त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना सारखे वाटत होते की, हे सर्व आपल्यामुळे झाले. पण मी त्यांची समजूत काढली व पुढच्या प्रवासाला लागलो. शेवटी जीवब्रह्म सेवेचे व्रत घेतले, म्हटल्यावर इतर प्रश्नच उद्भवत नाही.
आता सुहास यांच्या पत्नीला खूप बरे वाटत होते. तर त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न भेडसावत होता. ती उच्चशिक्षित होती . परंतु तिला योग्य असा वर मिळत नव्हता. तिच्या लग्नासाठी विष्णू हवन करण्याचा आदेश आला होता. त्याप्रमाणे आम्ही हवन करायचे ठरवले. व श्री सुहास यांच्या मुलीने काही तांत्रिक साधना करायची असे ठरले. कारण तिला योग्य वर मिळावा व लग्नानंतर तो व सासरची मंडळी तिच्या मनाप्रमाणे वागावी. हवन कार्य योग्य रीतीने यशस्वी पार पडले व मुलीला साधना करण्यास मी मंत्र दिला, तर ती रडायला लागली. माझ्याने साधना जमणार नाही.
नवीन पिढी असल्याने सर्व आयत हवं असतं ना ! मी म्हटलं तुझी इच्छा. माझी कोणतीही जबरदस्ती नाही.
काही दिवसांनी सुहास यांनी माझ्याकडे त्यांच्या मुलीसाठी एका मुलाची पत्रिका आणली. परंतु आदेशा दाखल नाही असे उत्तर आले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे येणे बंद केले. अचानक एके दिवशी त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका, मिठाई व माझ्या पत्नीला मानाचे वस्त्र आणले, मला थोडे नवलच वाटले. त्यांनी सर्व गोष्टी परस्पर ठरवल्या होत्या.
परंतु काही महिन्यातच तिला सासरच्या त्रासामुळे घटस्फोट घ्यावा लागला, स्वतःच्या मर्जीने एका ज्योतिषाकडून कुंडली जुळवून मी नकार दिलेल्या मुलांबरोबर लग्न लावले होते. त्यांनी स्वतः स्वतःची बरबादी करून घेतली होती. शेवटी भोग हे भोगावे लागणार, मी म्हटलं शेवटी नाथांची इच्छा !
--------------------------------------------------------------------
The knot of the blind deaf
⚉ I had a 22-year-old boy named Kushal who wanted to grow up. He had no addictions, but his morale was very low. They were recently married. The marriage took place with an estranged sister. The means of income was nothing, and spiritual progress was to be made. He was in complete control of his father. He was unable to make his own decisions.
I explained a lot to him in my way. But he brought his wife to my house to help me progress spiritually. He and his wife helped with the work. In return, I paid them because he was worldly. He wanted to take care of his wife, along with him. His daily routine was sadhana-job-Satsang-peace.
Suddenly his father woke up to find that someone was taking his son away from him. They revolted and started mentally abusing their children. He came to us at the behest of his father. Next, he and his luck .....?
⚉ From Ghatkopar, a householder named Mr. Suhas came to Soham's office. His wife was in critical condition. His wife's whole body was shaking; her legs were shaking. It was as if someone had taken them away. Mr. Suhas had beaten the effort a lot. But he did not succeed, so he thought that the last attempt should be made by going to Soham's office, and he came to visit me.
I took Nathan's orders to solve their problems. Then I realized the black magic that had happened to them. Both the relatives and the neighbors had done different things to his wife. I told Mr. Suhas what I understood. You have to use Vastu Bandhan, Navnath Havan, Nazar Dosh, Siddha Kavach and some other plants, etc. And then your wife will be undone.
His wife was a teacher in a large school. Suhas then asked me, will you be all right by spending so much? Guaranteed work? I said I'm not a god, not a bank, to ensure. I told you what I learned from Nathan. It is up to you to decide whether to believe it or not. I will try my best, but success will only come from Ninth, and it requires faith and patience.
Suhas decided to do the above experiment and requested me to do this experiment. As planned, I took my disciples home. A black cat was sitting at their door, crying. As soon as she saw us, she gritted her teeth and ran away. I did all the above experiments with Shabar Mantra, and I got hints of my work. I told Suhas, your wife is gone. Ask them to take care of the armor given to them .....
Because this shield will protect them outside the house, we all came home exhausted. That's when I got a call from my father, leave as you are. Your mother's chest hurts. For the next five days, my mother died. I had suffered a significant loss, which I could never replenish.
As soon as Suhas understood the above news, he felt evil. They felt like it was all because of us. But I followed them and started on my next journey. When Jivabrahma finally took the vow of service, other questions do not arise.
Now Suhas's wife was feeling very well. So they were facing the question of their daughter's marriage. She was highly educated. But she was not getting it right. Vishnu Havan was ordered for her wedding. That's how we decided to do Havan. And Mr. Suhas's daughter decided to do some particular sadhana. Because she should get the right groom and after marriage, he and his father-in-law's congregation should behave according to her will. The Havan work was completed, and I gave the mantra to the girl to do sadhana, but she started crying. I will not do sadhana.
Being a new generation, you want all the rectangles! I said your wish. I have no compulsion.
A few days later, Suhas brought me a boy's magazine for his daughter. But the answer was that the order was not filed. Then they stopped coming to me. Suddenly one day he brought his daughter's wedding magazine, sweets, and my wife's clothes, I felt a little new. They had decided everything by mutual consent.
But within a few months, she had to get a divorce because of her father-in-law's troubles. They had ruined themselves. Bhoga will have to suffer in the end; I said, in the end, Nathan's wish!
Tatvayog Wood Agarbatti (Pink_20.2 X 0.3 X 0.3 Cm)